Group D Railway – रेल्वे ग्रुप D भरती (Railway Bharti) २०२५: अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि महत्त्वाची माहिती
भारतीय रेल्वे भरती बोर्डाने Railway Recruitment Board (RRB) २०२५ मध्ये ग्रुप D Group D भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून, सर्व महत्त्वाच्या तारखा आणि पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत.

Railway Bharti 2025
अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्जाची सुरुवात: २३ जानेवारी २०२५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ मार्च २०२५ (२३:५९)
- फी पेमेंटची अंतिम तारीख: २४ फेब्रुवारी २०२५ (२३:५९)
- अर्ज दुरुस्ती कालावधी: २५ फेब्रुवारी २०२५ ते ६ मार्च २०२५ (२३:५९)
- अर्ज दुरुस्ती फी: ₹२५० (प्रत्येक वेळेस गैर-परतावा)

Group D Railway Salary
| पगार | ₹१८,०००/- महिना (स्तर-१) |
Railway Recruitment
एकूण रिक्त जागा: ३२,४३८
पात्रता निकष – Group D Railway
राष्ट्रीयत्व
- उमेदवार भारताचा नागरिक असावा.
वयोमर्यादा (१ जानेवारी २०२५ रोजी)
| सामान्य प्रवर्ग | १८ ते ३६ वर्षे |
| ओबीसी (नॉन-क्रीमी लेयर) | १८ ते ३९ वर्षे |
| SC/ST प्रवर्ग | १८ ते ४१ वर्षे |
| माजी सैनिक | वयोमर्यादेत सेवा कालावधी वजा करून ३ वर्षे अतिरिक्त सवलत |
- दिव्यांग उमेदवार:
| सामान्य प्रवर्ग | १० वर्षे सवलत |
| ओबीसी | १३ वर्षे सवलत |
| SC/ST | १५ वर्षे सवलत |
शैक्षणिक पात्रता
- किमान शैक्षणिक पात्रता: १०वी उत्तीर्ण किंवा ITI किंवा NCVT/SCVT प्रमाणपत्र धारक.
अर्ज फी आणि परतावा – Railway Bharti 2025
- सामान्य/OBC/EWS: ₹५००/-
- परीक्षेला हजर राहिल्यास ₹४००/- परत मिळतील.
- SC/ST/महिला/दिव्यांग/माजी सैनिक/EBC: ₹२५०/-
- परीक्षेला हजर राहिल्यास संपूर्ण रक्कम परत मिळेल.
निवड प्रक्रिया – Railway Bharti २०२५
संगणक आधारित परीक्षा (CBT) – निगेटिव्ह मार्किंग लागू (प्रत्येक चुकीसाठी १/३ गुण वजा होतील).
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) – पुरुष व महिला उमेदवारांसाठी वेगवेगळे निकष असतील.
दस्तऐवज पडताळणी (DV – Document Verification)
वैद्यकीय चाचणी (ME – Medical Examination)
CBT (संगणक आधारित परीक्षा )
ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ऑनलाईन परीक्षा घेतली जाते. संगणकाधारित या परीक्षेत बहुपर्यायी उत्तरातून उत्तरे द्यायची असतात सहसा दहावी CBSE Pattern नुसार अभ्यासक्रम या परीक्षेत विचारला जातो. एकूण १०० प्रश्न विचारले जातात प्रत्येक प्रश्नाला एक गुण असतो दीड तासाच्या पेपर मध्ये नकारात्मक गुण व्यवस्था वापरली जाते, ज्यामध्ये चुकीचे उत्तर दिल्यास १/३ गुण कमी होतात. परीक्षेची रचना खालील प्रमाणे आहे-
| सामान्य विज्ञान General Science | 25 |
| गणित Mathematics | 25 |
| बुद्धिमत्ता चाचणी General Intelligence and Reasoning | 30 |
| सामान्य ज्ञान General Awareness and Current Affairs | 20 |
| एकूण प्रश्न | 100 |
| वेळ Time | 90 Min. ( दीड तास) |
Group D Railway Syllabus
परीक्षेचा अभ्यासक्रम (CBT)
गणित
- अंकगणित, LCM-HCF, टक्केवारी, नफा-तोटा, साधे व चक्रवाढ व्याज, बीजगणित, त्रिकोणमिती, वेळ व अंतर, सांख्यिकी इ. सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती
- वर्णमाला आणि संख्यांची मालिका, कोडिंग-डिकोडिंग, सिलोजिझम, वेन आकृती, डेटा विश्लेषण इ. सामान्य विज्ञान**
- १०वी स्तरावरील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र.
चालू घडामोडी व सामान्य ज्ञान
- विज्ञान-तंत्रज्ञान, क्रीडा, संस्कृती, अर्थव्यवस्था, राजकारण इ.
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
संगणकाधारित परीक्षेच्या निकालानंतर उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाते. या चाचणीचे स्वरूप खालीलप्रमाणे – पुरुष उमेदवारांसाठी:
- ३५ किलो वजन उचलून १०० मीटर अंतर २ मिनिटांत पार करणे.
- १००० मीटर धावणे ४ मिनिटे १५ सेकंदात पूर्ण करणे.
- महिला उमेदवारांसाठी:
- २० किलो वजन उचलून १०० मीटर अंतर २ मिनिटांत पार करणे.
- १००० मीटर धावणे ५ मिनिटे ४० सेकंदात पूर्ण करणे.
त्यानंतर कागदपत्रे पडताळणी (Document Verification) आणि वैद्यकीय चाचणी (Medical Examination) झाल्यानंतर अंतिम निवड निश्चित केली जाते.
मुंबई च्या प्रवर्गनिहाय रिक्त जागा – Railway Bharti

सिकंदराबाद च्या प्रवर्गनिहाय रिक्त जागा – Railway Bharti

अन्य महत्त्वाच्या सूचना – Railway Bharti
SC/ST उमेदवारांना मोफत रेल्वे प्रवास सुविधा** (वैध जात प्रमाणपत्र आवश्यक).
अर्जात एकदा भरलेली माहिती नंतर बदलता येणार नाही, त्यामुळे काळजीपूर्वक भरावा. नॉर्मलायझेशन पद्धती लागू असेल, त्यामुळे गुण समान करण्याची प्रक्रिया केली जाईल. उमेदवार एकाच RRB मध्ये त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार एकापेक्षा अधिक पदांसाठी एकाच अर्जाद्वार अर्ज करू शकतो. परंतु एकाच उमेदवाराने अनेक RRB साठी अर्ज केल्यास सर्व अर्ज बाद केले जातील.
संपर्क माहिती (Helpline)**
- ई-मेल: rrb.help@csc.gov.in
- फोन: 0172-565-3333 / 9592001188 (सोमवार ते शुक्रवार, सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:००)
भरणा समस्या:
ऑनलाईन अर्ज करतांना पेमेंट अडकल्यास अथवा अन्य अडचणी येत असल्यास संपर्क –
- फोन: 022-20876123 / 022-20876121
- ई-मेल: sbiepay@sbi.co.in, agm3.aggregator@sbi.co.in
अर्ज भरण्यासाठी अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा.
प्रवर्गनिहाय जागा व इतर सविस्तर जाहिरातीसाठी वरील अधिकृत वेबसाईट वर जाऊन जाहिरात सविस्तर वाचावी.
रेल्वे ग्रुप D भरती २०२५ मध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज लवकरात लवकर भरावा आणि तयारी सुरू करावी!
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
BRO- 10 वी पास वर सरकारी नोकरी – 10th Class Pass Job
मुंबई उच्च न्यायालयात ‘कायदा क्लार्क’ पदासाठी भरतीची घोषणा.
हवाई दलातील नोकरीत सामील व्हा रोमांचक संधी आपली वाट पाहत आहे !
HDFC बँकेत रिलेशनशिप मॅनेजर (Assistant Manager/ Deputy Manager/ Manager/Senior Manager) पदांची भरती
