रामायण (Ramayan) पुन्हा येत आहे! बॉलीवूड सिनेनिर्माता नमित मल्होत्रा आणि सह-निर्माता- यश भारताच्या ऐतिहासिक व पौराणिक महाकाव्य “रामायण” च्या कथेवर आधारित बॉलीवूड चा नवीन “रामायण” नावाचा सिनेमा घेऊन येत आहेत . हा चित्रपट दोन भागात निर्माण केला जाणार असून त्याचा पहिला भाग दिवाळी २०२६ ला रिलीज केला जाणार आहे तर दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीला रिलीज करण्याचा निर्मात्यांचा कयास आहे. नुकताच या चित्रपटाच्या पहिल्या भागाचा टीझर रिलीज केला गेला आहे. या टीझरला इंटरनेटवर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. परंतु “आदिपुरुष” चित्रपटाने प्रेक्षकांचा जसा भ्रमनिराश केला होता तसा प्रकार “रामायण” सोबत घडू नये या प्रकारची प्रेक्षक आपली भावना व्यक्त करत आहेत.

टीझर रिलीज करताना मांडलेल्या मतांमध्ये निर्मात्यांनी सांगितले कि, “रामायण ही केवळ एक पौराणिक गाथा नाही, तर ती आपल्या संस्कृतीची, सत्याची आणि इतिहासाची अमर ओळख आहे. जगभरातील काही सर्वोत्तम कलाकार, तंत्रज्ञ आणि सर्जनशील प्रतिभांच्या एकत्रित प्रयत्नांतून “रामायण” हे महाकाव्य अभूतपूर्व श्रद्धा, सन्मान आणि भव्यात्वाने पुन्हा साकार होत आहे.”
“राम विरुद्ध रावण” या अमर संघर्षाची ही नव्या युगातील सांगोपांग मांडणी दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. नमित मल्होत्रा यांच्या Prime Focus Studios आणि 8 वेळा ऑस्कर विजेते VFX स्टुडिओ DNEG, तसेच यश यांच्या Monster Mind Creations च्या सहकार्याने हा भव्य प्रकल्प आकार घेत आहे.
Ramayan 2026 – कलाकार व निर्मिती टीमची माहिती
रामायण 2026 या पहिल्या भागाचे दिग्दर्शक आहेत –
दिग्दर्शक: नितेश तिवारी
लेखक :
नमित मल्होत्रा– पटकथा
नमित मल्होत्रा– कथा
श्रीधर राघवन– संवाद व लेखन
कलाकार मंडळी: Ramayan २०२६
| कलाकारांचे नाव | भूमिकेचे नाव |
|---|---|
| रणबीर कपूर | श्रीराम |
| यश | रावण |
| साई पल्लवी | सीता |
| रवि दुबे | लक्ष्मण |
| सनी देओल | हनुमान |
| काजल अग्रवाल | मंदोदरी |
| अरुण गोविल | दशरथ |
| इंदिरा कृष्णन | कौसल्या |
| लारा दत्ता | कैकेयी |
| रकुल प्रीत सिंह | शूर्पणखा |
| शीबा चड्ढा | मंथरा |
इतर प्रमुख कलाकार: Ramayan
| कलाकारांचे नाव | भूमिकेचे नाव |
|---|---|
| विवेक ओबेरॉय | विद्युतजिव |
| शोभना | कैकसी |
| मोहित रैना | भगवान शंकर |
| कुणाल कपूर | इंद्रदेव |
| सत्येन चतुर्वेदी | सुमंत्र |
| कुरंगी विजयश्री नगराज | अयोध्येतील मुलगी |
निर्माते: नमित मल्होत्रा आणि सह-निर्माता- यश
संगीत संयोजक: ए. आर. रहमान आणि हॅन्स झिमर
छायांकन (सिनेमॅटोग्राफर):
पंकज कुमार
महेश लिमये
कलादिग्दर्शन (प्रॉडक्शन डिझाईन):
राम्से एव्हरी
रवी बंसल
सुब्रता चक्रवर्ती
अमित रे
गीतलेखन: डॉ. कुमार विश्वास
विशेष:हा चित्रपट IMAX साठी चित्रित केला जात आहे आणि जगभर प्रदर्शित होणार आहे.
रिलीज
भाग १– दिवाळी २०२६
भाग २ – दिवाळी २०२७
Ramayan चित्रपटाची कथा
अयोध्या नावाच्या नगरीत एक न्यायप्रिय राजा दशरथ राज्य करत होते. त्याच्या चार मुलांपैकी सर्वात मोठा मुलगा राम – गुणवान, धैर्यवान आणि सत्यनिष्ठ होता. रामाचा विवाह सीतेशी झाला, आणि त्यांच्या जीवनातील प्रेम, विश्वास आणि त्यागाने एक नवा आदर्श निर्माण केला.
पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. राजकीय षडयंत्रामुळे राम, सीता आणि लक्ष्मण यांना १४ वर्षांसाठी वनवासाला जावं लागलं. त्या वनवासातच रावणाने सीतेचं अपहरण केलं आणि तिला लंकेत नेलं. या घटनेने एक प्रचंड युद्धाचे दार उघडले – राम विरुद्ध रावण.
ही केवळ देव आणि राक्षस यांची लढाई नव्हती, तर धर्म आणि अधर्म, प्रेम आणि अहंकार, त्याग आणि लोभ यांच्यातील संघर्ष होता. रामाच्या बाजूने हनुमान आणि वानरसेना उभी राहिली. अखेर रामाने रावणाचा पराभव केला आणि सीतेला परत आणलं.
बॉलीवूडमध्ये या गाथेला नव्या स्वरूपात उभं केलं जात आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित आणि रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिकांमध्ये, “रामायण” ही फिल्म केवळ पौराणिक कथा नव्हे, तर भारतीय संस्कृतीचा गौरव ठरणार आहे. आधुनिक VFX, IMAX फॉरमॅट आणि AR रहमान-हान्स झिमर यांचे संगीत या कथेच्या भव्यतेला नवा आयाम देईल. अशी सर्व प्रेक्षक आशा बाळगून आहेत आणि उत्सुकतेने चित्रपटाची वाट पाहत आहेत.
चित्रपटाच्या टीझरच्या युटूब व्हिडीओ साठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
शिवरायांचा धर्मवीरपुत्र श्री छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा !
