Ramayana- The Legend Of Rama – ‘रामायण: द लीजेंड ऑफ प्रिन्स राम’ हा जपानी-भारतीय अॅनिमेटेड चित्रपट भारत आणि जपानच्या सहकार्यातून तयार करण्यात आला आहे. हा चित्रपट नवीन स्वरुपात भारतात प्रदर्शित होत आहे. चित्रपट 18 ऑक्टोबर 2024 रोजी रिलीज होणार होता मात्र काही कारणास्तव त्याची रिलीजची तारीख पुढे ढकलून तो आता 24 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रथम 1992 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट राम मोहन आणि युगो साको यांच्या परिश्रमातून साकारला गेला होता, ज्यामध्ये दोन्ही देशांच्या अॅनिमेशन शैलींचा सुरेख संगम आहे. विशेष म्हणजे पारंपरिक हाताने रेखाटलेल्या अॅनिमेशनचा वापर करून तयार केलेला हा चित्रपट त्याच्या मूळ कलात्मकतेसह भारतीय पुराणकथांच्या भावनांचा प्रामाणिकपणे सन्मान ठेवतो. कोइची सासाकी आणि राम मोहन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट वाल्मिकींच्या महाकाव्य ‘रामायण’वर आधारित आहे, ज्याला संगीत दिग्दर्शक वानराज भाटिया यांनी संगीत दिले आहे.

‘बाहुबली’, ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘आरआरआर’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे पटकथालेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद यांना Ramayana: The Legend Of Rama या चित्रपटाच्या सर्जनशील रूपांतरासाठी सहभागी करण्यात आले आहे. निर्मात्यांना त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून ‘द लीजेंड ऑफ प्रिन्स राम’ हा चित्रपट आधुनिक प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवायचा आहे, तसेच रामायणाच्या मूळ भावनेलाही प्रामाणिक ठेवायचे आहे.
Ramayana- The Legend Of Ramaहोणार विविध भाषेत प्रदर्शित
Ramayana- The Legend Of Rama हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू आणि मूळ इंग्रजी आवृत्तीत उपलब्ध असेल. याच्या आधी 10 जानेवारी 2025 रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होईल, अशी घोषणा गीक पिक्चर्स इंडियाने केली आहे.
गीक पिक्चर्स इंडियाचे सह-संस्थापक अर्जुन अग्रवाल म्हणाले, “रामायण ही केवळ कथा नाही, तर ती एक परंपरा आहे, जी पिढ्यानपिढ्या लोकांना प्रेरणा देते. भारतातील विविध भाषांमधून आणि उत्कृष्ट तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आम्ही ही कथा प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. हा चित्रपट म्हणजे केवळ एक मनोरंजनाचा अनुभव नसून, तो आपल्या संस्कृतीचे आणि वारशाचे प्रदर्शन आहे.”
चित्रपटाचे संकल्पनाकार विजयेंद्र प्रसाद यांनी याची काळजी घेतली आहे की हा चित्रपट रामायणाच्या मूळ भावनेशी प्रामाणिक राहून आधुनिक काळातील प्रेक्षकांसाठी सुसंगत असेल.
Ramayana- The Legend Of Rama – चित्रपटाची टीम
| दिग्दर्शन | कोइची सासाकी राम मोहन युगो साको |
| निर्मिती | युगो साको केन्जी योशी अत्सुशी मात्सुओ |
| अॅनिमेशन | काझुयुकी कोबायाशी |
| निर्मिती संस्था | निप्पॉन रामायण फिल्म कंपनी |
| पटकथा | नरेंद्र शर्मा राणी बुरा राम मोहन कोइची सासाकी हिरोशी ओनोगी राम मोहन युगो साको |
| आधारित | वाल्मिकी यांच्या ‘रामायण’वर |
| संगीत | वानराज भाटिया |
| मुख्य Voice कलाकार | राम:- निखिल कपूर (English), अरुण गोविल (हिंदी) सीता – राएल पदमसी (English), नम्रता सावनी (हिंदी) रावण- उदय मथान (English), अमरीश पुरी (हिंदी) लक्ष्मण- मिशाल वर्मा (English), शक्ती सिंग (हिंदी) हनुमान- नोएल गोदिन (English), दिलीप सिन्हा (हिंदी) |
| प्रदर्शनाच्या तारखा | जुने व्हर्जन – 10 जानेवारी 1993 (भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव) 3 नोव्हेंबर 1997 (जपान) नवीन व्हर्जन – 24 जानेवारी 2025 |
| चित्रपटाची भाषा | इंग्लिश, हिंदी, तामिळ, तेलुगू |
| बजेट | अंदाजे ४३ – ४४ कोटी |
24 जानेवारी 2025 रोजी, या महान गाथेचा अनुभव मोठ्या पडद्यावर घेण्यासाठी तयार राहा!
Ramayana- The Legend Of Rama च्या सोशल मिडिया “X” वरील पोस्टसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट:
“तो” पुष्पाच्या मागून आला आन कमावले दुप्पट !
गेम चेंजर: एक क्रांतिकारी चित्रपटाची तयारी
सनी देओलच्या प्रमुख भूमिकेत धमाकेदार ऍक्शन थ्रिलर लवकरच प्रेक्षकांसमोर
शाहीद कपूर आता “देवा” च्या रुपात !
‘Sky Force’ भारतीय वायुदलाच्या शौर्यगाथेवर आधारित थरारक कथा !
