परराष्ट्र मंत्रालय (MEAIndia) प्रवक्ते रंधीर जैस्वाल (Randhir Jaiswal) यांचे , समाज माध्यम साईट “X” वर निवेदनाच्या स्वरुपात भारताची भूमिका मांडतअमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्कामध्ये झालेल्या शिखर परिषदेचे भारताने हार्दिक स्वागत केले आहे. शांततेच्या दिशेने केलेले त्यांचे नेतृत्व अत्यंत प्रशंसनीय असल्याचे भारताने स्पष्ट केले.

Randhir Jaiswal (MEAIndia) यांचे निवेदन
अलास्कामध्ये झालेल्या शिखर परिषदेतील झालेल्या प्रगतीचे भारताने कौतुक करताना, पुढील मार्ग केवळ संवाद आणि कूटनीतीतूनच निघू शकतो, असे अधोरेखित केले. जगाला आज युक्रेनमधील संघर्षाचा तातडीने अंत व्हावा, अशी अपेक्षा असल्याचे भारताने नमूद केले.
भारताने पुन्हा एकदा सांगितले की आंतरराष्ट्रीय तणाव आणि संघर्ष यांचे निराकरण केवळ परस्पर विश्वास, चर्चेचा मार्ग आणि जागतिक सहकार्य यातूनच साध्य होऊ शकते. त्यामुळे या परिषदेतील पुढाकाराने जागतिक शांततेच्या प्रयत्नांना नवी गती मिळेल, असा विश्वास भारताने व्यक्त केला आहे.
समाज माध्यम साईट “X” वरील MEA चे निवेदन.
आमचे अन्य ब्लॉक पोस्ट :
मोदींच्या भाषणात (Modi Speech) “विकसित भारत- २०४७” ची ब्लू प्रिंट !
