Rohan Bopanna-रोहन बोपण्णा वयावर मात करणारा टेनिसपटू.

Rohan Bopanna

Vishal Patole
Rohan BopannaRohan Bopanna

शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपण्णा (Rohan Bopanna) आणि ऑस्ट्रेलियन मॅथ्यू एबडेन यांनी संयुक्त विजेतेपद पटकावत अँड्रिया वावसोरी आणि सिमोन बोलेली यांच्यावर ७-६ (०), ७-५ असा विजय मिळवला. बोपण्णा याने केवळ प्रतिपक्ष खिळाडूवरच नाही तर आपल्या वयावर देखील मात केली आहे कारण ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरीत या ग्रँड स्लॅमचे विजेतेपद पटकावणारा बोपण्णा हा ४३ वर्षांचा असून असे करणारा तो सर्वात वयस्कर पुरुष खेळाडू ठरला आहे.


“या व्यक्तीसाठी वय हा खरोखरच एक नंबर आहे. तो मनाने तरुण आहे, तो एक चॅम्पियन आहे, तो एक योद्धा आहे. त्याने गेल्या वर्षभरात माझ्या बाजूने कठोर संघर्ष केला आहे”

मॅथ्यू एबडेन रोहन बोपण्णाचा सहकारी


“या व्यक्तीसाठी वय हा खरोखरच फक्त एक नंबर आहे. तो मनाने तरुण आहे, तो एक चॅम्पियन आहे, तो एक योद्धा आहे. त्याने गेल्या वर्षभरात माझ्या बाजूने कठोर संघर्ष केला आहे,” त्याचा सहकारी आणि सहविजेता एबडेन याचे हे वाक्य बोपण्णा बद्दल बरेचकाही सांगून जाते. बोपण्णाची हि कामगिरी भारतीय तरुणांमध्ये जोश भरणारी आहे व प्रत्येकाला प्रेरणा देणारी अशीच आहे.

Rohan Bopanna-रोहन बोपण्णा मॅथ्यू एबडेन यांचा विजय


वावसोरी आणि बोलेल्ली यांनी सुरुवातीच्या सेटमध्ये स्वत:चे स्थान राखले आणि ५-५ असा पहिला ब्रेक पॉइंट मिळवला, परंतु भारतीय-ऑस्ट्रेलियन जोडीने सर्व्हिस वाचवण्यासाठी रॅली काढली आणि प्रेक्षकांच्या पाठिंब्याने टायब्रेकमध्ये सहज विजय मिळवला.
विलक्षण विजयानंतर बोपण्णा म्हणाला, “माझ्या बाजूला एक विलक्षण ऑसी जोडीदार नसता तर हे शक्य झाले नसते.”
गेल्या वर्षीच्या यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पराभूत झालेल्या बोपण्णा-एब्डेन जोडीसाठी हा पहिला मोठा विजय आहे.

बोपण्णा जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असेल

सोमवारी रँकिंग अपडेट केल्यावर बोपण्णा जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असेल, एब्डेनने क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असेल परंतु याच दरम्यान आणखी तीन स्पर्धा खेळल्या जाणार आहेत.या अगोदर बोपण्णाने २०१७ साली फ्रेंच ओपन मिश्र दुहेरी जिंकली होती. तसेच एब्डेनने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरी आणि २०२२ मध्ये विम्बल्डन पुरुष दुहेरी जिंकली होती.
बोपण्णा-एब्डेन यांचे प्रतिस्पर्धी असलेला वावसोरी पहिल्यांदाच मोठ्या फायनलमध्ये खेळत होता, तर बोलेलीने २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियात पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकले होते.

ROHAN BOPANNA AND ABDEN HEIGHLIGHT AUSTRALIAN OPEN 2024 COURTESY AO TV AND YOUTUBE

रोहन बोपण्णा (Rohan Bopanna) विषयी


रोहन बोपण्णा जीवन व परिवार बोपण्णा चे पूर्ण नाव रोहन मचंदा बोपण्णा असे आहे, बोपण्णाचा जन्म कर्नाटक राज्यातील कुर्ग (कोडागु) या दक्षिण भारतातील ग्रामीण जिल्ह्यात दि. ४ मार्च १९८० रोजी झाला. बोपण्णा ११ वर्षांचा असताना त्याच्या मनात टेनिसविषयी गोडी निर्माण झाली व त्याने टेनिस खेळण्यास सुरुवात केली. त्याचे वडील कॉफी प्लांटर (कॉफीची शेती) आहेत तर आई गृहिणी आहे.

Rohan Bopanna’s Wife –

रोहन बोपण्णाचे लग्न बंगळूरूच्या सुप्रिया अन्नैयाशी झाले.

रोहन बोपण्णा (Rohan Bopanna) ची आवडती स्पर्धा व आवडता खिलाडू

रोहन बोपण्णाची आवडती स्पर्धा विम्बल्डन आहे आणि त्याचा आवडता खेळाडू स्टीफन एडबर्ग आहे.


रोहन बोपण्णाचे टेनिस करिअर

१९९६ ते २००१

  • भारत ITF ज्युनियर वर्ल्ड रँकिंग इव्हेंट, १९९६ मध्ये बोपण्णाने आपल्या पहिल्या ITF ज्युनियर स्पर्धेत प्रवेश केला त्याने गिरीश रामचंदानी विरुद्धचा पहिल्या फेरीचा सामना सरळ सेटमध्ये जिंकला.
  • बोपण्णाने रोहन सैकियासह १ ली अरब चॅम्पियनशिप १९९७ या वर्षी जिंकली. त्याचे हे पहिले कनिष्ठ स्तरावरील विजेतेपद होते. त्यानंतर त्याने रोहन सैकियासोबत अरब कॉन्ट्रॅक्टर्स इंटरनॅशनल ज्युनियर चॅम्पियनशिप देखील जिंकली.
  • वर्ष २००० ते २००१ दरम्यान बोपण्णाने आयटीएफ सर्किट टूर्नामेंट्समध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली होती परंतु त्याला फारसे यश मिळाले नाही कारण अनेकदा त्याची मोहीम पात्रता फेरीत किंवा मुख्य ड्रॉच्या पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत संपली. या कालावधीत त्याने केवळ काही वेळा उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत सामने खेळले होते.

२००२

  • बोपण्णाने (Rohan Bopanna) २००२ मध्ये ITF फ्युचर्स स्तरावर चांगले यश मिळवले. त्याने त्याच्या तैवानच्या भागीदार लू येन-ह्सूनसोबत UAE F2 फ्युचर्स जिंकले. हे त्याचे पहिले फ्युचर्स विजेतेपद होते.
  • ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक गट पात्रता सामन्यात त्याने डेव्हिस कपमध्ये पदार्पण केले. तो स्कॉट ड्रेपरविरुद्धचा एकेरी सामना ३-६,५-७ असा हरला.
  • आशियाई क्रीडा स्पर्धा – २००२ मध्ये त्याची निवड झाली होती. तो एकेरीत ११ व्या मानांकित स्थानी होता परंतु प्री-क्वार्टरमध्ये त्याला ३ ऱ्या मानांकित आणि जपानच्या कांस्यपदक विजेत्या ताकाओ सुझुकीकडून ५-७, २-६ ने पराभव पत्करावा लागला. सांघिक स्पर्धेत, त्याने सुनील-कुमार सिपाय्यासोबत एकेरी आणि दुहेरीचे सामने जिंकले.

२००३

  • (Rohan Bopanna )बोपण्णाने आफ्रो-आशियाई क्रीडा स्पर्धेत २००३ या वर्षी २ सुवर्णपदके जिंकली. दुहेरीत, त्याने महेश भूपतीशी भागीदारी केली जिथे त्यांनी उपांत्य फेरीत फिलिपाइन्सच्या अडेलो अबाडिया आणि जॉनी अर्किला यांचा सरळ सेटमध्ये पराभव केला.

२००८

  • बोपण्णाने लॉस एंजेलिस येथील कंट्रीवाइड क्लासिकमध्ये एरिक बुटोरॅक याच्या साथीदारासह पुरुष दुहेरीचे विजेतेपद २००८ या वर्षी पटकावले. हे त्याचे पहिले एटीपी विजेतेपद ठरले.

२०१२

  • बोपण्णाची लंडन येथे २०१२ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भूपतीच्या भागीदारीत पुरुष दुहेरी गटात भाग घेण्यासाठी निवड झाली ज्यामुळे बोपण्णाने ऑलिम्पिकमधील दुहेरी स्पर्धेसाठी लिएंडर पेसला भागीदारी करण्यास नकार दिला ज्यामुळे पेसने विष्णू वर्धनसोबत भागीदारी केली व शेवटी दोन संघ ऑलिंपिकमध्ये सहभागी झाले.
  • बोपण्णा आणि भूपतीने ४ नोव्हेंबर २०१२ रोजी पॅरिस मास्टर्सचे विजेतेपद पटकावले.
  • रोहन बोपण्णाने (Rohan Bopanna) पाकिस्तानी टेनिसपटू इसम-उल-हक कुरेशीसोबत अनेक वर्षे लोकप्रिय भागीदारी केली होती, ही जोडी “इंडोपाक एक्सप्रेस” म्हणून ओळखली जाते. रोहन बोपण्णा-इसम-उल-हक कुरेशी या जोडीने २०१० च्या यूएस ओपनमध्ये ते उपविजेतेपद पटकावले होते.
Rohan Bopanna
  • २०१२ आणि २०१५ मध्ये रोहन बोपण्णा एटीपी वर्ल्ड टूर फायनल्समध्ये वेगवेगळ्या भागीदारांसह अंतिम फेरीत सहभागी झाला होता.
  • २०१७ साली त्याने फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीत गॅब्रिएला डॅब्रोव्स्की सह चमत्कार करत टायटल जिंकले (महेश भूपती, लिएंडर पेस आणि सानिया मिर्झा नंतर असे करणारा तो चौथा भारतीय प्रमुख विजेता होता )
  • त्यानंतर आता २०२४ या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दुहेरीत दोन प्रमुख विजेतेपदे जिंकली आहेत, ओपन युगातील ते सर्वात जुने प्रमुख विजेते बनले आहेत.

२०१८ ते २०२३

  • (Rohan Bopanna) बोपण्णाने २०१८ आणि २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीत देखील प्रमुख अंतिम फेरी गाठली होती
  • बोपण्णाने (Rohan Bopanna) एटीपी टूरवर २४ दुहेरी विजेतेपदेही जिंकली आहेत, ज्यामध्ये मास्टर्स १००० स्तरावरील पाच विजेतेपदांचा देखील समावेश आहे,

२०२३

  • २०२३ या वर्षी रोहन बोपण्णाने ऑस्ट्रेलीयन टेनिसपटू मॅथ्यू एबडेन याच्याशी भागीदारी केली त्यांनतर २०२३ याच वर्षी कतार एक्सॉनमोबिल ओपनमध्ये त्याने मॅथ्यू एब्डेनसोबत संघ म्हणून पहिले विजेतेपद जिंकले. तसेच २०२३ मध्येच विम्बल्डनमध्ये अंतिम चॅम्पियन वेस्ली कूलहॉफ आणि नील स्कुप्स्की यांच्याकडून पराभूत होऊन या जोडीने उपांत्य फेरी गाठली. त्यामुळे १७ जुलै २०२३ रोजी पहिल्या १० मध्ये परतला.
  • तो २०२३ यूएस ओपनच्या अंतिम फेरीतही पोहोचला, अशा प्रकारे तो मेजरमधील सर्वात जुना फायनल ठरला.त्याच्या चांगल्या फॉर्ममध्ये सातत्य राखत, त्याने २०२३ रोलेक्स शांघाय मास्टर्स आणि २०२३ रोलेक्स पॅरिस मास्टर्स येथे दोन मास्टर्स १००० स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. २०२३ एटीपी फायनलमध्ये एब्डेन सोबत सामना जिंकणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला जेथे ही जोडी उपांत्य फेरीत पोहोचली.

२७ जानेवारी २०२४ रोजी रोहन बोपण्णाने इतिहास रचला

  • मग २७ जानेवारी २०२४ वार शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियन मॅथ्यू एबडेन यांनी संयुक्त विजेतेपद पटकावत अँड्रिया वावसोरी आणि सिमोन बोलेली यांच्यावर ७-६ (०), ७-५ असा विजय मिळवला. आणि इतिहास रचला गेला. आपल्या वयाच्या ४३ व्या वर्षी विजय संपादन केला व असे करणारा तो टेनिस जगतात सर्वात वयस्क खिलाडू ठरला. त्याबद्दल त्याचे अभिनंदन केले तेव्हढे कमीच आहे.

रोहन बोपण्णा (Rohan Bopanna) ची टेनिसमधील कमाई

१५ जानेवारी २०२४ पर्यंत जिंकलेल्या बक्षिसांची एकूण रक्कम आहे ६,२८६,५८६ $ ज्याची अंदाजे रुपयात किंमत आहे ५२,२५,०४,२७७.७९ रुपये. कित्येक स्पर्धांमध्ये अपयश पदरी पडूनसुद्धा हार न मानता आपल्या खेळात सतत सुधारणा करत जिंकण्याच्या उद्देशाने पुन्हा नवीन जोश व उर्जा घेऊन आपल्या प्रतिस्पर्ध्यासमोर उभे राहणे वाटते तेव्हडे सोपे नक्कीच नव्हते पण रोहनने आपल्यातला खिलाडू सतत जिवंत ठेवला, सरावातील सातत्य, योग्य आहार, व्यायाम, जीवनातील सरलता, आपल्या योग्यातेवरील विश्वास आणि जिंकण्याचा ध्यास या सर्व बाबी आजच्या नवीन पिढीस रोहन कडून नक्कीच शिकण्यासारख्या आहेत. आर्थिक कमाईपेक्षा रोहनने आपल्या वाढत्या वयावर मिळवलेला विजय हि त्याची खरी कमाई वाटते. वयाचे रडे रडणाऱ्यास देखील रोहनचा विजय प्रेरणा देणारा ठरला आहे हे निश्चित.

संबंधित सामन्याचे व्हिडीओ साठी खाली लिंक देत आहोत.

https://www.youtube.com/watch?v=d3VzDJgkKZk

आमच्या इतर क्रीडाविषयी ब्लॉग्स साठी येथे क्लिक करा.

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत