RRB Group D- रेल्वे मंत्रालयाकडून ३२००० पदांची मेगा भरती जाहीर – जाणून घ्या सविस्तर माहिती- भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत रेल्वे भरती बोर्ड (RRB) मार्फत CEN 08/2024 नुसार लेवल १ च्या गट “ड” पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३२००० जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

RRB Group D अर्ज करण्याची तारीख:
| ऑनलाईन अर्ज सुरूवात | २३ जानेवारी २०२५ |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | २२ फेब्रुवारी २०२५, रात्री ११:५९ पर्यंत |
पगार:
नियमानुसार ७ व्या वेतन आयोगाच्या (CPC) तत्वावर पगार दिला जाणार आहे. सुरुवातीला किमान वेतन १८,००० रुपये प्रतिमाह असणार आहे.
| पगार | १८००० |
वयोमर्यादा
उमेदवाराचे वय १ जुलै २०२५ रोजी १८ ते ३६ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
परीक्षा प्रक्रिया:
परीक्षा स्वरूप: संगणक आधारित चाचणी (CBT)
परीक्षा शुल्क:
| सामान्य (ओपन) आणि ओबीसी प्रवर्गासाठी: | ५०० रुपये |
| मागास प्रवर्ग, महिला आणि दिव्यांग उमेदवारांसाठी: | २५० रुपये |
RRB Group D अन्य महत्त्वाची माहिती:
सविस्तर जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामध्ये झोननिहाय तसेच प्रवर्गानुसार रिक्त पदांची माहिती दिली जाणार आहे. तोपर्यंत इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांची (जात प्रमाणपत्र, ओळखपत्र इ.) तयारी करून ठेवावी.
RRB Group D उमेदवारांसाठी सूचना:
- केंद्र सरकारच्या नियमांनुसार पात्रता निकष आणि भरती प्रक्रियेतील सर्व अटी व शर्तींचे पालन करणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांना रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल
- भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची संधी मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेकडे लक्ष ठेवावे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होताच अधिकृत संकेतस्थळावर सविस्तर माहिती उपलब्ध होईल.
