Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024 – समाज कल्याण विभागात विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. जाहिरात क्र.: सकआ/आस्था/प्र-2/पदभरती/जाहिरात/2024/3743 नुसार, उच्चश्रेणी लघुलेखक, गृहपाल/अधीक्षक (महिला), गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण), वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, निम्नश्रेणी लघुलेखक, समाज कल्याण निरीक्षक आणि लघुटंकलेखक अशा विविध पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे.
Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024 परीक्षेच्या तारखा जाहीर
भरती परीक्षेच्या तारखा निश्चित करण्यात आल्या असून, ४, ५, ६, ७, १०, ११, १२, १७, १८ आणि १९ मार्च २०२५ रोजी परीक्षा होणार आहे.

प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख
या परीक्षेसाठी प्रवेशपत्र २५ फेब्रुवारी २०२५ पासून उपलब्ध होणार असून, उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावरून ते डाउनलोड करता येईल.
अधिक माहिती व पुढील प्रक्रिया
उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळ आणि संबंधित अधिसूचनांकडे लक्ष ठेवावे. परीक्षेसंबंधी कोणतेही बदल अथवा सूचना अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केल्या जातील. अशी माहिती समाज कल्याण विभागाकडून सांगण्यात आली आहे
ही भरती प्रक्रिया अनेक इच्छुक उमेदवारांसाठी मोठी संधी ठरणार आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी परीक्षेसाठी योग्य तयारी करावी आणि वेळेत प्रवेशपत्र डाउनलोड करावे.
प्रवेशपत्रासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉग पोस्ट :
महिला व बालविकास विभागाच्या ICDS Bharti 2024 ची परीक्षा व प्रवेश पत्र जाहीर ! – ICDS Bharti 2024
AFCAT 2025: भारतीय हवाई दलाच्या भरतीसाठी प्रवेश पत्र जारी
रेल्वे संरक्षण दल (RPF) SI आणि कॉन्स्टेबल भरती 2024: प्रवेशपत्र जाहीर
