Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024 – महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात विविध पदांसाठी भरती करण्यात आली होती. समाज कल्याण भारती/ भरती २०२४ अंतर्गत उच्च श्रेणीतील स्टेनो, वॉर्डन (महिला), वॉर्डन (सामान्य), वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, निम्न श्रेणीतील स्टेनो, समाज कल्याण निरीक्षक आणि स्टेनो टायपिस्ट या एकूण २१९ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षा दि. 04, 05, 06, 07, 10, 11, 12, 17, 18 आणि 19 मार्च 2025 रोजी पार पडली होती. नुकतीच या परीक्षेची उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली आहे.

निकाल आणि उत्तर तालिका जाहीर-Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024
समाज कल्याण विभागाने सदर परीक्षेचा निकाल जाहीर केला असून अधिकृत उत्तर तालिका विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवार खालील लिंकवर जाऊन आपल्या उत्तरतालिकेची तपासणी करू शकतात:
उत्तरतालिकेची लिंक: Click Here
उत्तरतालिकेसंदर्भात सूचना आणि आक्षेप
उत्तरतालिका (Answersheets) दि. २८ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध असतील.
जर कोणत्याही उमेदवाराला उत्तरतालिकेबाबत काही सूचना अथवा आक्षेप नोंदवायचे असतील, तर त्यांनी स्वतःच्या लॉगिनवर जाऊन २८ मार्च २०२५ पर्यंत आपले आक्षेप किंवा सूचना नोंदवाव्यात.
महत्वाची बाब म्हणजे इतर कोणत्याही माध्यमातून आलेल्या सूचना अथवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, असे समाज कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना: Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024
✔️ उत्तरतालिकेची पडताळणी वेळेत करा.
✔️ आक्षेप असल्यास फक्त ऑनलाइन पद्धतीनेच नोंदवा.
✔️ अंतिम निकालासाठी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवा.
अधिक माहितीसाठी समाज कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
