शिवरायांचा धर्मवीरपुत्र श्री छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा ! – Sambhaji Maharaj

Sambhaji Maharaj

Vishal Patole
Sambhaji Maharaj

दि. १४ मे १६५७ रोजी हिंदुस्थानचा सिंह छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांना Sambhaji Maharaj नावाचे पुत्ररत्न प्राप्त झाले. जे आपल्या पराक्रमाने हिंदुस्थानच्या इतिहासात अजरामर झाले.

Contents
Sambhaji Maharaj

संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांचा जन्म आणि बालपण

संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला, त्यांना आईचे प्रेम जास्त काळ मिळू शकले नाही. Sambhaji Maharaj केवळ २ वर्षांचे असताना त्यांच्या आई व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी सईबाई यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात संभाजी राजे मा जिजाऊ यांच्या अंगा खांद्यावर बागडले व त्यांच्याच छत्रछायेत बाळ संभाजी यांची जडणघडण झाली. एवढ्या कमी वयात आईचे छत्र हरवल्यामुळे पुण्याजवळ असलेल्या कापूरहोळ या ठिकाणची “धाराऊ” नावाची माउली बाळ संभाजी यांची “दुध आई” बनली. अशारीतीने बालपणापासूनच संभाजी महाराज यांच्या संघर्षपूर्ण जीवनाची सुरुवात झाली. सावत्र आई पुतळाबाई यांची बाळ संभाजी राजे यांच्यावर खूप माया होती मात्र दुसरी व सावत्रआई आणि राजाराम महाराजांच्या सख्या मातोश्री सोयराबाई यांनी संभाजी राजेंना सतत परकेपणाने वागविले व त्यांना आईची माया दिली नाही.

MARATHI FILM BASED ON THE LIFE OF SAMBHAJI MAHARAJ SHIVRAYANCHA CHHAVA TRAILER

बाळ संभाजी राजे (Sambhaji Maharaj) यांचे बालपणीचे पराक्रम

  • Sambhaji Maharaj ९ वर्षांचे असताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी ११ जून १६६५ रोजी पुरंदर च्या तहावर सही केल्याप्रमाणे पुरंदरच्या तहाचे पालन योग्य रीतीने होते किंवा नाही हे पाहण्यासाठी म्हणून संभाजी राजे यांना राजे जयसिंग यांच्यासह राहण्यासाठी पाठवले गेले.
  • १२ मे १६६६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज शंभू राजांना घेऊन औरंगजेबच्या आग्र्याच्या दरबारात गेले असता, त्यांनंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना औरंगजेबाने नजरबंद केले. त्यानंतर २२ जुलै १६६६ रोजी शिवाजी महाराज संभाजी राजेंना घेऊन नजरबंदीतून व मृत्युच्या दाढेतून निसटले.
  • आग्र्यातुन निसटल्या नंतर शिवरायांनी संभाजी राजेंना मोरोपंत पेशव्यांचे मेहुणे कृष्णाजी पंत यांच्या घरी ठेवले जेणेकरून औरंगजेबाची फौज त्यांना शोधू शकणार नाही.
  • अगदी कमी वयातच संभाजी राजेंनी मराठी, संस्कृत, उर्दू, अरबी, फारसी, इंग्रजी आणि ब्रज या सर्व भाषांवर प्रभुत्व प्राप्त केले होते.
  • वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी बुधभूषण, नखशिख, नायिकाभेद नावाच्या ग्रंथांची संस्कृत भाषेत निर्मिती केली.
Sambhaji Maharaj

Sambhaji Maharaj Rajyabhishek- संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक

दि ३ एप्रिल १६८० रोजी प्रदीर्घ आजारानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघर्षपूर्ण जीवनाचा अंत झाला मात्र मृत्यूपूर्वीच शिवाजी महाराजांनी आपले सेनापती हंबीरराव मोहिते यांना आपल्या पश्चात संभाजी राजे यांचा राज्याभिषेक करावा असे सूचित केलेले होते. त्यानंतर एक गट संभाजी महाराजांचे बंधू राजाराम महाराज यांचा राज्याभिषेक करण्याच्या तयारीत असतांना आणि हंबीरराव स्वत: राजाराम महाराजांचे सख्खे मामा असताना देखील त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इच्छेनुसार दि १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी राजे यांचा राज्याभिषेक विधिवत पद्धतीने केला. त्यासाठी सेनापती हंबीररावांनी संभाजी राजेंचा विरोध करणारे अण्णाजीपंत आणि मोरोपंत यांना अटक देखील केली होती.

श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरीव राजते, यंदकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरी

छत्रपती संभाजी महाराज यांचे राजब्रिदवाक्य
CHHATRAPATI SAMBHAJI TRAILER- MARATHI FILM BASED ON THE LIFE OF SAMBHAJI MAHARAJ

एक पराक्रमी योद्धा Chhatrapati Sambhaji Maharaj

छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj ) यांनी आयुष्याची २५ वर्षे हे औरंगजेबासोबत संघर्ष केला आणि मुघलांची गुलामी केव्हाही स्वीकारली नाही. छत्रपती संभाजी राजे यांनी त्यांच्या कारकिर्दीत शिवरायांचे स्वराज्य हे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री ते नागपूर आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेश ते दक्षिण भारतातील तंजावर पर्यंत आपल्या पराक्रमांनी विस्तारले. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत ते अजेय राहिले कोणतेही युद्ध ते हरले नाहीत. छत्रपती संभाजी महाराज यांनी १२० पेक्षा जास्त लढाया लढल्या आणि त्या सर्व लढाया त्यांनी जिंकल्या. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात रायगड हि स्वराज्याची राजधानी होती.

Chhatrapati Sambhaji Maharaj- छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य आणि संघर्ष

अखंड हिंदुस्तानवर एकछत्री राज्य उभे करण्याच्या उद्दिष्टासाठी शिवाजी महाराज व त्यांचे स्वराज्य जिंकण्यासाठी औरंगजेब ५ लाखाच्यावर सैन्य, हत्ती, घोडे व फौजफाटा घेऊन दक्षिणेत धडकला. त्यासोबतच सिद्दी, पोर्तुगीज, डच, इंग्रज इत्यादी दुश्मन शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर डोळा ठेऊन होते. दरम्यानच्या काळात शिवरायांचा मृत्यू झालेला असतांना या अतिशय वाईट परिस्थितीत छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj ) यांनी स्वराज्याचे सूत्रे हाथी घेतली परकीय संकटे कमी म्हणून कि काय स्वराज्यातील अंतर्गत शत्रू व स्वकीयांचा विरोध या सर्व आघाड्यांवर संभाजी राजे लढत होते. एवढ्या सर्व शक्तींच्या विरोधात तब्बल २५ वर्षे ते सतत लढत होते. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या शक्तींविरोधात कधी आमने सामने तर कधी गनिमी पद्धतीने लढाई लढत राहिले. त्यांनी कधीही मुघलांची गुलामी पत्करली नाही. संभाजी राजांनी शेकडो लढाया लढल्या आणि त्या सर्व जिंकल्या क्वचितच ठिकाणी त्यांना युद्धातून माघार घ्यावी लागली. महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महारांच्या नंतर छत्रपती संभाजी राजेंच्या सारखा पराक्रमी राजा पुन्हा झाला नाही. धर्मप्रेमी राजा ज्याने आपल्या अंतिम क्षणापर्यंत आपल्या धर्मावर आढळ विश्वास ठेवला, ज्याने आपली जीभ कापली जात असताना, डोळे फोडले जात असतांना आणि हाथ, पाय तोडले जात असतांना देखील स्वराज्य आणि स्वधर्म म्हणजेच हिंदू धर्माचा त्याग केला नाही. अंतिम क्षणापर्यंत औरंगजेबला शिवाजी नावाच्या सिंहाचे दर्शन छत्रपती संभाजी महाराज देत राहिले.

Sambhaji Maharaj

संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) नातेसंबंध आणि स्वराज्यांतर्गत विरोध

जन्मापासूनच सावत्र आई सोयराबाई यांची परकीय वागणूक त्यानंतर सत्तेसाठी विरोध, आपला मुलगा राजाराम राजा व्हावा म्हणून राजांना अष्टप्रधान मंडळाचा विरोध पत्करावा लागला. अण्णाजी दत्तो, मोरोपंत हे लोक संभाजी राजांच्या विरोधात गेले.

संभाजी राजे (Sambhaji Maharaj) यांची पत्नी – Sambhaji Maharaj Wife Name

शिवरायांनी स्वराज्याची व्याप्ती वाढवण्यासाठी कित्येक छोट्या मोठ्या देशमुखांना, मनसबदारांना, प्रांतीय सरदारांना एकत्रित करण्याचा आटोकाट प्रयत्न केला असाच कोंकणातील शिरकाण,महाड, रायगड ते दक्षिणेला सावंतवाडीपर्यंतचा भाग शिर्के राजेंच्या अधिपत्याखाली होता. हा सर्व प्रदेश स्वराज्यात यावा म्हणून छत्रपती शिवरायांनी शिर्केंच्या मुलाला म्हणजेच गणोजी शिर्के यांना जावाई करून घेतले त्यासोबतच शिर्केंची मुलगी सून म्हणून पदरात घेतली त्यानुसार गणोजी च्या बहिणीचा विवाह संभाजी महाराज सोबत करून दिला गेला. Sambhaji Maharaj Wife Name संभाजी महाराजाच्या पत्नीचे नाव येसूबाई असे होते. संभाजी राजे आणि येसूबाई यांना भवानीबाई नावाची एक मुलगी तर शाहू नावाचा मुलगा झाला.

छत्रपती संभाजी महाराज (Chatrapati Sambhaji Maharaj) आणि शिर्के संघर्ष

शिवाजी महाराजांच्या मते नातेवाईकांत वतने वाटली नाही गेली पाहिजेत जेणेकरून स्वराज्यासाठी लढणाऱ्या सर्वसामान्य सैनिक आणि माळव्याच्या मनात चुकीची भावना निर्माण होऊ नये व स्वराज्य हितासाठी हे आवश्यक देखील होते परंतु शिर्के शृंगारपुरच्या वतनदारीसाठी हट्ट धरून बसले आणि शिवाजी महाराजांना त्यांना नकार देणे योग्य वाटत नव्हते म्हणून वेळ मारून नेण्याकरिता शिवाजी महाराजांनी गणोजी शिर्के यांना शब्द दिला कि, गणोजी शिर्के यांना जेव्हा पुत्र होईल तेव्हा शृंगारपुराचे वतन त्यांना दिले जाईल. परंतु शिवाजी महाराजांचा अकाली मृत्यू झाला. त्यानंतर स्वराज्याची सूत्रे छत्रपती संभाजी राजे (Chatrapati Sambhaji Maharaj) यांच्या हाती आले व दरम्यान च्या काळात शिर्के यांना पुत्ररत्न प्राप्त झाले तेव्हा त्यांच्याकडून वतनाची मागणी सतत होऊ लागली. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला आणि संकल्पनांना पुढे नेतांना मात्र संभाजी राजांकडून शिर्केंच्या वतनदारी बाबत चाल ढकल होऊ लागली, तसेच कवी कलश छत्रपती संभाजी महाराजांच्या जवळ होऊ लागले. ते इतरांना सहन होत नव्हते. शिर्क्यांचा संयम तुटू लागला व ते संघर्षासाठी सज्ज झाले म्हणून कवी कलश शृंगारपुरावर व शिर्क्यांवर चालून गेले , तिकडून शिर्क्यानी त्यांना पळवून लावले मग कवी कलश खेळणा किल्ल्यावर (विशालगडावर) गेले हि बातमी कवी कलशांनी छत्रपती संभाजी राजांना कळवली. त्यांनतर छत्रपती संभाजी महाराजांनी (Chatrapati Sambhaji Maharaj) स्वत:च्या पत्नीस विश्वासात घेऊन शिर्क्यांवर आक्रमण केले व त्यांचा बेत हाणून पाडला. परंतु मग शिर्के औरंगजेबास जाऊन मिळाले.

Chatrapati Sambhaji Maharaj

छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) आणि मुरुड जंजिरा किल्ला संघर्ष

ज्यावेळी (Murud Janjira) मुरुड जंजिरा किल्ल्यावर आफ्रिकेतून आलेले हबशी बंधू सिद्दी खैरत खान आणि सिद्दी कासम खान राज्य करत होते त्यावेळी हे लोक तटावर जायचे लोकांना पकडून बळजबरीने गुलाम बनवायचे तसे न केल्यास त्यांचे कान, नाक कापायचे सर्वसामान्य लोकांच्या घरातील महिला दिवसा ढवळ्या पळविल्या जात असे, त्यांच्यावर बलात्कार केल्या जात असे, अशाप्रकारच्या कित्येक तक्रारी संभाजी महाराजांना स्थानिक रयतेकडून येऊ लागल्या. यातून मार्ग काढणे म्हणजे जंजिरा हस्तगत करणे हे महाराजांना कळून चुकले होते मग आपल्या विश्वासातील कोन्डोजी फर्जंद यांच्यासह एक डाव आखला त्यानुसार कोन्डोजी आणि त्यांचे ३०-४० मावळे यांनी (Murud Janjira) जंजिरा किल्ल्यात जाऊन सिद्दीला विश्वासात घेऊन मग त्याला फसवून त्याचा संपूर्ण दारू गोळा नष्ट करायचा व मग (Murud Janjira) जंजिरा किल्ल्यावर हमला करून तो ताब्यात घ्यायचा असा तो डाव होता मात्र हा डाव अशस्वी ठरला कोन्डोजी व त्यांचे सहकारी पकडल्या गेले व सिद्धींनी त्या सर्वांच्या कत्तली केल्या. मात्र त्यातील एक मावळा वाचला त्याने थेट समुद्रात उडी घेतली व तो पोहोत किनाऱ्यावर पोहचला त्याने सर्व प्रकार संभाजी राजांना सांगितला. संभाजी राजेंना आपल्या मावळ्यांचा दुर्दैवी वृतांत ऐकून अश्रू अनावर झाले. परंतु कोन्डोजीचा बळी व्यर्थ जाऊ द्यायचा नाही म्हणून महाराजांनी २०००० ची फौज आणि ३०० गलबते घेऊन जंजिरा किल्ल्यावर हमला केला. तोफा डागल्या गेल्या. जंजिरा हादरला . सिद्दीच्या महालाच्या काचा फुटल्या. मात्र समुद्राला आलेल्या भरतीने हल्ला कमकुवत होऊ लागला. मराठा सैन्य माघारी हटू लागले मग महाराजांनी समुद्रात सेतू बांधण्याचे आदेश दिले. सेतू तयार होत होता. तोपर्यंत हि बातमी औरंगजेब पर्यंत पोहोचली मराठेशाही चा पाडाव करण्यासाठी आणि संपूर्ण हिंदुस्तानवर कब्जा करण्यासाठी ५ लाखाची फौज घेऊन दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाने हसन अली नावाच्या सरदारला ४० हजाराची फौज घेऊन कल्याण भिवंडी मार्गे रायगड किल्ल्यावर हल्ला करण्यास पाठवले त्यामुळे नाईलाजास्तव संभाजी राजांना मुरुड जंजिरा हि मोहीम अर्ध्यावर सोडून स्वराज्याच्या रक्षणासाठी परत रायगडाकडे वळावे लागले. नंतरच्या काळात जंजिरा (Murud Janjira) किल्ल्यासारखाच एक दुर्ग संभाजी राजांनी समुद्रात बांधला ज्याचे नाव पद्मदुर्ग असे आहे.

Sambhaji Maharaj

छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) आणि कवी कलश यांची मैत्री

इतिहासात छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची मैत्री अजरामर झाली कारण मृत्युच्या अंतिम क्षणी देखील हे दोन मित्र एकमेकांसोबत होते. एकमेकांना साहस देत होते आणि औरंगजेबाला न घाबरता त्याचे अन्याय स्वत:च्या शरीरावर झेलत होते. हे दोघे मित्र सोबतच मृत्यू पावले आणि त्यांची मैत्री नेहमीसाठी अजरामर झाली. काही इतिहासकारांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून औरंगजेबच्या कैदेतून बाहेर पडले तेव्हा संभाजी राजेंना त्यांनी मथुरेत मोरोपंतांच्या मेहुन्याकडे पाठवले होते तेव्हाच छत्रपती संभाजी यांची भेट कवी कलश यांच्याशी झाली असे म्हणतात तर काहींच्या मते उत्तरेकडील औरंजेबाच्या त्रासाला वैतागून बरेच कलाकार छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात आश्रयास आले त्यापैकीच एक कवी कलश हे देखील होते असे म्हणतात. काही का असेना पण संभाजी राजे आणि कवी कलश यांची मैत्री खूप गहरी व एकमेकास जीवास जीव देणारी अशीच होती. याबद्दल मात्र दुमत नाही.

Chhatrapati Sambhaji Maharaj

Chhatrapati Sambhaji Maharaj History – छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू हाच मुळात एक इतिहास आहे

संभाजी राजे आणि कवी कलश यांना अटक (Chhatrapati Sambhaji Maharaj History)

शिर्क्यांच्या विरोधात कार्यवाही संपवून त्यानंतर एकवेळी रायगडला जात असतांना संगमेश्वर येथे आपल्या मोजक्या सैन्यासह छत्रपती संभाजी राजांना थोड्याफार कामासाठी काही काळासाठी थांबावे लागले या दरम्यान त्यांच्यासोबत केवळ २०० सैनिक होते परंतु ते गुप्तमार्गी जात येत असल्याने विशेष चिंतेत नव्हते. ऐनवेळी जवळच्या लोकांनी दगा केला. त्यामुळे त्यांच्या मार्गाची इत्यंभूत माहिती औरंगजेबाला मिळाली. औरंगजेबाने तत्काळ मुकर्रबखानाला कार्यवाहीचे आदेश दिले. मुकर्रबखान अत्यंत वेगाने चाल करून आला. स्वराज्यातील अंतर्गत कलह आणि वैर तसेच सूडबुद्धी विचारांनी घात केला, दगा झाला, गुप्त मार्ग दाखवले गेले. शेवटी सरदेसाई यांच्या वाड्यानजीकच्या बंदराजवळ आपल्या जवळच्याच लोकांनी केलेल्या दग्यामुळे संभाजी राजे व कवी कलश यांना १ फेब्रुवारी १६८९ रोजी संगमेश्वर येथे संभाजी राजे आणि कवी कलश यांना मुकार्रबखानाने मुघली सैन्याच्या मदतीने अटक केली.

Sambhaji Maharaj

नगरजिल्ह्यतील, पांडेपेडगाव चा भुईकोट किल्ला (बहादूर गड – धर्मवीर गड) येथे संभाजी राजे आणि कवी कलश यांचे डोळे काढले (Chhatrapati Sambhaji Maharaj History)

गेल्या २५ वर्षांत औरंगजेब्च्या मनात मराठ्यांविषयी अशी दहशत तयार झाली होती कि, त्याला चैन मिळत नव्हता. त्यामुळेच संभाजी राजेंना पकडल्यावर देखील औरंगजेबाचे मन अशांत होते. कधी कुठून मराठे येतील आणि आपल्या राजाला सोडवून घेऊन जातील म्हणूनच त्याने मुकर्रबखानाला संभाजी राजेंना घेऊन नगर च्या पांडेपेडगाव चा भुईकोट किल्ला (बहादूर गड – धर्मवीर गड) याठिकाणी त्वरित पोहोचण्यास सांगितले. त्यानंतर ५ ते ६ दिवसाचा रस्ता मुकार्रबखानाने केवळ दोन ते अडीच दिवसात पूर्ण केला. हि दहशत मराठ्यांनी निर्माण केलेली होती. एवढेच काय तर गनिमी काव्याने मराठे लढतील म्हणून सपाट ठिकाणी असलेला नगर चा पांडेपेडगाव चा भुईकोट किल्ला (बहादूर गड – धर्मवीर गड) त्याने संभाजीच्या कैदेसाठी निवडला. त्याठिकाणी संभाजी राजे आणि कवी कलश यांना औरंगजेबासमोर साखळदंडात जखडलेल्या अवस्थेत पेश करण्यात आले.

Sambhaji Maharaj

या कैदेत असतांनाही संभाजी राजांचा आवाज हा सिंहाच्या गर्जनापेक्षा कमी नव्हता तो एकून औरंगजेब काही काळ गांगरला त्याला काही सुचेनासे झाले तो तख्तावरून खाली उतरला व नमाज पढू लागला. या प्रसंगी महाराज कवी कलशांना खुणावून विचारू लागले कवी कलश बघा काही सुचतंय का? त्यावेळी त्याही अवस्थेत कवी कलश यांनी एक छंद संभाजीराजेंसाठी सादर केला तो या प्रमाणे-

“यवन रावण की सभा संभू बंध्यो बजरंग।
लहू लसत सिन्दूर सम खूब खेल्यो रनरंग॥
ज्यों रबि छबि लखतहि नथित होत बदरंग।
त्यौं तव तेज निहारके तख्त त्यजो डोरंग॥”
ज्याचा मराठी अनुवाद असा कि :
“रावणरुपी औरंग्याच्या सभेत हनुमानाप्रमाणे शंभूराजाला बांधून आणले, घनघोर युद्धामध्ये प्रचंड रणकंदन केल्यानंतर रक्ताने माखलेले शंभूराजांचे सर्वांग शेंदूर लावलेल्या हनुमानाप्रमाने शोभून दिसते. ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजवा निस्तेज होतो. त्याचप्रमाणे तुझे तेज पाहून निस्तेज झालेला औरंग्या आपले सिंहासन त्यागून तुझ्यासमोर गुढगा टेकून नतमस्तक झाला आहे.”

नगर च्या बहादूर गड येथे कैदेत असतांना कवी कलश यांचा शंभू राजांसाठी केलेला छंद

हा सर्व प्रकार पाहून चिडलेल्या औरंग्याने शंभू राजे आणि कवी कलश यांना कोड्याने फटके द्यायचे सांगितले, नंतर भाल्याने व इतर टोकदार शस्त्राने त्या दोघांच्या देखील शरीरावर घाव केले गेले. नंतर मंद हास्य करत औरंगजेब म्हणाला संभा, जर तुझे स्वराज्य तू मुघलाईत विलीन करून टाकले व जर तू इस्लाम धर्म स्वीकारलास तर मी तुझी सुटका करीन. हे शब्द ऐकताच शंभू राजांचा राग उसळून आला ते अत्यंत भेदक नजरेने औरंगजेबाला नखशिखांत पाहत गरजले अरे, तुझी मुलगी दिलीस तरीही मी माझ्या प्राणापेक्षा बहुमोल अश्या माझ्या दैवताचे स्वराज्य आणि हिंदू धर्म सोडणार नाही. आणि त्याला तुझ्यासारख्या नराधमाच्या पायदळी तुडवणार नाही.

Sambhaji Maharaj

हे एकूण औरंगजेब अत्यंत क्रोधीत झाला, शंभूराजांचे डोळे व नजर त्याला तीक्ष्ण बाणासारखी बोचू लागले, शंभू राजांच्या प्रखर शब्दांचे बाण औरंगजेबाच्या सर्वांगाला वेदना देऊ लागले. त्याच्या रागाला जागा करून देत त्याने तप्त सळयांनी शंभू राजांचे डोळे तत्काळ काढण्याचे आदेश दिले. लागलीच लालबुंद तप्त लोखंडाच्या सळया दरबारात आणल्या गेल्या. आणि शिवरायांचा सिंहासमान शिवपुत्राच्या डोळ्यात टाकल्या गेल्या तसाच सिंह गरजल्याचा आवाज बाहेर पडला. व दरबारात एकदम शांतता पसरली. मग कवी कलश यांचे देखील डोळे तत्प सळ्याने काढले गेले. एवढ्यावरच न थांबता शंभू राजे व कवी कलश यांना विदूषकाचे कपडे घातले गेले व त्या अवस्थेतच संपूर्ण परिसरात त्यांना फिरवल्या गेले. एक धर्मवेडा औरंगजेब आपली ५ लाखाची फौज घेऊन लढत होता एका हत्यारविहीन साखळदंडात बांधलेल्या, डोळे गमावून बसलेल्या स्वधर्मप्रेमी, ज्ञानी, पराक्रमी अशा शंभू महाराजांच्या विरुद्ध आणि आपण जिंकलो अशी स्वत:ला खोटे आश्वासन देण्याचा प्रयत्न करत होता परंतु एक हताश, नैराश्याने ग्रासलेला, २५ वर्षांच्या पराभवांनी पिसाट झालेला औरंगजेब आणि त्याच्यासमोर उभा असलेला साखळदंडातील अजेय, अजिंक्य, सिंहरुपी, शिवपुत्र संपूर्ण जग उघड्याडोळ्याने पाहत होतं.

Chhatrapati Sambhaji Maharaj History

४० दिवस नरक यातना देत अत्यंत हालअपेष्टा करत शेवटी औरंगजेबाने शंभू राजांना मृत्युदंड देऊन त्यांच्या मृत शरीराचे तुकडे तुकडे करून त्रिवेणी संगमावर फेकून दिले. (Chhatrapati Sambhaji Maharaj History)

जेव्हा औरंग्याने बघितले कि शंभू राजे नमत नाहीत तेव्हा आपल्या खूप मोठ्या फौजेला घेऊन तो अशी जागा शोधू लागला जेथे ५ लाख सैनिकांचा पिण्याच्या पाण्याचा व खाण्यापिण्याची व्यवस्था होऊ शकेल त्यासोबतच तो असे हिंदूंचे प्रसिद्ध ठिकाण शोधू लागला जेथे शंभू राजेंना उघड्यावर मृत्युदंडाची शिक्षा देऊन स्वराज्यावर विश्वास असणाऱ्या समाजाच्या मनात व विशेष करून हिंदूंच्या मनात आपली दहशत बसविता येईल. त्यासाठी त्याने तीन नद्यांचे संगम होणारे तुळापुर हे गाव निवडले. तुळापुर याठिकाणी औरंगजेबने शंभू राजांचा अनन्वित छळ केला. दरम्यान तो सतत शंभू राजांना स्वराज्य मुघलांच्या ताब्यात देण्यासाठी आणि शंभू राजांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास विचारणा करू लागला परंतु. महाराजांच्या विरोधी गर्जना औरंग्याचे कानशिलातून रक्त काढत होत्या, नैराश्येने ग्रासलेल्या औरंगजेबाने मग महाराजांची जीभ चिमट्याने उपटून काढण्याचे आदेश दिले, दुसऱ्या दिवशी हात व पायाची नखे चिमट्याने उपटून काढले, शरीरावर असंख्य जखमा दिल्या, चामडी सोलून काढली, एकेका दिवशी महाराजांचे एकेक बोट शरीरावेगळे केले गेले. तरीही हा रुद्रप्रतापी, दृढनिश्चयी, सिंह डगमगला नाही. मग त्यांचे हात तोडले गेले, पाय तोडले गेले तरीही प्राण सोडला नाही कारण माझ्या स्वराज्याला माझी गरज आहे हीच इच्छा त्यांच्या मरणाला दूर ठेऊन होती, इथे साक्षात मृत्यू देखील नतमस्तक झाला, तब्बल ४० दिवस एवढ्या यातना देऊन सुद्धा समोर जिवंत शंभू राजांना पाहून नतमस्तक झालेला औरंगजेब म्हणाला “माझ्या चार मुलांपैकी एक जरी तुझ्यासारखा असता तर मी संपूर्ण हिंदुस्तान केव्हाच काबीज केला असता !” शेवटी राक्षसी प्रवृत्तीच्या नराधम औरंगजेबने ११ मार्च १६८९ रोजी छत्रपती संभाजी राजे यांचे मुंडके धडावेगळे करण्याचा आदेश दिला आणि इंद्रायणी, भमा आणि भीमा नदीच्या त्रिवेणी संगमावर, शाहूमहराजांनी जीर्णोद्धार केलेल्या संगमेश्वर मंदिरासमोरच , तुळापुर गावात शंभू राजांचे शीर धडावेगळे केले गेले. मात्र त्यानंतर देखील या नरक यातना थांबल्या नाहीत तर महाराजाच्या मृत शरीराचे बारीक तुकडे करून इंद्रायणी, भमा आणि भीमा नदीच्या त्रिवेणी काठावर फेकून देण्यात आले.

Chhatrapati Sambhaji Maharaj History

कवी कलश यांना मृत्युदंड

संभाजी राजेंचे प्रियमित्र कवी कलश शेवटच्या क्षणांपर्यंत त्यांच्यासोबत होते. वेगवेगळे आमिषे त्यांनाही दिल्या गेले परंतु ते देखील संभाजी राजांचेच मित्र. कोठेही नतमस्तक झाले नाहीत. फितूर झाले नाही. शेवटी कवी कलश यांना देखील मृत्यूदंड दिला गेला. आजही छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश त्यांच्या समाध्या तुळापुर गावात शेजारी शेजारी बांधण्यात आलेल्या आहेत.

Chhatrapati Sambhaji Maharaj History


छत्रपती संभाजी महाराज यांचा अंत्यविधी (Chhatrapati Sambhaji Maharaj History)


जनाबाई परटीन नावाची स्थानिक महिला नदीकाठावर गेली असतांना त्यांनी सर्वप्रथम संभाजी महाराजांच्या शरीराचे छिन्नविच्छिन्न झालेले तुकडे पहिले. त्यानंतर त्या माउलीने गावातील इतर महिलांना हि माहिती दिली. परंतु संपूर्ण घटनाक्रमामुळे गावात बसलेल्या दहशतीमुळे कोणीही पुढे येण्यास धजत नव्हते. मात्र गावातील महिलांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला व काही मोजक्या महिलांनी मध्यरात्री नदीकाठाकडे धाव घेतली, यामध्ये या महिलांना साथ मिळाली ती तेथील एका (एस. सी.) महार समाजाच्या गोविंद महार या निधड्या छातीच्या व्यक्तीची त्यानंतर वढू गावातील ग्रामस्थांनी संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे गोळा केले. पण महाराजांना अग्नी कोणाच्या जागेत द्यावा असा प्रश्न उपस्थित झाला कारण औरंगजेबाची भीती सर्वांच्या मनात निर्माण झाली होती. तर गोविंद महार यांनी आपल्या जिवाजी परवा न करता आपली तुळापुर पासून जवळच असलेल्या वढू बुद्रुक येथील जागा महाराजांच्या अग्नीसाठी दिली आणि याच जागेवर छत्रपती संभाजी महाराज यांचा अंत्यविधी केला गेला. आजही वढू बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची दुसरी समाधी उपस्थित आहे.


FEQ

प्रश्न . संभाजी महाराज जयंती (Sambhaji Maharaj Jayanti)
उत्तर – संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी झाला त्यामुळे संभाजी महाराजाची जयंती तारखेनुसार १४ मे रोजी येते.

प्रश्न . छत्रपती संभाजी महाराज जयंती (chhatrapati sambhaji maharaj jayanti)
उत्तर – छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी झाला त्यामुळे संभाजी महाराजाची जयंती तारखेनुसार १४ मे रोजी येते.

प्रश्न . संभाजी महाराज जन्म तारीख (sambhaji maharaj birth date)
उत्तर – छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी झाला

प्रश्न . संभाजी महाराज राज्याभिषेक तारीख (sambhaji maharaj rajyabhishek date )
उत्तर – १६ जानेवारी १६८१

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल हिंदी भाषेत अधिक माहिती युटूब व्हिडीओ च्या माध्यमातून जाणून घेण्यसाठी येथे क्लिक करा.

मुरुड जंजिरा किल्ल्याविषयीचा आमचा ब्लॉगसाठी येथे क्लिक करा.

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
10 टिप्पण्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत