–
ZEE TV च्या ‘सारेगमपा’ SAREGAMAPA या कार्यक्रमाच्या २०२५ सिझन च्या गेल्या पाच महिन्यांच्या अथक मेहनतीने सूर-तालावर प्रभुत्व मिळवून, सचिन-जिगर, सचेत-परंपरा आणि गुरु रंधावा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली स्पर्धेतील अंतिम स्पर्धकांनी ग्रँड फिनालेत संगीताचा अविस्मरणीय जादू करून दाखविली. या अटीतटीच्या रोमांचक स्पर्धेत मुंबईच्या श्रद्धा मिश्रा (Shraddha Mishra) हिने विजेतेपद पटकावून तिच्या गाण्याच्या प्रवासाला सुवर्णमोहोर लावली.
(Shraddha Mishra) श्रद्धाने विजेतेपदाची ट्रॉफी उचलताच प्रेक्षकांच्या कडाडणाऱ्या टाळ्यांनी आणि जल्लोषाने संपूर्ण वातावरण भारावून गेले. अंतिम फेरीत सुभाश्री देबनाथ आणि उज्वल मोटिराम गजभरे यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय उपविजेतेपद पटकावून आपली चुणूक दाखवली.
ग्रँड फिनालेच्या रंगतदार संध्याकाळी गुरु रंधावा, सचिन-जिगर आणि सचेत-परंपरा यांनी आपल्या सुपरहिट गाण्यांच्या मेडलीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. उदित नारायण (Udit Narayan) आणि कविता कृष्णमूर्ती (Kavita Krushnmurti) यांसारख्या दिग्गज गायकांनी सोहळ्याला वाद्यांपासून सूरांपर्यंतची जादू दिली. त्याचबरोबर माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनी आपल्या खास किस्स्यांनी आणि भांगड्याच्या दमदार सादरीकरणाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले.

SAREGAMAPA विजेती श्रद्धा मिश्रा म्हणाली:
“‘सारेगमपा’ SAREGAMAPA वरील माझा प्रवास हे माझ्या आयुष्याचे स्वप्न साकार झाल्यासारखे आहे. सचिन-जिगर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘धोकेबाजी’ हे माझे पहिले ओरिजनल गाणे रेकॉर्ड करणे हा माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. या गाण्याला मिळालेल्या प्रेमाने मी भारावून गेले आहे. मी माझ्या गाण्याच्या प्रवासासाठी नव्या जोमाने सज्ज आहे. या सुंदर प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार!”
फिनालेच्या विशेष भागात उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी मार्गदर्शकांसोबत गाणी सादर केली. तर हरभजन सिंग यांनी ILT20 ट्रॉफीचे अनावरण करत सोहळ्यात अधिक उत्साह निर्माण केला. अंतिम चार स्पर्धक – श्रद्धा मिश्रा, उज्वल मोटिराम गजभरे, सुभाश्री देबनाथ आणि बिदिशा हातिमुरिया यांनी जबरदस्त सादरीकरण करत प्रेक्षकांना खिळवून ठेवले आणि या हंगामाला अविस्मरणीय समाप्ती दिली.
सचिन सांगवी म्हणाले:
(Shraddha Mishra) “श्रद्धाची मेहनत, सातत्य, आणि तिचा परिपूर्णतेचा ध्यास खरोखर प्रेरणादायी आहे. हंगामातील प्रत्येक स्पर्धकासाठी हे मोठे व्यासपीठ ठरले. श्रद्धामध्ये मला माझी धाकटी बहीण सापडल्यासारखे वाटले. मी तिला आणि सर्व स्पर्धकांना त्यांच्या यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा देतो.”
जिगर सरैया म्हणाले:
“सहाही अंतिम स्पर्धक हे खरे विजेते आहेत. श्रद्धा तिच्या बहुमुखी प्रतिभेमुळे आणि कलेप्रती असलेल्या निष्ठेमुळे ठळकपणे उठून दिसली. त्यांच्या कलेचा साक्षीदार होणे हा माझ्यासाठी एक खास अनुभव होता. सर्व स्पर्धकांना त्यांच्या पुढील संगीत प्रवासासाठी शुभेच्छा!”
SAREGAMAPA ग्रँड फिनाले हा एक अद्वितीय सोहळा ठरला, जिथे श्रद्धा मिश्रा, उज्वल मोटिराम गजभरे, सुभाश्री देबनाथ, बिदिशा हातिमुरिया, पार्वती मीनाक्षी, आणि महार्षी सनात पंड्या यांच्या दिमाखदार सादरीकरणांनी मंच प्रज्वलित केला आणि प्रेक्षकांना संगीताच्या एका जादुई प्रवासाला नेले.
अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :-
