महाराष्ट्र राज्यातील धर्मादाय (Dharmaday) संघटनेत (Sarkari Job) गट ब व गट क संवर्गातील एकूण १७९ रिक्त पदे भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज ११ सप्टेंबर २०२५ पासून सुरु होऊन ३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११:५५ पर्यंत स्वीकारले जातील. तपशीलवार माहिती आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://charity.maharashtra.gov.in या ठिकाणी उपलब्ध आहे.

धर्मादाय (Dharmaday) संघटनेत (Sarkari Job) पदांची नावे व पगार
- विधी सहायक (एस-१५): ३ जागा, वेतन रु. ४१,८०० ते १,३२,३००
- लघुलेखक (उच्च श्रेणी) (एस-१६): २ जागा, वेतन रु. ४४,९०० ते १,४२,४००
- लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) (एस-१५): २२ जागा, वेतन रु. ४१,८०० ते १,३२,३००
- निरीक्षक (एस-१३): १२१ जागा, वेतन रु. ३५,४०० ते १,१२,४००
- वरिष्ठ लिपिक (एस-८): ३१ जागा, वेतन रु. २५,५०० ते ८१,१००
परीक्षा शुल्क
- खुला प्रवर्ग: रु. १०००
- मागास प्रवर्ग व अनाथ: रु. ९००
- माजी सैनिक व दिव्यांग: फी माफ
पात्रता
- अर्जदार भारताचा नागरिक असावा.
- किमान १५ वर्षे महाराष्ट्राचा रहिवाशी असलेला असावा (अधिवास प्रमाणपत्र आवश्यक).
- वेगवेगळ्या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव:
- विधी सहायक: कोणत्याही शाखेतील पदवी + धर्मादाय संघटनेत ३ वर्षांचा अनुभव.
- लघुलेखक: दहावी पास + लघुलेखन आणि टायपिंग प्रमाणपत्र.
- निरीक्षक व वरिष्ठ लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवी + आवश्यक टायपिंग स्पीड.
वयमर्यादा
- सर्वसाधारण: किमान १८ ते जास्तीत जास्त ३८ वर्षे.
- मागास प्रवर्ग, प्राविण्य प्राप्त खेळाडू: ४३ वर्षे.
- दिव्यांग पदाधिकारी: ४५ वर्षे.
- माजी सैनिक: सेवेचा कालावधी + ३ वर्षे सवलत.
निवड प्रक्रिया
- ऑनलाईन अर्ज, प्रवेशपत्र, ऑनलाइन परीक्षा, किमान ४५% गुण घेणे, नंतर कागदपत्र तपासणी करण्यात येईल.
ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट- https://charity.maharashtra.gov.in
धर्मादाय संघटनेत या पदांसाठी मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज करतील असा अंदाज असून, ही संधी महाराष्ट्रातील इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी मोठ्या महत्तवाची आहे. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट पाहावी.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
जालना जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ (Police Patil) पदाच्या ७२२ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू !
Govt Driver Job – केंद्रीय गुप्तचर विभागात 455 सुरक्षा सहाय्यक (मोटर ट्रान्सपोर्ट) पदांसाठी भरती
