आज दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नवी दिल्लीतील यशोभूमी येथे आयोजित (Semicon India) ‘सेमिकॉन इंडिया 2025’ या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. हा कार्यक्रम भारताच्या अर्धवाहक (सेमीकंडक्टर- Semiconductor) उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आला असून, भारताला जागतिक अर्धवाहक बाजारात महत्त्वाचा वाटा मिळवून देण्याच्या दृष्टीने हा एक मोठा टप्पा मानला जात आहे. पंतप्रधानांनी या कार्यक्रमात उपस्थित सेमीकंडक्टर (Semicon India) उद्योगातील प्रमुख नेते, स्टार्टअप्सचे उद्योजक, तसेच देशभरातून आलेले तरुण विद्यार्थी यांचे स्वागत केले.

सेमिकॉन इंडिया 2025’ (Semicon India) चे उद्घाटन प्रसंगी मोदी म्हणाले
सेमिकॉन इंडिया 2025’ चे उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदी (Narendra Modi) म्हणाले की “जगाला भारतावर पूर्ण विश्वास आहे, जगाला भारतावर श्रद्धा आहे आणि जग आता भारतासोबतच अर्धवाहकांच्या (Semiconductor) भविष्यात सहभाग घेण्यासाठी सज्ज आहे”. त्यांनी ‘चिप्स हे डिजिटल हिऱ्यासारखे आहेत’ असेही सांगितले. त्यांनी या क्षेत्रातील उत्पादन सुरवात लवकर व्हायला हवी, असे ठणकावले. भारतातील सर्वात लहान चिप भविष्यात भव्य बदल घडवेल असे त्यांनी नमूद केले.
मोदींनी २०२१ मध्ये सेमिकॉन इंडिया मिशन सुरू केले असल्याचे सांगितले आणि त्यानुसार आतापर्यंत दहा प्रमुख प्रकल्प मंजूर झाल्याचे तसेच त्यावर १.५ लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक होत असल्याची माहिती दिली. त्यांनी याशिवाय सरकारी प्रक्रियांना सुलभ करण्यासाठी राष्ट्रीय सिंगल विंडो सिस्टमची स्थापना केल्याचा उल्लेख केला ज्यामुळे गुंतवणूकदारांना एका व्यासपीठावरून सर्व मंजुऱ्या मिळण्यास सुविधा होते.
संस्थांच्या प्रगतीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की काही प्रकल्पांचा पायलट प्रोडक्शन सुरू आहे व वर्षाच्या शेवटी व्यवसायीक उत्पादन सुरू करण्यासाठी तयारी आहे. भारत संपूर्ण सेमीकंडक्टर इकोसिस्टम तयार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे ज्यामध्ये डिझाइनिंग, उत्पादन, पॅकेजिंग आणि अत्याधुनिक उपकरणांचा समावेश आहे, असेही सरकारचे उद्दिष्ट आहे. यामुळे भारत जागतिक स्पर्धेत उत्तम स्थानी राहील असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भारतीय युवकांन आवाहन
शेवटी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुण उद्योजकांना आणि नवकल्पकांना संबोधित करत, त्यांना या क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन केले. सरकार त्यांच्या सोबत आहे आणि त्यांना आवश्यक सर्व सुविधा व प्रोत्साहने उपलब्ध करुन देत असल्याचे सांगितले. यामुळे ‘डिजाइन इन इंडिया, मेड इन इंडिया, ट्रस्टेड बाय द वर्ल्ड’ असे भविष्यातील भारताचे स्वप्न सत्यात उतरेल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘सेमिकॉन इंडिया 2025’ (Semicon India) या तीन दिवसांच्या परिषदेतील ४८ हून अधिक देशांहून २५०० हून अधिक प्रतिनिधी, १५० पेक्षा जास्त वक्ते आणि ३५० पेक्षा जास्त प्रदर्शक सहभागी झाले असून, या परिषदेत राज्यस्तरीय धोरणे, संशोधन, गुंतवणूक संधी, आंतरराष्ट्रीय सहकार्य व नविन तंत्रज्ञानाच्या विकासावर भर देण्यात आला आहे.
हा कार्यक्रम भारताचे अर्धवाहक (Semiconductor) क्षेत्रातील भवितव्य प्रगतीचे द्योतक ठरत असून, देशाला जागतिक अर्धवाहक (Semiconductor) उद्योगात महत्त्वाचे स्थान मिळवून देणारा टप्पा मानला जात आहे.
‘सेमिकॉन इंडिया 2025’ (Semicon India) कार्यक्रमाचा युट्यूब वरील व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

