भारताने वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये दमदार कामगिरी (Shailesh Kumar) च्या (Gold Medal) सहित तीन पदकांची कमाई केली आहे. भारताने वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये ऐतिहासिक यश संपादन करत जागतिक क्रीडाक्षेत्रात आपला दबदबा दाखवला आहे. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी तीन पदके जिंकत देशाचा झेंडा उंचावला. दमदार कामगिरी करत शैलेशकुमारने (Shailesh Kumar ) उंच उडीत सुवर्णाची कमाई केली, तर दीप्थी जीवनजीने 400 मीटर धावण्यामध्ये रौप्य (Silver Medal) पटकावले. यासोबतच वरुणसिंह भाटीनेही उंच उडीत कांस्य पदक मिळवत भारताच्या यशाची लय कायम ठेवली. या तिहेरी यशामुळे भारतीय पॅरा खेळाडूंनी जगभरात पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे.

Shailesh Kumar शैलेशकुमारचा सुवर्ण झळाळ
पुरुष उंच उडी T63 प्रकारात शैलेश कुमारने भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. त्याने 1.91 मीटर उंच उडी मारत केवळ वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीच केली नाही, तर या प्रकारात चॅम्पियनशिप विक्रमही आपल्या नावे केला. ही कामगिरी भारतीय पॅरा अॅथलेटिक्ससाठी ऐतिहासिक ठरली.
दीप्थी जीवनजीचे रौप्य
महिला 400 मीटर T20 प्रकारात दीप्थी जीवनजीने उत्कृष्ट वेग दाखवला. तिने 55.16 सेकंदाच्या सर्वोत्तम हंगामी वेळेसह रौप्य पदक जिंकले. तिच्या या धावण्यामुळे भारतीय महिला पॅरा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली आहे.
वरुणसिंह भाटीचा कांस्य विजय
पुरुष उंच उडी T42 प्रकारात वरुणसिंह भाटीने 1.85 मीटर उडी घेत कांस्य पदक आपल्या नावे केले. कठीण स्पर्धेतही त्याने सातत्य टिकवून भारताला आणखी एक पदक मिळवून दिले.
भारतीय पॅरा खेळाडूंनी जागतिक स्तरावर पुन्हा एकदा आपली ताकद दाखवत देशाचा गौरव वाढवला आहे. वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मधील ही कामगिरी भारतातील उदयोन्मुख पॅरा खेळाड्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
संबंधित बातमीचे समाज माध्यमातील पोस्ट पाहण्यासाठी क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉग :
