पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या मराठी माध्यमातील प्राथमिक शाळांमध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी इंग्रजी माध्यम करार तत्त्वावरील शिक्षक भरती (Shikshak Bharti) साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती फक्त ६ महिन्यांच्या तात्पुरत्या कालावधीसाठी असणार असून, नियुक्ती दरमहा २०,००० रुपये एकरकमी मानधनावर केली जाणार आहे.

Shikshak Bharti एकूण पदसंख्या: १९१
पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या मराठी माध्यमातील प्राथमिक शाळांमध्ये होणाऱ्या या भरतीअंतर्गत आरक्षणानुसार १९१ पदे राखीव असून २२ पदे खुल्या प्रवर्गासाठी आहेत. आरक्षणाचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:
| अजा | अज | विजा अ | भजब | भजक | विमाप्र | इमाव | एससीबीसी | ईडब्ल्यूएस | खुली पदे |
| २२ | २० | १० | ९ | ० | २ | ४८ | १९ | ० | ६१ |
जर आरक्षित प्रवर्गातील पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास, जागा अनुक्रमे इतर पात्र उमेदवारांसाठी खुल्या करण्यात येणार आहेत.
Shikshak Bharti पात्रता
शैक्षणिक पात्रता (खालीलपैकी कोणतीही): Shikshak Bharti
- इयत्ता १ली ते १२वी पर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण व डी.एड./बी.एड. मराठी माध्यमातून.
- इयत्ता १ली ते १०वी पर्यंत मराठी माध्यम, १२वी इतर माध्यमातून व डी.एड./बी.एड. मराठी माध्यमातून.
- अन्य संयोजनात मराठी माध्यमातून किमान शिक्षण आणि डी.एड./बी.एड. मराठी माध्यमातून.
- टीईटी/सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. निवड गुणवत्ता यादीच्या आधारे करण्यात येईल.
Shikshak Bharti अर्ज प्रक्रिया
अर्ज सादरीकरणाची प्रक्रिया:
इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिवसापासून ५ कार्यदिवसांच्या आत, सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आपले अर्ज प्रत्यक्ष पुणे मनपा शिक्षण विभागाच्या कार्यालयात (कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे-५) सादर करावेत.
टपालाद्वारे आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्रांच्या सत्यप्रत जोडणे बंधनकारक आहे.
मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी सोबत आणणे अनिवार्य.
इतर महत्त्वाच्या अटी:
खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा ३८ वर्षे, मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षे, व अपंग उमेदवारांसाठी ४५ वर्षे.
जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र (विवाहित महिलांसाठी) अनिवार्य.
निवड झाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव सेवेत कायम ठेवण्याचा दावा करता येणार नाही.
अपूर्ण किंवा उशिरा प्राप्त अर्ज अमान्य ठरवले जातील.
महत्वाची सूचना:
या पदांची नेमणूक पूर्णतः तात्पुरती असून पुणे महानगरपालिकेच्या सेवेचा दावा यावर करता येणार नाही. भरती प्रक्रिया शासकीय निर्णयानुसार कोणत्याही टप्प्यावर थांबवण्याचा किंवा बदल करण्याचा संपूर्ण अधिकार मा. महापालिका आयुक्तांकडे राहील.
अधिक माहितीसाठी संपर्क करा:
शिक्षण विभाग (प्राथमिक), पुणे महानगरपालिका
कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे – ४११ ००५
अधिकृत वेबसाईटसाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/
जाहिरात आणि ऑफलाईन अर्ज – https://www.pmc.gov.in/l/recruitment
आमचे अन्यब्लॉगपोस्ट :
(IB Recruitment) इंटेलिजन्स ब्युरो भरती 2025 : केंद्रीय गुप्तचर विभागात 4987 जागांसाठी मेगाभरती
