आपला १८ दिवसांचा अंतराळातील ऐतिहासिक प्रवास पूर्ण करून, भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला (Shubhanshu Shukla) तसेच Axiom Mission-4 चे इतर सदस्य दि. १५ जुलै २०२५ रोजी सुखरूपपणे पृथ्वीवर परतले.स्पेसएक्सच्या ‘Crew Dragon Grace’ या यानातून त्यांची पॅसिफिक महासागरात लँडिंग झाली. त्यानंतर त्यांना रिकव्हरी शिपवर सुरक्षितरित्या उतरवण्यात आले.ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचून पहिले भारतीय अंतराळवीर होण्याचा मान पटकावला असून, त्यांनी संपूर्ण भारतवासीयांना अभिमानाचा क्षण दिला आहे.

Shubhanshu Shukla यांच्या सुखरूप यात्रेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शुभेच्छा संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत लिहिले:
“मी संपूर्ण राष्ट्रासोबत ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला (Shubhanshu Shukla) यांचे पृथ्वीवर परत येताना स्वागत करतो. ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेले पहिले भारतीय अंतराळवीर ठरले आहेत. त्यांच्या समर्पण, शौर्य आणि अग्रगण्य आत्म्यामुळे त्यांनी अब्जो स्वप्नांना प्रेरणा दिली आहे.
हे यश आपल्या मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेच्या – ‘गगनयान’ – दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”
Axiom Mission-4: भारतासाठी ऐतिहासिक टप्पा
अॅक्सिअम मिशन-4 (Ax-4): खासगी अंतराळमोहिमेचा नवा इतिहास : अॅक्सिअम मिशन हे अॅक्सिअम स्पेस, नासा आणि स्पेसएक्सच्या पार्टनरशीप मधुउन सुरु करण्यात आले त्यानुसार ४ (Ax-4) ही खासगी मानवयुक्त अंतराळमोहिम आखली गेली या मोहिमेंतर्गत SpaceX Falcon 9 Block 5 रॉकेटच्या सहाय्याने भारतीय अंतराळवीर Shubhanshu Shukla यांच्यासह अन्य चार देशाचे अंतराळवीर दि. २५ जून २०२५ रोजी यशस्वीपणे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) झेपावले होते. या मोहिमेत वापरलेले “Crew Dragon Grace” (C213) ही यानप्रकाराची पाचवी आणि अंतिम कॅप्सूल होती, जी या मोहिमेद्वारे प्रथमच उड्डाण करत होती. विशेष म्हणजे मोहिमेत वारलेले ‘Grace’ या कॅप्सूलचे हे पहिलेच उड्डाण होते, जे पृथ्वीच्या निम्न कक्षेत यशस्वीरित्या स्थापित झाले.
विलंब आणि अडथळ्यांवर मात करत यशाकडे झेप : ही मोहिम मूळतः ११ जून २०२५ रोजी प्रक्षेपित होणार होती, परंतु लिक्विड ऑक्सिजन गळतीमुळे ती रद्द करण्यात आली. त्यानंतर, ISS च्या झ्वेझ्दा मॉड्यूलमध्ये आणखी एका गळतीमुळे प्रक्षेपण दोन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आले. अखेर २५ जून रोजी केनेडी स्पेस सेंटरच्या लॉन्च कॉम्प्लेक्स 39A वरून सकाळी ६:३१:५२ UTC (भारतीय वेळेनुसार १२:०१) प्रक्षेपण झाले. १८ दिवसांच्या अवकाशात वास्तव्यानंतर, हे यान १५ जुलै २०२५ रोजी सॅन डिएगोच्या किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरात यशस्वीपणे उतरले.
एक अनोखी आंतरराष्ट्रीय अंतराळयात्रा : Ax-4 मोहिमेच्या चार सदस्यीय दलात समावेश होता:
- कमांडर पेगी व्हिट्सन – अॅक्सिअम स्पेसच्या प्रतिनिधी आणि माजी नासा अंतराळवीर.
- पायलट शुभांशु शुक्ला (Shubhanshu Shukla) – भारताच्या ISRO चे प्रतिनिधित्व करणारे पहिले प्रशिक्षित अंतराळवीर.
- स्लावोश उज़्नान्स्की-विस्निएव्स्की – पोलंडचे ESA प्रकल्प अंतराळवीर.
- टिबोर कापू – हंगेरी स्पेस ऑफिसचे प्रतिनिधी.
ही मोहीम भारत, पोलंड आणि हंगेरीसाठी ४० वर्षांनंतरची पहिली सरकारी मान्यतेची अंतराळयात्रा होती. याआधी या देशांनी केवळ एकच अंतराळवीर सोव्हिएत संघाच्या इंटरकोस्मॉस कार्यक्रमांतर्गत अंतराळात पाठवला होता. मात्र, Ax-4 मोहिमेद्वारे प्रथमच या तिन्ही देशांचे प्रतिनिधी ISS (आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक) वर पोहोचले.
भारतासाठी ऐतिहासिक क्षण
Ax-4 मोहिमेतील शुभांशु शुक्ला हे ISRO च्या प्रशिक्षित अंतराळवीर मंडळातील पहिले सदस्य होते, ज्यांनी प्रत्यक्ष अंतराळप्रवास केला. हे भारतासाठी केवळ अंतराळविज्ञानाचे यश नाही, तर मेड इन इंडिया” अंतराळयुगात उडी घेणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
Ax-4: नव्या युगाचा आरंभ : अॅक्सिअम मिशन-4 ही केवळ एक खासगी अंतराळमोहिम नव्हे, तर ती सरकारी-खासगी भागीदारीतून अंतराळ संशोधन आणि मानवयुक्त मोहिमांमध्ये निर्माण होणाऱ्या नव्या युगाची सुरुवात आहे. अवकाशवीरांच्या साहसाच्या या मोहिमेने विज्ञान, तंत्रज्ञान, आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यांना एका नव्या शिखरावर नेऊन ठेवले आहे.
राष्ट्राचा गौरव : ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला (Shubhanshu Shukla) यांचा हा पराक्रम केवळ वैज्ञानिक प्रगतीचे प्रतीक नाही, तर तो भारतीय युवकांच्या जिद्द, स्वप्नं आणि आकाशाला भिडण्याच्या क्षमतेचा विजय आहे. ग्रुप कॅप्टन शुक्ला यांचा हा अंतराळप्रवास ‘गगनयान’सारख्या स्वदेशी मानवी अंतराळ मोहिमांसाठी आधारस्तंभ ठरणार आहे. त्यांचा अनुभव आणि योगदान भविष्यातील भारतीय अंतराळवीरांसाठी प्रेरणादायी ठरेल. या मोहिमेच्या माध्यमातून भारताने अंतराळात पुन्हा एकदा आपली उपस्थिती ठामपणे सिद्ध केली आहे!
संबंधित मिशनचे युटूब वरील व्हिडीओ पाह्याण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
