‘Sky Force’ चित्रपटाची माहिती – भारतीय वायुदलाच्या ऐतिहासिक शौर्यगाथेवर आधारित ‘Sky Force’ हा नवीन चित्रपट २४ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १९६५ च्या भारत-पाकिस्तान हवाई युद्धात पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर भारताने केलेल्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यावर आधारित आहे. हा हल्ला भारताचा पहिला आणि सर्वात घातक हवाई हल्ला मानला जातो.
Sky Force चित्रपटाचा ट्रेलर
चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला –
चित्रपटाची टीम आणि कलाकार :
| दिग्दर्शक | अभिषेक अनिल कपूर आणि संदीप केवलानी |
| निर्माते: | दिनेश विजन आणि अमर कौशिक (Maddock Films), ज्योती देशपांडे (Jio Studios) |
Cast of Sky Force कलाकार:
| अक्षय कुमार | विंग कमांडर के. ओ. अहुजा (काल्पनिक) |
| वीर पहारिया | टी. विजय (काल्पनिक) |
| सारा अली खान | विजयाची पत्नी |
| निम्रत कौर, शरद केळकर, मोहित चौहान, मनीष चौधरी | अन्य पात्र |
निर्मिती आणि चित्रीकरण:
चित्रपटाची निर्मिती जून २०२२ मध्ये सुरू झाली. चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन मार्च २०२३ मध्ये पूर्ण झाले. चित्रपटाची अधिकृत घोषणा २ ऑक्टोबर २०२३ रोजी गांधी जयंतीच्या निमित्ताने करण्यात आली. चित्रीकरण ३१ मे २०२३ रोजी मुंबईत सुरू झाले आणि २६ एप्रिल २०२४ रोजी पूर्ण झाले. चित्रपटाचे चित्रीकरण लखनऊ, सीतापूर, अमृतसर, हैदराबाद, दिल्ली, पठाणकोट आणि युनायटेड किंगडम येथे करण्यात आले.
संगीत:
चित्रपटातील गाणी तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केली असून पार्श्वसंगीत जस्टिन वर्गीस यांनी दिले आहे. चित्रपटाचे संगीत अधिकार सारेगमाकडे आहेत.
चित्रपटाचे बजेट
या चित्रपटाचे एकूण बजेट ५० करोड रुपये आहे.
प्रदर्शन Sky Force Release Date:
चित्रपट २४ जानेवारी २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, जो प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदर्शित केला जाणार आहे.
आमचे अन्य ब्लॉग :
