Sunny Subhash Fulmali – बहरैनमध्ये नुकत्याच झालेल्या “आशियाई युवा कुस्ती स्पर्धा २०२५” या प्रतिष्ठित स्पर्धेत सनीने साठ किलो वजनगटात अपार मेहनत आणि चिकाटीने सुवर्णपदक पटकावले आहे. हलाखीच्या परिस्थितीतून उठून अल्पवयातच त्याने देशाचे नाव जागतिक पातळीवर उजळवले असून, त्याच्या या यशाने संपूर्ण देशाला अभिमानाचा अनुभव दिला आहे. सनीचा संघर्ष आणि विजय हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. १७ वर्षीय कुस्तीपटू सनी सुभाष फुलमाळी (Sunny Subhash Fulmali) पुण्याच्या लोहगाव भागात एका तिरपाल झोपडीमध्ये राहतो. सनीने आपल्या कठीण परिस्थितीवर मात करून उत्कृष्ट कामगिरी केली असून, त्याचे स्वप्न भविष्यात ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे आहे.

(Sunny) सनी सुभाष फुलमाळी यांच्या विषयी
(Sunny) सनीचा जन्म आणि मूळ बीड जिल्ह्यातील आहे, पण कुटुंबीय पंधरा वर्षांपासून लोहगावमध्ये राहत आहेत. त्याचे वडील सुभाष फुलमाळी नंदी बैल घेऊन गावोगावी फिरून भविष्य सांगण्याचे काम करतात, तर त्याची आई सुया-दोरं विकून कुटुंबाचा सांभाळ करतात. त्यांना झोपडीवजा घर असूनही, कुटुंबाने सनीने कुस्तीमध्ये प्रगती करावी यासाठी मेहनत घेतली आहे. सनीच्या वडिलांनी त्याच्या तीनही मुलांना कुस्तीचा अभ्यास करावा म्हणून नंदी बैल विकून त्यांना तालिम दिली. सुरुवातीला घरगुती मार्गदर्शनाने, नंतर स्थानिक तालिमशिविर आणि शेवटी व्यावसायिक प्रशिक्षक संदीप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सनीने आपल्या कुस्ती कौशल्यांना धार लावली आहे. संदीप भोंडवे यांनी सनीला चार-पाच वर्षांपासून सर्व आर्थिक मदत केली आहे.
(Sunny) सनीने राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला असून कित्येक स्पर्धेत आपल्या खेळाच्या जोरावर मेडलदेखील मिळविले आहेत. त्यानंतर आशियाई युवा स्पर्धेत इराक, इराण, जपान, कोरिया आदी देशांच्या खेळाडूंवर मात करून तो सुवर्णपदक विजेता बनला. सनीचे स्वप्न आहे कि भविष्यात तो ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकेल.
(Sunny) सनीचा हा संघर्ष आणि झोपडीपासून सुवर्ण पदकापर्यंतचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असून, त्याच्या यशामुळे पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र अभिमानाने उजळला आहे. स्थानिक नागरिक तसेच क्रीडा क्षेत्राचे तज्ञही त्याला पुढील तयारीसाठी सरकारी मदत आणि सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करत आहेत.
सनी (Sunny) आज दहावीच्या वर्गात शिकत असून त्याचा कुस्तीचा प्रवास अजूनही सुरू आहे. त्याच्या कष्ट, आत्मविश्वास आणि जिद्दीमुळे त्याने स्वतःसाठी आणि देशासाठी इतिहास घडवला आहे. ही प्रेरणादायी कथा महाराष्ट्रातील तरुणांसमोर एक प्रगल्भ उदाहरण आहे की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाने कोणताही स्वप्न साकार होऊ शकतो.
सनी (Sunny) च्या परिवाराला व प्रशिक्षांना सरकारकडून मदतीची अपेक्षा
(Sunny) सनी सुभाष फुलमाळी आणि त्याच्या कुटुंबाने गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत आर्थिक संकटांचा सामना केला आहे. त्याच्या वडिलांचा पारंपरिक व्यवसाय नंदीबैल घेऊन दारोदारी फिरण्याचा आहे, मात्र आर्थिक अडचणींमुळे उपजीविकेचे साधन असलेला नंदीबैल देखील विकण्याची पाळी त्यांच्यावर आली, तर आई सुई-दोरा विकण्याच्या कामावर अवलंबून आहे. अशा कठीण परिस्थितीत सनीने कुस्तीमध्ये आसमंत गाजवलं, मात्र अजूनही त्याला आणि त्याच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक व प्रशिक्षणाच्या मदतीची अपेक्षा आहे. सनीच्या कुटुंबीयांनी, प्रशिक्षकांनी आणि स्थानिक चाहत्यांनीही सरकारने त्याच्या पुढील क्रीडा प्रवासासाठी आवश्यक सुविधा, आर्थिक मदत, आणि नोकरीची सोय करावी अशी मागणी केली आहे. या मदतीमुळे सनीसारख्या प्रतिभावंत तरुणांना त्यांच्या कष्टांचे योग्य फळ मिळेल आणि त्याचा देशासाठी होणारे योगदान अधिक दृढ होईल. सनीच्या आई-वडिलांनीही सरकारकडे आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक सुरक्षिततेची अपेक्षा व्यक्त केली आहे, ज्यामुळे परिस्थिती सुधारता येईल आणि त्यांचा मुलगा आपल्या क्रीडा क्षेत्रात देशाला आणखी मोठ्या स्तरावर गौरववेल. सरकारकडून अशी मदत मिळाल्यास सनीचा कुस्तीतील प्रवास अधिक फलदायी होण्याचे तसेच त्याच्या सारख्या इतर खेळाडूंना देखील प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
इंटरनेट वरील Sunny च्या संघर्ष कहाणीचे व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट:
