Elon Musk एलोन मस्क यांच्या Tesla India ने भारताच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकले, दिनांक १५ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील देशातील पहिल्या ‘टेस्ला एक्सपीरियन्स सेंटर’चे उद्घाटन झाले. या प्रसंगी टेस्लाच्या वरिष्ठ विभागीय संचालक इसाबेल फॅन यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना टेस्लाचा भारतासाठीचा दूरदृष्टीकोन, नवकल्पना आणि प्रगत ई-मोबिलिटी तंत्रज्ञानाची माहिती दिली. तसेच यावेळी टेस्लाच्या Model Y या कार मधील अत्याधुनिक वैशिष्ट्यांची माहिती देखील इसाबेल फॅन यांच्याद्वारे दिली गेली.

“टेस्लाचा भारतात प्रवेश म्हणजे केवळ एक सेंटर नव्हे, तर एका नव्या युगाची सुरुवात” — मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री म्हणाले:“मुंबई ही भारताची केवळ आर्थिक व व्यावसायिक राजधानी नाही, तर ती नवप्रवर्तन आणि शाश्वततेचीही राजधानी आहे. टेस्लाने भारतात नवी सुरुवात करताना विशेषत: मुंबई आणि महाराष्ट्राची निवड केल्याने आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो.”
“२०१५ मध्ये अमेरिकेत मी पहिल्यांदा टेस्लामध्ये प्रवास केला आणि त्याक्षणी वाटलं की भारतातसुद्धा हे तंत्रज्ञान यायला हवं. आज ते स्वप्न साकार होतंय!”
शाश्वतता आणि नवप्रवर्तनासाठी टेस्लाची बांधिलकी (Tesla India News)
इसाबेल फॅन यांनी सांगितले: “टेस्ला केवळ कार उत्पादक नसून, ती शाश्वत भविष्यासाठी प्रयत्नशील तंत्रज्ञान कंपनी आहे. भारतातील आमचे प्रयत्न हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील धोरणांचा प्रभाव
मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाज मध्यम साईट “X” वर माहिती देताना नमूद केले की: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने ‘Make in India’, ई-मोबिलिटी, आणि स्वावलंबी भारतासाठी स्पष्ट दिशादर्शन दिलं आहे. हेच धोरण आज अशा ऐतिहासिक क्षणांचं कारण ठरतंय.”
महाराष्ट्र – भारताचं EV हब
महाराष्ट्र राज्याची प्रगत EV धोरणे, राज्यात विकसित होत चाललेले मजबूत चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि EV उद्योगाला राज्य सरकारची असलेली संपूर्ण साथ या बाबी महाराष्ट्र राज्याला भारताचे EV हब बनवेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
“महाराष्ट्र टेस्लासाठी भारतातील सर्वात मजबूत बाजारपेठ ठरेल, आणि या प्रवासात तुमचा विश्वासू भागीदार बनण्यास आम्ही तयार आहोत.”
या उद्घाटनप्रसंगी मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
Tesla India – ‘Model Y’ ची किंमत आणि सुरुवात
(Tesla) टेस्ला आपली लोकप्रिय ‘Model Y’ कार भारतात आयात करून विक्रीस सुरुवात करणार असून, लाँग-रेंज, रिअर-व्हील ड्राइव्ह व्हर्जनची बेस किंमत ₹67.8 लाख ($79,089) ठेवण्यात आली आहे.या कारचे वितरण तिसऱ्या तिमाहीपासून सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी दिली.तुलनात्मकदृष्ट्या, हीच गाडी अमेरिकेत $44,990 (फेडरल कर सवलतीशिवाय) दराने मिळते.
Tesla India- टेस्लाचा भारतात प्रवेश: संधी आणि आव्हाने
अनेक वर्षांच्या विलंब व धोरणात्मक अडचणींनंतर अखेर टेस्लाचा भारतात प्रवेश झाला आहे. चीन व अमेरिकेतील घसरणाऱ्या विक्री दरम्यान, भारतात वाढणाऱ्या ग्राहकवर्गाकडे लक्ष केंद्रित करून ही रणनीतिक पावले उचलली जात आहेत.एलॉन मस्क यांच्या राजकीय भूमिकांवरील वाद आणि बहिष्कारांमुळे टेस्लाच्या जागतिक विक्रीवर काहीसा परिणाम झाला आहे. तरीही भारतात प्रवेश हा नवीन गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवणारा संकेत मानला जात आहे.
किंमत: बहुतेक भारतीय ग्राहकांसाठी महागडी
भारतातील इलेक्ट्रिक वाहन बाजार सध्या केवळ 2% इतकाच आहे, पण सरकारचे उद्दिष्ट 2030 पर्यंत हे प्रमाण 30% वर नेण्याचे आहे. टेस्लाची किंमत बहुतेक भारतीय ग्राहकांसाठी हाताबाहेरची असली, तरी Tesla India च्या भारतातील प्रवेशाने जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान भारतात येत असल्याचा सकारात्मक संदेश मिळतो.
Tesla India ची भारतातील स्पर्धा
टेस्ला भारतात BMW, Mercedes-Benz AG सारख्या लक्झरी ब्रँडशी स्पर्धा करेल. Tata Motors व Mahindra & Mahindra सारख्या बजेट भारतीय कंपन्यांशी थेट स्पर्धा अपेक्षित नाही. भारतात लक्झरी कार विक्रीचा वाटा सध्या फक्त 1% आहे.
तंत्रज्ञान आणि धोरणात बदल
टेस्लाने भारत सरकारकडे अनेक वर्षे EV आयात शुल्क कमी करण्याची मागणी केली होती. हे शुल्क काही EVs साठी 100% पर्यंत होते. भारत सरकारने मात्र टेस्लाकडे स्थानिक उत्पादन सुविधा उभारण्याची अट ठेवली होती. परंतु 2025 च्या सुरुवातीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यानंतर परिस्थिती बदलली. मार्चमध्ये सरकारने EVs वरील आयात शुल्क केवळ $35,000 पेक्षा कमी किंमतीच्या EVs साठी 15% पर्यंत घटवले , परंतु अशीही अट ठेवली गेली आहे की कंपन्यांनी 3 वर्षात भारतात फॅक्टरी उभारावी.
एलॉन मस्कचा दौरा आणि बदलती रणनीती
एलॉन मस्क यांनी एप्रिलमध्ये भारत भेटीची घोषणा केली होती, मात्र नंतर “टेस्लाच्या कामामुळे व्यस्त असल्याने” दौरा रद्द करून चीनला प्राधान्य दिले. सध्या टेस्लाने भारतात तातडीने उत्पादन सुरू करण्याची योजना नसल्याचे स्पष्ट केले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनीही मत व्यक्त केले की, टेस्लाने भारतात फॅक्टरी उभी करून अमेरिकन टॅरिफ्सपासून बचाव करणे अन्यायकारक ठरेल.
Elon Musk एलोन मस्कचा महत्वाकांक्षी प्रकल्प ( Starlink) स्टारलिंकची भारतातील योजना
टेस्लाच्या भारतात प्रवेशासोबत एलॉन मस्क यांची Starlink इंटरनेट सेवा सुरू करण्याची महत्त्वाकांक्षा देखील आहे.
Starlink सेवेसाठी अद्याप दूरसंचार परवाने आवश्यक असून, त्यासाठी अजून काही महिने लागू शकणार आहेत.
तज्ञांचे विशेष विश्लेषण:
EV इकोसिस्टममधील तज्ञांच्या मते – “टेस्लाच्या स्थानिक गुंतवणुकीमुळे भारतातील EV इकोसिस्टमला गती मिळेल, नवसंशोधनाला चालना मिळेल आणि सरकारचे EV उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होणार आहे.”
निष्कर्ष:
टेस्लाचा (Tesla India) भारतात प्रवेश म्हणजे केवळ एका कंपनीची सुरुवात नव्हे, तर शाश्वत भविष्याकडे वाटचाल करणाऱ्या भारताचा एक निर्णायक टप्पा आहे.महाराष्ट्र आणि भारत यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी ठरण्याची पूर्ण शक्यता आहे.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
रामायण (Ramayan): एका अमर कथेचा भव्य महायज्ञ बॉलीवूडला जमेल का ?
