महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET-2025)- एमएच-टीईटी अर्ज सादर करण्याची मुदत ३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढवली

Vishal Patole
TET-2025

पुणे – महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (TET-2025) २०२५ साठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. राज्य शिक्षण परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीप्रमाणे, अर्ज करण्याची अंतिम दिनांक आता ९ऑक्टोबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. या अगोदर अर्ज करण्याची अंतिम दिनांक ०३ ऑक्टोबर २०२५ अशी होती ती वाढून आता ०९ ऑक्टोबर २०२५ करण्यात आली आहे. शिक्षक पदावर भरतीसाठी आवश्यक समजली जाणारी एमएच-टीईटी परीक्षा देण्याची इच्छुक उमेदवारांना या मुदतवाढीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET-2025) संदर्भातील महत्त्वाचे प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केले आहे. ही परीक्षा रविवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यभर घेण्यात येणार आहे. परीक्षेचा उद्देश- इयत्ता १ ली ते ५ वी (पेपर १) व इयत्ता ६ वी ते ८ वी (पेपर २) साठी शिक्षक / शिक्षण सेवक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. ही अट सर्व व्यवस्थापनातील प्रवर्गांना लागू आहे, जसे की सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळा. या परीक्षेसाठी दरवर्षी ऑनलाईन अर्ज करून उमेदवाराला परीक्षा देता येते त्याप्रमाणे या वर्षीची ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात दि १५ सप्टेंबर २०२५ झाली असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ अशी आहे. अर्जासंबंधीत सविस्तर माहिती खाली दिली आहे.

TET-2025)

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET-2025) अर्ज प्रक्रिया व माहिती

  • ऑनलाईन आवेदनपत्र भरायची प्रक्रिया १५ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झाली असून ती ३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सुरू राहील. या काळात अर्जासोबत परीक्षा शुल्क देखील भरणे आवश्यक आहे.
  • परीक्षा, शुल्क, अर्ज प्रक्रिया, सुचना व आवश्यक शासन निर्णयांची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mahatet.in) उपलब्ध आहे.
  • परीक्षार्थ्यांनी अर्ज व इतर अद्यावत माहितीबाबत नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्यावी, अशी सूचना परिषदेने केली आहे.

TET-2025 परीक्षेचे वेळापत्रक

  • प्रशिक्षण पात्रता परीक्षा पेपर-१ : रविवार, २३ नोव्हेंबर २०२५, सकाळी १०.३० ते दुपारी १.००
  • प्रशिक्षण पात्रता परीक्षा पेपर-२ : रविवार, २३ नोव्हेंबर २०२५, दुपारी २.३० ते संध्याकाळी ५.००
  • प्रवेशपत्र डाऊनलोड कालावधी : १० नोव्हेंबर २०२५ पासून ते २३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET-2025) पात्रता निकष

परीक्षा पेपर-१ व पेपर-२ साठी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता स्वतंत्र आहेत.

इयत्ता १ ली ते ५ वी (पेपर-I)

  • उमेदवार किमान SSC उत्तीर्ण असावा
  • तसेच शिक्षणशास्त्र विषयातील डिप्लोमा (D.Ed. किंवा समकक्ष कोर्स) पूर्ण केलेला / चालू असावा

इयत्ता ६ वी ते ८ वी (पेपर-II)

  • उमेदवाराने किमान SSC व पदवी (Graduation) उत्तीर्ण केलेली असावी
  • तसेच शिक्षणशास्त्र विषयातील डिप्लोमा (D.Ed./समकक्ष) किंवा पदवी (B.Ed./समकक्ष) पूर्ण केलेली / चालू असावी

दोन्ही (पेपर I व II)

  • उमेदवार किमान SSC व पदवी उत्तीर्ण असावा
  • तसेच शिक्षणशास्त्र विषयातील डिप्लोमा (D.Ed./समकक्ष) किंवा B.Ed. पात्रता असणे आवश्यक आहे

TET-2025 परीक्षेचे शुल्क

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ साठी अर्ज करताना परीक्षार्थ्यांना शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी व अनुसूचित जाती/जमाती तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी वेगवेगळे शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

परीक्षेचे शुल्क

  • पेपर-I : सामान्य प्रवर्गासाठी रु. १००० /, मागासवर्गीय प्रवर्गासाठी रु. ७००
  • पेपर-II : सामान्य प्रवर्गासाठी रु. १००० /, मागासवर्गीय सवलतीच्या प्रवर्गासाठी रु. ७००
  • दोन्ही पेपर-I व II : सामान्य प्रवर्गासाठी रु. १२०० /, मागासवर्गीय सवलतीच्या प्रवर्गासाठी रु. ९००

(TET-2025) अर्ज करण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET 2025) साठी अर्ज करण्याची सोपी व व्यवस्थित स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  • पायरी १: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अधिकृत संकेतस्थळाला https://mahatet.in/ भेट द्या किंवा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • पायरी २: ‘उमेदवाराची नवीन नोंदणी’ या लिंकवर क्लिक करून आपली नोंदणी करा. यासाठी आपले नाव, मोबाईल नंबर, ई-मेल, युजरनेम आणि पासवर्ड तयार करा. दिलेला ओटीपी (OTP) टाका आणि नोंदणी पूर्ण करा.
  • पायरी ३:नोंदणी झाल्यानंतर मिळालेल्या युजरनेम व पासवर्डच्या सहाय्याने संकेतस्थळावर लॉगिन करा.
  • पायरी ४:लॉगिन करून MAHATET अर्ज फॉर्म भरा. मुलाखतीतील सर्व माहिती, जसे की वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता, अपंगत्व, राखीव वर्ग, इत्यादी अचूकपणे भरा.
  • पायरी ५:फोटो, स्वाक्षरी व आवश्यक कागदपत्रांचे स्कॅन केलेले प्रती अपलोड करा.
  • पायरी ६:अर्जात भरलेली सर्व माहिती तपासण्यासाठी प्रीव्यू किंवा पुनरावलोकन करा. सर्व काही बरोबर असल्याची खात्री करा.
  • पायरी ७:
  • परीक्षा शुल्क ऑनलाइन (क्रेडिट/डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI इ.) भरून व्यवहार पूर्ण करा.
  • पायरी ८:पेमेंट यशस्वी झाल्यानंतर व्यवहाराची पावती (Transaction Receipt) डाउनलोड करा.
  • पायरी ९:भरलेला अर्जाची प्रिंट काढा व भविष्यातील संदर्भासाठी जतन करा.

या प्रक्रियेने उमेदवारांची नोंदणी पूर्ण होते व त्यांना शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अधिकृत अर्जदार मानले जाते.
सगळ्या अपडेटसाठी आणि मार्गदर्शनासाठी अधिकृत वेबसाइटवर नियमित भेट देणे आवश्यक आहे.

विशेष सूचना
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही प्रशासकीय व अन्य कारणास्तव वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणताही बदल झाल्यास अद्ययावत माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर प्रकाशित केली जाईल.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

Govt Job Vacancy 2025 RRB – भारतीय रेल्वेमध्ये 35,400 रु. पगाराची नोकरी !

(Sarkari Job) धर्मादाय संघटनेच्या गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदांसाठी सरळसेवा प्रवेश प्रक्रिया सुरू

जालना जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ (Police Patil) पदाच्या ७२२ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू !

Govt Driver Job – केंद्रीय गुप्तचर विभागात 455 सुरक्षा सहाय्यक (मोटर ट्रान्सपोर्ट) पदांसाठी भरती

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत