युनायटेड किंगडमचे पंतप्रधान कियर स्टार्मर हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर !

Vishal Patole

मुंबई – युनायटेड किंगडमचे (यूके) (UK PM) पंतप्रधान कियर स्टार्मर हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून, त्यांच्या स्वागतासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ऐतिहासिक भेटीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनायटेड किंगडमचे पंतप्रधान कियर स्टार्मर यांचे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहर्ष स्वागत केले. त्यांनी ट्विटरवर लिहिले, “India welcomes UK!” आणि सांगितले की, युकेच्या माननीय पंतप्रधान कियर स्टार्मर यांच्या भारतातील पहिल्या दौऱ्यावर त्यांचे मुंबई विमानतळावर हार्दिक स्वागत केले. देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान स्टार्मर आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाला सुखद आणि यशस्वी भेटीची शुभेच्छा व्यक्त केली. या स्वागत समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित दादा पवार, मंत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांनी भारत-यूके संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली.

UK PM

UK PM कियर स्टार्मर

(UK PM) ब्रिटेनचे पंतप्रधान कीर स्टार्मर आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या १२५ सदस्यीय व्यापार प्रतिनिधीदलासह बुधवारी मुंबईत पोहोचले. ही प्रप्रतिनिधीदला जगातील अग्रगण्य आर्थिक शक्तींपैकी एक असून त्यांनी भारतासोबतच्या व्यापारिक संबंधांना मजबूत करण्यासाठी हा दौरा केला आहे. हिथ्रो विमानतळावरून त्यांचा प्रवास सुरु झाला, त्यावेळी त्यांनी विमानाच्या कॉकपिटमधून म्हटले, “This is the BIGGEST trade mission to India the UK has ever sent.
” हा दौरा भारत-ब्रिटन यांच्यातील जुलै २०२५ मध्ये झालेल्या व्यापक आर्थिक आणि व्यापार कराराअंतर्गत झाला आहे, ज्यामुळे ९९% यूके वस्तूंवरील टॅरिफ काढून टाकण्यात आले आहे. या करारामुळे २०३० पर्यंत $१०० अब्जांच्या द्विपक्षीय व्यापाराचा उद्देश आहे. या भेटीदरम्यान स्वच्छ ऊर्जा, डिजिटल वित्त आणि शिक्षण क्षेत्रातील सहकार्यावर सखोल चर्चा होणार आहे. स्टार्मर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेटून या सहकार्यासाठी पुढील वाटचाल ठरवतील.

UK PM भेटीचे महत्त्व व अपेक्षित चर्चा

कियर स्टार्मर (UK PM) यांचा हा भारत दौरा म्हणजे भारत-ब्रिटन संबंधांना नवे प्रोत्साहन देणारा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मुंबईत भेट घेणार आहेत. या बैठकीत भारत-युके या सामरिक भागीदारीचे विविध पैलू, व्यापार धोरणे, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, हवामान आणि ऊर्जा यांसह अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “एका मोठ्या व्यापारी आणि राजकीय प्रतिनिधी मंडळासह युकेचे पंतप्रधान मुंबईत आले आहेत. भारत आणि युके यांच्यातील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे.”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कियर स्टार्मर यांचे मुंबईत स्वागत करून भारत-युके मैत्री व सहकार्य अधिक व्यापक प्रकारे वाढेल अशी आशा व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युनायटेड किंगडमचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे मुंबईत आगमन झाल्यानंतर उष्मापूर्वक स्वागत केले. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती शेअर करत दिले की, आज बुधवारी मुंबईत कीर स्टार्मर यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले आहे. एका मोठ्या व्यापारी प्रतिनिधीदळासह आलेल्या कीर स्टार्मर यांच्या या भेटीमुळे भारत-युके संबंधांतील नव्या प्रगतीच्या अपेक्षा वाढली आहेत

दौऱ्याचे उद्दिष्ट

कियर स्टार्मर (UK PM) यांच्या नेतृत्त्वाखाली युकेने भारतासोबतचा मुक्त व्यापार करार (Free Trade Agreement) जुलै 2025 मध्ये केला आहे. हा करार भारत-यूके संबंधांचा नवा पाया मजबूत करेल. युकेतल्या 100हून अधिक व्यावसायिकांबरोबर आलेल्या त्यांच्या प्रतिनिधीमंडळाचा उद्देश भारतात गुंतवणूक वाढवून दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला चालना देणे हा आहे.विद्यमान जागतिक व क्षेत्रीय परिस्थितीत या भेटीचे महत्त्व अधिक वाढले आहे, अशा काळात भारत-यूके संबंध अधिक घट्ट करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.

एकंदरीत, कियर स्टार्मर यांच्या भारत दौऱ्याचा केंद्रबिंदू आर्थिक, तंत्रज्ञानिक आणि सामरिक सहकार्य वाढवण्यावर आहे, ज्यामुळे दोन्ही देशांची मैत्री आणखी बळकट होणार आहे.

संबंधित आगमनाचा युट्युब वरील व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे समाज माध्यम साईट “x” वरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :


महायुती सरकारचा शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय : ३१,६२८ कोटींचे मदत पॅकेज(Package) जाहीर !

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
१ प्रतिक्रिया

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत