वंदे मातरम् (Vande Mataram) : राष्ट्रभावनांचा अनोखा उत्सव, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भावनिक प्रतिक्रिया !

Vishal Patole

नवी दिल्ली दि. ७ नोव्हेंबर २०२५ – (Vande Mataram) ‘वंदे मातरम्’ या अमर गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त देशभर राष्ट्रभावना, देशभक्ती आणि एकतेचे असामान्य वातावरण पाहायला मिळाले. या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त करत म्हटले की, “वंदे मातरम् के सामूहिक गान के हर स्वर में राष्ट्रभक्ति, एकता और समर्पण की अद्भुत गूंज सुनाई दे रही थी। वंदे मातरम् केवल एक गीत नहीं, बल्कि भारत की आत्मा की अभिव्यक्ति है।”

 Vande Mataram)

अमर गीत Vande Mataram

‘वंदे मातरम्’ (Vande Mataram) या भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात क्रांतीची ज्योत पेटवणाऱ्या अमर गीताचा जन्म १९व्या शतकात झाला. ‘वंदे मातरम्’ हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी त्यांच्या कंथलपाडा, नैहाटी गावात लिहिले होते आणि या गीताचे पहिले प्रकशन “Bangadarshan” साहित्यिक मासिकात ७ नोव्हेंबर १८७५ रोजी झाले आणि पुढे १८८२ मध्ये ‘वंदे मातरम्’ गीत ‘आनंदमठ’ कादंबरीत समाविष्ट करण्यात आले.​ या गीताचा जन्म बंगालच्या सांस्कृतिक वातावरणात आणि मातृभूमीवरील प्रेमातून झाला.. बंगालमधील भारतमातेवरील अत्यंत भक्तीभाव आणि देशप्रेमातून हे गीत उदयास आले. बंकिमचंद्र यांनी हे गीत मूळतः संस्कृत आणि बंगाली भाषेच्या मिश्रणात लिहिले होते. त्यातील (Vande Mataram) “वंदे मातरम्” म्हणजे ‘हे मातृभूमी, तुला वंदन’ – हा एक सशक्त देशभक्तीचा संदेश देणारा श्लोक आहे.

सुरुवातीला या गीताला ब्रिटिश सत्तेने बंदी घालण्याचा प्रयत्न केला कारण हे गीत भारतीय स्वातंत्र्याच्या विचाराला दिशा देत होते. मात्र देशभरातील तरुण, विद्यार्थी आणि स्वातंत्र्यसैनिकांसाठी ‘वंदे मातरम्’ हे फक्त गीत नव्हे तर एक आंदोलनाचे प्रतीक बनले. १९०५ च्या बंगभंग आंदोलनात याचे स्वर भारताच्या गल्ल्यांतून दुमदुमले आणि भारतीय जनतेच्या हृदयात राष्ट्रीय चेतनेची ठिणगी पेटवली.

१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर राष्ट्रगीताच्या निवडीविषयी चर्चा झाली. जन गण मन हे अधिकृत राष्ट्रगीत म्हणून स्वीकृत झाले परंतु (Vande Mataram) ‘वंदे मातरम्’चा मान कमी झाला नाही. त्याला ‘राष्ट्रीय गीत’ म्हणून गौरविण्यात आले. या गीताची धून रवींद्रनाथ टागोरांनी १८९६ मध्ये काँग्रेस अधिवेशनात सादर केली होती, जी आजही प्रत्येक भारतीयाला देशभक्तीचा उत्कट अनुभव देते.

‘वंदे मातरम्’ (Vande Mataram) हे फक्त एक गीत नसून ते मातृभूमीवरील दैवी प्रेमाचे वचन, शौर्याचे प्रतीक आणि एकतेची शपथ आहे. म्हणूनच आजही जेव्हा या गीताचे स्वर कानावर येतात, तेव्हा प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाने “भारत माता की जय” असा जयघोष गुंजतो.

Vande Mataram आजही भारतीय जनमानसात देशप्रेमाची ज्योत पेटवत असल्याचे नेत्यांनी अधोरेखित केले

१५० वर्षांपूर्वी बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेले हे गीत आजही भारतीय जनमानसात देशप्रेमाची ज्योत पेटवत असल्याचे नेत्यांनी अधोरेखित केले. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले की, Vande Mataram 150 हे फक्त स्मरण नाही, तर हे मातृभूमीप्रति एक अखंड श्रद्धांजली आहे.” तसेच असमचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी नमूद केले की, “वंदे मातरम् ही आपल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाची पायाभरणी आहे. पिढ्यानपिढ्या हे गीत देशाच्या एकतेला आणि धैर्याला प्रेरणा देत आले आहे.”

भाजपने आपल्या अधिकृत एक्स (Twitter) खात्यातून बंकिमचंद्र चटर्जींचे योगदान आठवत लिहिले की, “त्यांनी केवळ शब्द लिहिले नाहीत, तर त्यांनी भारताचे स्वप्न रंगवले.” गृह मंत्री अमित शहा यांनी पटना येथील भाजपा कार्यालयात स्वदेशी शपथ घेत “आत्मनिर्भर भारत” घडविण्याचा नवा संकल्प केला आणि देशवासीयांना स्वदेशी अंगीकारण्याचे आवाहन केले.

या राष्ट्रीय उत्सवाच्या निमित्ताने ‘वंदे मातरम्’चा जयघोष पुन्हा एकदा संपूर्ण भारतात दुमदुमला — एकतेचा, अभिमानाचा आणि देशभक्तीचा स्वर प्रतिध्वनित करणारा.

समाज माध्यम साईट “x” वरील सध्याचे संसदेचे व्यवसाय मंत्री आणि मूकावर्गीय व्यवहार मंत्री किरण रिजिजू यांची प्रतिक्रिया.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट:

बातमी न्यूज

Jammu Kashmir News: कुपवाड्यात भारतीय दलाची मोठी कारवाई; दोन दहशतवादी ठार

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
१ प्रतिक्रिया

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत