नवी दिल्ली : जागतिक उपासमार समस्या सोडवण्यासाठी भारताने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भारत सरकार आणि जागतिक अन्नकार्यक्रम (World Food Programme – WFP)यांच्यात एक ऐतिहासिक करार झाला असून त्याअंतर्गत भारत पुढील पाच वर्षे भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) गोदामांतून पूरक आहारयुक्त तांदूळ (Fortified Rice) पुरवणार आहे. या करारामुळे संकटग्रस्त, नैसर्गिक आपत्तीग्रस्त आणि युद्धपीडित प्रदेशांमध्ये मानवतावादी मदतीसाठी अन्नसुरक्षा सुनिश्चित केली जाणार आहे. भारताकडून पुरवला जाणारा हा तांदूळ केवळ भूक भागवणार नाही, तर आवश्यक पोषक घटक उपलब्ध करून पोषणदृष्ट्या सक्षम समाज निर्माण करण्यास देखील मदत करेल.

WFP (World Food Programme) काय आहे ?
१९६१ या वर्षी एक महत्त्वाची मदतसंस्था जागतिक अन्नकार्यक्रम (WFP) ही एक संयुक्त राष्ट्रांची मदतसंस्था आहे. या संस्थेचे मुख्य ध्येय जगातील भूक कमी करणे, आपत्तीग्रस्त परिसरात अन्नधान्य पोहचवणे आणि कुपोषणावर उपाययोजना करणे हे आहे. दरवर्षी लाखो-कोट्यवधी लोकांना थेट अन्न व पोषणाची मदत WFP मार्फत मिळते. नैसर्गिक आपत्ती, दारिद्र्य, युद्ध किंवा संघर्ष यामुळे त्रस्त भागांपर्यंत ही संस्था सातत्याने पोहोचते. आज WFP जगातील सर्वांत मोठे अन्नसहाय्य अभियान म्हणून ओळखले जाते. २०२० मध्ये या संस्थेला नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला असून “शून्य उपासमार” हा संयुक्त राष्ट्रांचा उद्देश साध्य करण्यासाठी ती अखंड कार्यरत आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
- पुढील ५ वर्षे FCI गोदामांमधून WFP ला पूरक आहारयुक्त तांदुळाची उपलब्धता.
- संकटग्रस्त व संघर्षग्रस्त देशांमध्ये मानवतावादी मदतीसाठी हा तांदूळ वितरित होणार.
- केवळ अन्नधान्य पुरवठाच नव्हे तर पोषण आणि आरोग्य गरजा पूर्ण करण्यास मदत.
- भारताची ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भूमिका अधोरेखित करणारे पाऊल.
सरकार व WFP यांचे अभिप्राय
भारत सरकारचे म्हणणे आहे की, हा उपक्रम जागतिक पातळीवरील भूक व कुपोषण निर्मूलनासाठी भारताच्या बांधिलकीचे प्रतिक आहे. WFP नेही भारताच्या या निर्णयाचे स्वागत केले असून जगातील असंख्य वंचित लोकांना याचा थेट लाभ मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.
या करारामुळे भारत केवळ स्वतःच्या अन्नसुरक्षेसाठी नव्हे, तर जागतिक आहारसुरक्षेतही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मानवतेसाठी इतिहास घडवणारे हे पाऊल जागतिक सहयोगाचे उत्तम उदाहरण मानले जात आहे.
संबंधित कार्यक्रमाचा यु ट्यूब वरील डी. डी. न्यूज चा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट:
