आज दि ३० ऑगस्ट २०२५ रोजीव SCO परिषदेपूर्वी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Zelensky) यांनी फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi) यांच्याशी दूरध्वनीवर महत्त्वाची चर्चा झाली. या चर्चेत रशिया-यूक्रेन युद्ध (Russia Ukrain War), त्याचा मानवी दृष्टीकोन, तसेच शांतता व स्थिरतेसाठी प्रयत्न याबाबत संवाद साधला गेला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सोशल मीडियावर, “आज युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचा फोन आला. आम्ही सध्याच्या युद्धाबद्दल, त्याच्या मानवी पैलूंबद्दल आणि शांतता व स्थिरता पुनर्स्थापनेसाठीच्या प्रयत्नांबद्दल चर्चा केली. या अत्यंत गंभीर प्रसंगी, भारत सर्व प्रयत्नांना पूर्ण पाठिंबा देईल,” असे मोदींनी म्हटले आहे.

काय म्हणाले झेलेन्स्की Zelensky ?
झेलेन्स्की (Zelensky) यांनी समाज मध्यम साईट “x” वर पोस्ट करत सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि युरोपियन नेत्यांशी वॉशिंग्टन येथे झालेल्या बैठकीविषयी मोदींना माहिती दिली. युक्रेनचे अध्यक्ष म्हणाले, “रशियाच्या प्रमुखाशी मी भेटीस तयार आहे, मात्र मॉस्कोने अजूनही शांततेचा कोणताही संकेत दिलेला नाही. उलट नागरी भागावर हल्ले सुरू आहेत, ज्यात निष्पाप नागरिकांचे प्राण गेले,” असा आरोप त्यांनी केला. झेलेन्स्की यांनी भारताच्या मध्यस्थीला व SCO संमेलनाच्या आधी भारताने आवाज उठविण्यासाठी आभार मानले.
शांततेसाठी भारताचा सातत्यपूर्ण पाठिंबा
दोन्ही नेत्यांमध्ये युद्धविराम तसेच शांततेसाठी तातडीच्या उपायांचा आणि द्विपक्षीय सहयोगाबाबत चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा सांगीतले की संवाद आणि राजनैतिक मार्गानेच युद्ध थांबवता येईल व शांतता प्रस्थापित करता येईल. भारत अशाप्रकारच्या सर्व प्रयत्नांना समर्थन देईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
द्विपक्षीय संबंध आणि आगामी योजना
चर्चेत भारत -युक्रेन (India- Ukrain) संबंधांचे पुनरावलोकन झाले, भविष्यातील उच्चस्तरीय भेटी, एकत्रित आंतर-शासकीय आयोगाची बैठक, याबद्दल तयारी आणि द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. झेलेन्स्की (Zelensky) यांनी लवकरच पंतप्रधान मोदींना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि दोन्ही देशांमध्ये शांती व सहकार्याचे मोठे भविष्य असल्याचे त्यांनी सांगितले.
SCO संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा आणि भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय शांतता स्थापनेसाठी महत्वपूर्ण ठरू शकते.
समाज माध्यमावरील Zelensky यांची पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
