येशू जन्मला 

 २५ डिसेंबर च्या पवित्र दिवशी  प्रभू  येशू ख्रिस्ताचा जन्म झाला 

मानवीय रुपात जन्माला आलेला असा एकमेव ईश्वरपुत्र ज्याने संपूर्ण सृष्टीतील   मानव जातीला  प्रेम आणि करूणा शिकविण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.

हाथापायात खिळे ठोकलेले असताना  आणि  वधस्तंभावर अंतिम क्षण मोजत असताना  देखील, क्रूरतेची हद्द पार करणाऱ्यांसाठी “हे परमेश्वरा यांना क्षमा कर,  कारण हे काय करत आहेत, ते यांना समजत नाही !” असे म्हणत  स्वत:च्या  शरीराच्या अत्यंत दयनीय अवस्थेतही  स्वत:साठी  आपल्या परमपित्याकडे काहीही न  मागता एकंदरीत मानवजातीसाठी मात्र   “क्षमा” मागणारा Yeshu (Jesus)   ‘येशू’  ख्याि्स तर जगात मानवीय रुपात जन्माला आलेला एकमेव  दया, क्षमा आणि करुणेचा  अथांग सागर आहे.

एकदा Yeshu (Jesus) येशू व त्याचे शिष्य तारवातून जात असतना वादळ आले  तेव्हा तारू वाऱ्याने झाकू लागले, त्यावेळी येशू झोपलेला होता व त्याचे  शिष्य त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले “प्रभुजी वाचवा, आम्ही  बुडालो.” अहो, अल्पविश्वासी, तुम्ही भित्रे कसे?’ मग उठून त्याने वारा व  समुद्र ह्यास धमकावले आणि ते अगदी निवांत झाले.” तेव्हा त्या माणसांना  आश्चर्य वाटले कि “हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे कि वारे व समुद्र ह्याचे  ऐकतात !” – मत्तय :८:२६, २७

रस्त्याने जात असताना रक्तश्रावाणे पिडीत एक  स्त्री त्याच्या मागे येऊन  त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली व मनात म्हणत होती “मी केवळ त्याच्या  वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरीही मी बरी होईल, तेव्हा  Yeshu (Jesus)   येशूने मागे वळून पाहिले व म्हणाला “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला  बरे केले आहे.” आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली.

एका ठिकाणाहून जात असताना दोन आंधळे व्यक्ती  येशूच्या Yeshu (Jesus) मागे  चालत जाऊन मोठ्याने बोलले “अहो दाविपुत्र आम्हावर दया करा”तो घरात गेल्यावर  ते आंधळे त्याच्याजवळ आले; तेव्हा Yeshu (Jesus) येशू त्यांना म्हणाला “हे  करण्यास मी समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरता काय ?” तेव्हा ते त्याला  म्हणाले “होय, प्रभू” तेव्हा येशूने त्यांच्या डोळ्यास स्पर्श करून म्हंटले  , “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हास प्राप्त होवो.”तेव्हा त्यांना दृष्टी  आली व ते पाहू लागले.

मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे  तुमच्यासाठी उघडले जाईल, कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो  त्याला सापडते  जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल.

हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे; आणि जसे आम्ही आपल्या  ऋण्यास ऋण सोडले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड; आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण कि राज्य, सामर्थ्य आणि गौरव हि सर्वकाळ तुझी आहेत: आमेन.