मराठवाड्याच्या सांस्कृतिक व व्यापारी केंद्र लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज लातूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ (Latur Mahanagarpalika Election 2026) च्या निमित्ताने आयोजित सभेत उपस्थितांना संबोधित केले. लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर-रत्नेश्वर, हजरत सुरज शहा वली आणि राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना नमन करून त्यांनी सभेला सुरुवात केली. या निवडणुकीत राष्ट्रवाडी काँग्रेसने ५६ उमेदवार आणि ५ पुरस्कृत असे एकूण ६१ उमेदवार उभे केले असून, तरुण, सुशिक्षित आणि दृष्टी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले, ज्यात परदेशातून शिक्षण घेतलेली बॅरिस्टर तरुणीही सामील आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांची लातूरच्या नागरी समस्यांवर उपाययोजना आणि जीएसटी अनुदानाची घोषणा
लातूरकरांनी अनेक वर्षे विविध पक्षांना संधी दिली असली तरी पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा अभाव कायम असल्याचे सांगून अजित पवार यांनी जकात, एलबीटी आणि जीएसटीमुळे महानगरपालिकांचे उत्पन्न घटल्याचा मुद्दा उपस्थित केला. इचलकरंजी महापालिकेप्रमाणे लातूरलाही न्याय मिळवून देणार असून, जीएसटीचा हिस्सा वाढवण्याची जबाबदारी मी स्वतः घेणार असे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील स्वच्छता, कायदा-सुव्यवस्था, पर्यावरण संरक्षण, वाहतूक, व्यापारी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, दफनभूमी, स्मशानभूमी, भाजी मंडई आणि पोलीस यंत्रणा सक्षम करणार असल्याचे आश्वासन दिले. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील २५ वर्षांच्या विकासानुभवावर आधारित रस्ते, पाणीपुरवठा, उद्याने आणि क्रीडांगणे लातूरमध्ये उभे करणार असे सांगताना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा सन्मान राखण्याचा आग्रह त्यांनी केला.
अजित पवार (Ajit Pawar) : शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारसरणीवर चालणारा पक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस हा जातीभेद नसलेला पक्ष असून, समाजातील प्रत्येक घटक परिवाराचा भाग आहे असे सांगून अजित पवार यांनी मुस्लिम, ओबीसी, लिंगायत, मागासवर्गीय, मराठा, आदिवासी, मारवाडींसह सर्वांना प्रतिनिधित्व दिल्याचे नमूद केले. संजय बनसोडे यांच्या काळात ७५ कोटींचे विभागीय क्रीडा संकुल आणि बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून २५ कोटींचे सहकार भवन हे लातूरच्या विकासाचे उदाहरण असल्याचे सांगितले. अर्थमंत्री म्हणून अल्पसंख्याकांसाठी अधिक निधी, मालमत्ता कर वाढ, सुप्रीम कोर्टातील प्रलंबित प्रश्नांसह लाडकी बहिण, एआय आधारित शेती, यूपीएससी-एमपीएससी केंद्र, डिजिटल शाळा, एसटीपी आणि ई-गव्हर्नन्सद्वारे लातूरला आधुनिक शहर बनवणार असे आश्वासन दिले.
अजित पवार (Ajit Pawar) : गुन्हेगारीवर कारवाई आणि १५ जानेवारीला मतदानाचे आवाहन
गुन्हेगारी, विकृत प्रवृत्ती आणि कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगून अजित पवार यांनी घड्याळाच्या चिन्हावर १५ जानेवारी रोजी मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. संविधानानुसार श्रीमंत आणि लाडक्या बहिणीचे मत समान आहे हे लोकशाहीचे मर्म असल्याचे नमूद करताना त्यांनी समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये राज्य सहन करणार नसल्याचे ठणकावून सांगितले. लातूरच्या ऐतिहासिक वारशाला सलाम करताना या सभेने राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीत मजबूत आधार दिला आहे.
समाज माध्यमावरील अजित पवार यांची प्रतिक्रिया वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
