डोनाल्ड ट्रंपच्या आर्थिक धोरणांचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम, बाजारात मोठी घसरण- Share Market

Vishal Patole
Share Market

Share Market- शेअर बाजार एक चांगली वाढीची दिशा घेत होता, पण त्याच वेळी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांच्या धोरणांनी बाजारात अस्थिरता निर्माण केली. ट्रंप यांच्या नवीन धोरणांनी, विशेषतः त्यांच्या सख्त आर्थिक धोरणांमुळे, केवळ जागतिक बाजारपेठेवरच नव्हे, तर भारतीय शेअर बाजारावरही मोठा परिणाम झाला आहे.

डोनाल्ड ट्रंपच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणांचा Share Market वर प्रभाव

डोनाल्ड ट्रंप यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला, त्यांचा ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणावर भर आहे. ट्रंप यांनी चीन, मेक्सिको आणि कॅनडा यांच्याकडून होणाऱ्या सर्व आयातीवर टॅरिफ वाढवण्याची घोषणा केली. मेक्सिको आणि कॅनडाच्या उत्पादनांवर ३०% आणि चीनवरील अतिरिक्त १०% टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अमेरिके मध्ये महागाई वाढण्याची शक्यता आहे. महागाई वाढल्यास फेडरल रिझर्व्ह कडून व्याजदर कमी करण्याचा निर्णय लांबणीवर पडू शकतो, जो Share Market बाजारासाठी चिंता निर्माण करणारा ठरु शकतो. तसेच, डॉलरच्या मजबूतीमुळे आणि व्याजदरांच्या भवितव्याबाबत अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.

भारतीय शेअर बाजाराची (Share Market) स्थिती

गुरुवारी भारतीय शेअर बाजार (Share Market) लाल निशानित बंद झाला होता. अमेरिकेतील नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांच्या धोरणांमुळे आणि अमेरिकेतील व्याज दरात कटौती होण्याबाबत अनिश्चिततेमुळे भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली. सेंसेक्स १,१९०.३४ अंक (१.४८%) घसरून ७९,०४३.७४ वर बंद झाला. निफ्टी ३६०.७५ अंक (१.४९%) घसरून २३,९१४.१५ वर बंद झाला.

आईटी क्षेत्रातील मोठी घसरण-Share Market

या घसरणीचे मुख्य कारण म्हणून आईटी क्षेत्रातील शेअर्स प्रमुख आहेत. निफ्टी आयटी इंडेक्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली, आणि त्यात २% पेक्षा जास्त घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्स लार्जकॅपच्या तुलनेत चांगला प्रदर्शन करत आहेत. निफ्टी मिडकॅप १०० इंडेक्स २८.४० अंक (०.०५%) वाढून ५६,३००.७५ वर पोहोचला, तर निफ्टी स्मॉलकॅप १०० इंडेक्स ८.७० अंक (०.०५%) वाढून १८,५११.५५ वर पोहोचला.

विदेशी गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन-Share Market

Share Market-मार्केट तज्ज्ञांनी सांगितले की, अमेरिकेतील बाजारात झालेल्या बिकवालीने आयटी क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण आणली. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे. दुसरीकडे, विदेशी संस्थागत गुंतवणूकदार (एफआयआय) आणि कमी किमतीच्या शेअर्समध्ये संधी शोधणाऱ्या गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक दिसत आहे. त्याचवेळी, पीएसयू बँक, मीडिया आणि रियल्टी सेक्टरमध्ये खरेदी झाली आहे.

Share Market- बाजाराचे भवितव्य

तज्ज्ञांच्या मते, Share Market बाजारातील सध्याच्या घसरणीमुळे आणखी कमजोरीचा इशारा मिळतोय. डिसेंबर महिन्यात आगामी सत्रांमध्ये इंडेक्स २३,५०० पर्यंत घसरू शकतो, जो जवळपास २००-डे EMA (एक्सपोनेंशियल मूव्हिंग एव्हरेज) आहे. या स्तराखाली गेल्यास, इंडेक्स नोंदवलेल्या नोव्हेंबरच्या नीचांकी स्तर २३,२६३ पर्यंत घसरण होऊ शकते.

बीएसई सेंसेक्सचे टॉप ३० शेअर्स

बीएसई सेंसेक्सच्या टॉप ३० शेअर्समध्ये, SBI सोडून इतर सर्व शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. सर्वाधिक घसरण आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये दिसून आली. इंफोसिस ३.५०%, अडानी पोर्ट ३%, बजाज फायनान्स २.९०%, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचसीएल टेक, आणि नेस्ले इंडिया यांच्या शेअर्समध्ये ३% पर्यंत घसरण झाली.

अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांना बाजारातील ताज्या घसरणीबाबत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.

लाईव्ह शेअर मार्केटसाठी येथे क्लिक करा.

शेअर मार्केट संबंधित व्हिडीओ

आमचे अन्य ब्लॉग :

“आकर्षक करिअरची संधी: समाज कल्याण विभागात २१९ जागा!” मुदत वाढून आता शेवटची दिनांक ३०-११-२०२४ – Sarkari Naukri 2024

महाराष्ट्राचा महायुतीला भरभरून आशीर्वाद !- Election Results 2024 Live

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
1 Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत