आता घर बसल्या काढा वोटर आय डी कार्ड- Apply For Voter ID

Apply For Voter ID

Vishal Patole
Apply For Voter ID

Apply For Voter ID कारण नुकतेच भारत निर्वाचन आयोगाने लोकसभा २०२४ इलेक्शनचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार संपूर्ण भारतात लोकसभा २०२४ चे इलेक्शन संपूर्ण भारतात वेगवेगळ्या ७ चरणांत पार पाडले जाणार आहे. १९ एप्रिल २०२४ या तारखेला पहिल्या चरणातील मतदानाला सुरुवात होईल तर सातव्या आणि शेवटच्या चरणाचे मतदान ०१ जून २०२४ रोजी होईल व शेवटी ०४ जून २०२४ रोजी लोकसभा २०२४ इलेक्शन चा निकाल लागणार आहे.

Apply For Voter ID

भारत हा तरुण देश आहे म्हणून येणाऱ्या इलेक्शन ला खूप मोठ्या संख्येत नवीन तरुण मुले मुली पहिल्यांदा मतदार बनणार आहेत परंतु जर आपले नाव मतदार यादीत नसेल अथवा आपल्याकडे मतदान कार्ड नसेल तर आपण यंदाचे मतदान करण्यापासून वंचित राहू शकता. त्यासाठी ज्यांनी आपल्या वयाची १८ वर्षे पूर्ण केले आहेत त्यांनी त्वरित आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याकरिता तसेच नवीन मतदान कार्ड मिळविण्याकरिता त्वरित अर्ज करावा apply for voter id जेणे करून आपणास मतदानाचा आपला संवैधानिक हक्क बाजवता येईल. आता आपणास प्रश्न पडला असेल कि आपले नाव मतदार यादीत कसे येईल अथवा आपणास मतदान कार्ड कसे मिळेल तर आज आपण मतदार यादीत नाव जोडण्याच्या विविध प्रक्रीयांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Apply For Voter ID

How to Apply For Voter ID – मतदान कार्डसाठी कसा अर्ज करावा.

मतदान कार्ड हे केवळ मतदान करण्यापुरते वापरले जाणारे कार्ड नसून तो एक ओळख पुरावा म्हणून सरकारी दस्तावेज आहे म्हणून मतदान कार्ड हे प्रत्येकाकडे असलेच पाहिजे. मतदान काढण्याच्या दोन प्रमुख पद्धती आहेत

  1. ऑनलाईन पद्धत – इलेक्शन विभागाच्या वेबसाईट वरून अर्ज करता येतो.
  2. मोबाईल App च्या माध्यमातून स्वत:च्या मोबाईल वरून अर्ज करता येतो.

आपण या दोन्ही पद्धती आज समजून घेणार आहोत.

१. ऑनलाईन पद्धत – How to Apply for Voter ID Online

कोणत्याही पद्धतीने अर्ज करण्या अगोदर आपल्या कडे काही महत्वपूर्ण दस्तावेज तयार ठेवावेत.

  • ओळख पत्र – आधार कार्ड / शाळा/ कॉलेज चे ओळखपत्र/ दहावी /बारावीचे परीक्षा प्रवेशपत्र
  • पत्याचा पुरावा – रेशन कार्ड / आधार कार्ड / रहिवाशी दाखला, इत्यादी.
  • वयाचा पुरावा – जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / टी.सी. / PAN कार्ड इत्यादी.
  • पासपोर्ट फोटो
  • मोबाईल क्रमांक
  • ई मेल आय. डी.
  • आई किंवा वडील / पती इत्यादींचे मतदान कार्ड
How to Apply for Voter ID Online
  1. (To Apply for voter id साठी) सर्वप्रथम मतदाता सेवा पोर्टल – https://voters.eci.gov.in/ ओपन करायचे आहे. या वेबसाईट वर साईन अप करण्यासाठी Sign Up या पर्यायावर क्लिक करावे.
  2. मोबाईल क्रमांक आणि ई मेल आय डी टाकून नंतर कॅप्चा कोड टाका.
  3. नंतर Continue या पर्यायावर क्लिक केल्यावर
  4. प्रथम नाव (First Name)आणि शेवटचे नाव (Last Name) किंवा आडनाव टाकावे त्यानंतर आपल्या आठवणीत राहील असा पासववर्ड टाकावा त्याखाली पुन्हा वरील टाकलेला पासवर्ड कन्फर्म करण्याकरिता पुन्हा टाकावा व शेवटी Request OTP या पर्यायावर क्लिक करावेत. त्यानंतर आपल्या मोबाईल व ईमेल आयड डी वर ओटीपी येतील.
  5. आपल्या मोबाईल आणि इमेल आयडी वर वेगवेगळे ओटीपी येतात.
  6. आलेले ओटीपी योग्य त्या पर्यायाच्या ठिकाणी जसेकी मोबाईल वर आलेला ओटीपी , मोबाईल ओटीपी टाकण्यासाठी दिलेल्या जागी तर इमेल ओटीपी, ईमेल ओटीपी टाकण्याच्या जागी प्रविष्ट करावा.
  7. आता आपणास नोंदणी झाल्याचा संदेश वेबसाईट वर दाखवेल. ते असे दिसेल You are Successfully Signed-Up. Kindly Login with your new credentials.
  8. आता आपण आपल्या वरील नमूद केलेल्या इमेल आय डी किंवा मोबाईल तसेच पूर्वीचा टाकलेला पासवर्ड प्रविष्ट करून पोर्टलवर लॉगीन करू शकतो म्हणून Login या पर्यायावर जाऊन आपला इमेल आय डी किंवा मोबाईल तसेच पूर्वीचा टाकलेला पासवर्ड प्रविष्ट करून लॉगीन या पर्यायावर क्लिक करावेत.
  9. त्यानंतर आपल्या मोबाईल वर एक ओटीपी येईल तो ओटीपी प्रविष्ट केल्यावर लॉगीन करायचे आहे.
how to apply for voter id

How to Apply for Voter ID- Form No 6 कसा भरावा

  • लॉगीन झाल्यावर फॉर्म्स आणि सर्विसेस असे दोन पर्याय आपणास स्क्रीन वर दिसतील तर त्यातील फॉर्म्स या सेक्शन मध्ये नवीन मतदार नोंदणी साठी फॉर्म नं. ६ भरायचा आहे त्यासाठी Fill Form 6 या पर्यायावर क्लिक करावेत
  • नंतर आपले राज्य, जिल्हा व आपला मतदारसंघ निवडावा व खालील दिलेल्या Next या पर्यायावर क्लिक करावेत.
  • आता आपले नाव व आडनाव टाकून आपला पासपोर्ट फोटो अपलोड करावा व नंतर खालील दिलेल्या Next या पर्यायावर क्लिक करावेत.
  • नंतर आपल्या नातेवाईकाचे म्हणजे आई किंवा वडील किंवा पती इत्यादीपैकी ज्याचे मतदान कार्ड उपलब्ध असेल त्यांचे नाव टाकावे सहसा आपल्या वडिलांचे नाव टाकावे लग्न झालेल्या मुलींनी पतीचे नाव टाकावे नंतर खालील दिलेल्या Next या पर्यायावर क्लिक करावेत.
  • आता अगोदरच टाकलेला मोबाईल आणि ई मेल आय डी टाकावा व मोबाईल व ई मेल आय डी स्वत:चा असेल तर Self आणि आपल्या संबंधित नातेवाईकांचे असेल तर Relative mentioned above हा पर्याय निवडावा व नंतर खालील दिलेल्या Next या पर्यायावर क्लिक करावेत.
how to apply for voter id
  • नंतर आपला आधार क्रमांक प्रविष्ट करावा व नंतर खालील दिलेल्या Next या पर्यायावर क्लिक करावेत.
  • आता आपले लिंग निवडावे व नंतर खालील दिलेल्या Next या पर्यायावर क्लिक करावेत.
  • नंतर जन्म दाखला अथवा शाळेच्या टी सी नुसार योग्य ती जन्म तारीख दाखल करावी व नंतर Document for proof of Date of Birth या पर्याया समोर असलेल्या चिन्हावर क्लिक करावे त्यानंतर आपला जन्म दाखला/ शाळेची टीसी / Pan कार्ड / आधार कार्ड जे आपण जन्माचा पुरावा म्हणून जोडणार आहोत तो पर्याय निवडावा व तो दस्तावेज अपलोड करावा व त्यानंतर खालील दिलेल्या Next या पर्यायावर क्लिक करावेत.
  • नंतर आपला सविस्तर पत्ता टाकावा व पत्याचा पूर्व म्हणून जो दस्तावेज देणार आहात तो पर्याय निवडून तोच दस्तावेज अपलोड करावा व त्यानंतर खालील दिलेल्या Next या पर्यायावर क्लिक करावेत.
  • नंतर आपल्या नातेवाईकाचे मतदान कार्डवरील माहिती प्रविष्ठ करावी व त्यानंतर खालील दिलेल्या Next या पर्यायावर क्लिक करावेत.
  • नंतर गावाचे नाव, राज्य टाकून वरील पत्यावर आपण केव्हापासून राहतो ते टाकावे शेवटी Place या पर्यायात आपल्या गावाचे नाव टाकावे व त्यानंतर खालील दिलेल्या Next या पर्यायावर क्लिक करावेत.
  • सर्वात शेवटी कॅपचा कोड टाकून Preview and Submit या पर्यायावर क्लिक करावे.
  • आता आपणास आपण भरलेला संपूर्ण फॉर्म दिसेल तो व्यवस्थित तपासून बघावा व काही चुकले असल्यास एडीट पर्यायातून दुरुस्त करून घ्यावे व शेवटी सर्व माहिती बरोबर असल्यास फॉर्म Submit करावा.
  • आता आपणास एक Acknowledgement पावती मिळेल ती पावती सांभाळून ठेवावी त्यावरून आपण आपल्या अर्जाची स्थिती तपासून पाहू शकतो.
  • अर्जाची स्थिती पाहण्यासाठी https://voters.eci.gov.in/home/track या लिंक वर क्लिक करून आपला पावती Acknowledgement क्रमांक टाकून चेक करू शकतो.
  • संपूर्ण प्रक्रीये नंतर आपले मतदान कार्ड आपणास पाठवले जाते जे आपणास पोस्टऑफिस च्या माध्यमातून पोस्टमन आणून देत असतो.

अधिकृत वेबसाईट https://voters.eci.gov.in/

२. मोबाईल App च्या माध्यमातून स्वत:च्या मोबाईल वरून अर्ज करता येतो. Apply for Voter ID Card

  • सर्वप्रथम आपल्याकडे वरील पद्धतीत सांगितल्या प्रमाणे नमूद सर्व कागदपत्रे असावीत आणि या प्रकारच्या नोंदणीत आपणास एका मोबाईल ची आवश्यकता पडणार आहे.
  • To Apply for voter id अगोदर प्ले स्टोर वर जाऊन Voter Helpline नावाचे App इंस्टाल करून घ्यावे ते इंस्टाल झाल्यावर ओपन करावे.
Apply for Voter ID Card- Step By Step Process - Step 1
  • त्यानंतर New User या पर्यायावर क्लिक करावे.
  • नंतर आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करावा व सेंड ओटीपी Send OTP या पर्यायावर क्लिक करावेत.
  • आपल्या मोबाईल वर एक ओटीपी येईल तो OTP पुढील टप्प्यात प्रविष्ट करावा.
  • मग आपले नाव व आडनाव टाकावे व पासवर्ड टाकून तोच पासवर्ड कन्फर्म करावा.
Apply for Voter ID Card- Step By Step Process - Step 2
  • मग आपला मोबाईल व पासवर्ड टाकून लॉगीन करावे.
  • LOGIN झाल्यावर आपल्या स्क्रीन वर वोटर रजिस्ट्रेशन, वोटर सर्व्हिसेस, डाऊलोड वोटर कार्ड असे बहु पर्याय येतील.
  • त्यापैकी आपणास apply for voter id साठी वोटर रजिस्ट्रेशन Voter Registration या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
Apply for Voter ID Card- Step By Step Process - Step 3
  • मग Yes, I am Applying for first time या पर्यायावर क्लिक करावे
  • त्यानंतर आपले राज्य, जिल्हा, मतदार संघ निवडावा
  • त्यानंतर आपली जन्मतारीख टाकावी मग जन्म तारीख पुरावा म्हणून जोडत असलेला दस्तावेज निवडावा
  • मग निवडलेल्या पर्यायाप्रमाणे दस्तावेज अपलोड करावा.
  • याच पद्धतीने इतर संपूर्ण माहिती भरून व आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करावीत व फॉर्म सबमिट करावा.
  • त्यानंतर काही दिवसात आपले मतदान कार्ड पोस्टाने पाठवले जाते व ते आपणास प्राप्त होते अशा प्रकारे apply for voter id ची प्रक्रिया पूर्ण होते.
Apply for Voter ID Card- Step By Step Process - Step 4

आमच्या इतर ब्लॉग विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत