(Maharashtra Election 2024) महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ : या वर्षीच्या मतदानाने २०१९ च्या निवडणुकींना मागे टाकलं आहे कारण महाराष्ट्रात यंदा सरासरी एकूण ६५.०२% मतदान झाले आहे. त्यासोबतच राज्यातील एकूण ४१३६ उमेदवारांचे नशीब वोटिंग मशीन मध्ये कैद झाले आहे. महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये ६५.०२% मतदान झालं असून, झारखंड राज्यात देखील ३८ विधानसभा मतदारसंघांमध्ये ६८.४५% मतदान नोंदवण्यात आलं आहे.संध्याकाळी ११:३० पर्यंत प्राप्त झालेल्या मतदानाच्या अद्ययावत माहितीनुसार २०१९ च्या निवडणुकींच्या तुलनेत यावर्षीच्या मतदान दर हा अधिक आहे. महाराष्ट्रात २०१९ मध्ये ६२.५४% मतदान झालं होतं. यावर्षीच्या मतदानाच्या आकडेवारीने हे सिद्ध केले आहे कि महाराष्ट्रातील मतदारांनी यंदा २०१९ च्या इलेक्शन पेक्षा रेकोर्ड ब्रेक मतदान केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक मतदान तर मुंबई शहरात केवळ ५२.०७ % मतदान -Maharashtra Election 2024
Maharashtra Election 2024- महाराष्ट्रातील सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झाले आहे कोल्हापूर मध्ये ७६.२५% मतदान झालं आहे. तर मुंबई शहर हा राज्यातील सर्वात कमी मतदान करणारा जिल्हा ठरला आहे. मुंबई शहर मध्ये केवळ ५२.०७% मतदान झालं. बुलढाणा जिल्ह्यात देखील मागील आकडेवारी मोडीत निघाली असून रेकोर्ड ब्रेक ७०.३२ टक्के मतदान झाले आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार, मतदानाच्या आकड्यांचे नियमित अद्ययावत अपडेट्स जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघानुसार Voter Turnout App वर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मतदानाच्या अंतिम आकड्यांचा तपशील मतदान केंद्र व मतदारसंघ निहाय लवकरच जाहीर केला जाईल. असे देखील निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
एकूण ४१३६ उमेदवारांचे भविष्य वोटिंग मशीनमध्ये कैद -Maharashtra Election 2024
महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन २०२४ साठी संपूर्ण राज्यातील एकूण २८८ मतदारसंघात एकूण ३७७१ पुरुष तसेच एकूण ३६३ महिला तर २ तृतीयपंथीय असे एकूण मिळून ४१३६ उमेदवार आपले नसीब आजमावत आहेत. दि. २०- नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच दिवशीराज्यातील एकूण १,००१८६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली. ग्रामीण भागातील एकूण ५७,५८२ मतदान केंद्रांवर तर शहरी भागातील ४२,६०४ मतदान केंद्रांवर राज्यातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे त्यासोबतच एकूण ४१३६ उमेदवारांचे भवितव्य वोटिंग मशीन मध्ये बंद झाले आहे. दि २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होईल आणि विधानसभा इलेक्शन २०२४ चा निकाल जाहीर केला जाईल.
बुलढाणा जिल्ह्यात ७०.३२% मतदान; विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये उत्साही प्रतिसाद-Maharashtra Election 2024
बुलढाणा जिल्ह्यात २०२४ विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट मतदानाचा प्रतिसाद मिळाला आहे, ज्यामुळे जिल्ह्याच्या एकूण मतदान टक्केवारीत ७०.३२% नोंदवली गेली. या जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वेगवेगळ्या प्रमाणात होती, तरीही सर्वत्र उत्साही मतदान दाखवले. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात ६२.१५% मतदान झाले, तर चिखली मतदारसंघात ७१.६८% मतदान नोंदवण्यात आले. जळगाव जामोद मतदारसंघात ७३.०२% मतदान झाले असून, खामगाव मतदारसंघात मतदानाची टक्केवारी ७६.०६% होती, जी जिल्ह्यातील सर्वाधिक आहे. मलकापूरमध्ये ७०.७५%, मेहकरमध्ये ६८.८०% आणि सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात ७०.०१% मतदान झालं. या उच्च मतदान टक्केवारीने बुलढाणा जिल्ह्यात लोकशाहीत सक्रिय सहभाग दाखवला आहे आणि मतदारांची वाढती जागरूकता आणि उत्साही प्रतिसाद दर्शवला आहे.
महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन जिल्हा निहाय मतदानाची टक्केवारी -Maharashtra Election 2024
Maharashtra Election 2024 मधील राज्यातील जिल्हानिहाय अंदाजीत मतदान टक्केवारी खालीलप्रमाणे आहे.
जिल्हा | एकूण मतदारसंघ | अंदाजित मतदान % |
अहमदनगर | १२ | ७१.७३ % |
अकोला | ५ | ६४.९८ % |
अमरावती | ८ | ६५.५७ % |
छत्रपती संभाजी नगर | ९ | ६८.८९ % |
बीड | ६ | ६६.४१ % |
भंडारा | ३ | ६९.४२ % |
बुलढाणा | ७ | ७०.३२ % |
चंद्रपूर | ६ | ७१.२७ % |
धुळे | ५ | ६४.७० % |
गडचिरोली | ३ | ७३.६८ % |
गोंदीया | ४ | ६९.५३ % |
हिंगोली | ३ | ७१.१० % |
जळगाव | ११ | ६४.४२ % |
जालना | ५ | ७२.३० % |
कोल्हापूर | १० | ७६.२५ % |
लातूर | ६ | ६६.९२ % |
मुंबई शहर | १० | ५२.०७ % |
मुंबई उपनगर | २६ | ५५.७७ % |
नागपूर | १२ | ६०.४९ % |
नांदेड | ९ | ६४.९२ % |
नंदुरबार | ४ | ६९.१५ % |
नाशिक | १५ | ६७.५७ % |
धाराशिव | ४ | ६४. २७ % |
पालघर | ६ | ६५.९५ % |
परभणी | ४ | ७०.३८ % |
पुणे | २१ | ६०.७० % |
रायगड | ७ | ६५.९७ % |
रत्नागिरी | ५ | ६४.९५ % |
सांगली | ८ | ७१.८९ % |
सातारा | ८ | ७१.७१ % |
सिंधुदुर्ग | ३ | ६८.४० % |
सोलापूर | ११ | ६७.३६ % |
ठाणे | १८ | ५६.०५ % |
वर्धा | ४ | ६८.३० % |
वाशीम | ३ | ६६.०१ % |
यवतमाळ | ७ | ६९.०२ % |
मतदानाच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे राज्यातील लोकांची मतदान प्रक्रियेसंबंधी जागरूकता वाढल्याचं दर्शवत आहे. विशेषतः तरुण मतदारांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती यावरून मतदान प्रक्रियेतील तरुणांचे महत्त्व अधिक लक्षात येत आहे.
Maharashtra Election 2024 मतदान शांततेत पार पडले
यासोबतच, निवडणूक आयोग आणि संबंधित यंत्रणांकडून मतदानाच्या शांतीपूर्ण आणि सुरक्षिततेची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली असल्याचं सांगण्यात आलं आहे. मतदान प्रक्रियेत कोणतीही अनुशासनहीनता किंवा गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी पोलिस दलाने कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. विविध स्थानिक प्रशासनाने योग्य मार्गदर्शन आणि मदतीच्या उपाययोजना केल्या, ज्यामुळे मतदारांना शांततेत मतदान करण्याची सुविधा मिळाली. यासाठी विशेषतः संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता, ज्यामुळे निवडणुकीचा संपूर्ण काळ शांततेत पार पडला. याबद्दल निवडणूक आयोगाने सर्व सुरक्षा यंत्रणांचे आभार व्यक्त केले आहेत.
इलेक्शन विभागाची अधिकृत वेबसाईट
आमचे अन्य ब्लॉग:
महाराष्ट्राचे “हिंदुहृदयसम्राट” आणि राजकारणातील प्रखर सूर्य : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakre)