Reading:महाराष्ट्राचे “हिंदुहृदयसम्राट” आणि राजकारणातील प्रखर सूर्य : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakre) – बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आदरांजली !
महाराष्ट्राचे “हिंदुहृदयसम्राट” आणि राजकारणातील प्रखर सूर्य : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakre) – बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आदरांजली !
शिवसेनाप्रमुख, ज्येष्ठ नेते आणि मराठी अस्मितेचे प्रखर प्रतीक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakre ) यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वरून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान मोदी आपल्या संदेशात म्हणाले की, “महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय जीवनावर खोलवर प्रभाव टाकणाऱ्या थोर व्यक्तिमत्त्वाला आज त्यांच्या जन्मशताब्दी दिनी आम्ही नमन करतो.” बाळासाहेब ठाकरे यांचे तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणी हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. सामान्य जनतेशी असलेला त्यांचा थेट संवाद आणि जनभावनांशी असलेली नाळ यामुळे ते लाखो लोकांचे प्रेरणास्थान बनले, असेही त्यांनी सांगितले. राजकारणाबरोबरच बाळासाहेब ठाकरे यांना संस्कृती, साहित्य आणि पत्रकारितेची विशेष आवड होती. व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी समाजातील वास्तव परिस्थितीवर नेमके आणि निर्भीड भाष्य केले. त्यांच्या व्यंगचित्रांमधून समाजातील प्रश्नांवर परखड मतप्रदर्शन होत असे. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेब ठाकरे यांची जी दूरदृष्टी होती, ती आजही आम्हाला प्रेरणा देते. त्यांच्या स्वप्नातील समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.” बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
आज हिंदूहृदय सम्राट स्व. श्री बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thakre यांची जयंती Balasaheb Thakre Jayanti निमित्त त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन तमाम जनतेला जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!! आजच्याच दिवशी २३ जानेवारी १९२६ रोजी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakre) या मानवरुपी सूर्याचा उदय झाला. त्यासोबतच हिंदुत्ववादी विचारांचा, हिंदूंच्या नेत्याचा उगम झाला. वेगवेगळ्या जाती-पातीत विखुरलेल्या हिंदू समाजाला एकत्र करण्याचे त्यांचे कार्य, विचार आणि नेतृत्व आजही मराठी आणि हिंदू माणसाच्या मनात जिवंत आहे. बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक राजकारणी नाहीत, राजकारणातील अडथळ्यांचा भेद करणारे नेतृत्व होते. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakre) यांनी मराठी आणि हिंदू माणसाच्या हक्कांसाठी लढा दिला आणि भारतीय राजकारणाला एक वेगळी दिशा दिली. त्यांनी हिंदू जनात हिंदूहिताच्या गोष्ठी पेरल्या. त्यांनी हिंदू जनमानसात एकता आणि अखंडता निर्माण करण्याचे कार्य केले. शिवसेना नावाचा पक्ष सुरु करून हिंदूंना एक व्यापक आणि राजकीय व्यासपीठ त्यांनी निर्माण करून दिले. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली वोटबँकेचे राजकारण करणाऱ्या राजकीय पार्ट्यांचे सत्य त्यांनी सतत देशाच्या व विशेष करून हिंदूंच्या समोर आणले. त्यांनी मरेपर्यंत “हिंदुत्वा” साठी लढा दिला. त्यांचे सर्वांशी सलोख्याचे संबंध असले तरीही “हिंदुत्वाच्या” तत्वज्ञानाशी त्यांनी कधीही तटजोड केली नाही. कोणत्याही पदाची लालसा न ठेवता. भारतीय राजकारणात त्यांनी शेवटपर्यंत किंगमेकरची भूमिका पार पाडली. त्यांनी भारतीय राजकारणाला अनेक मोठे नेते दिले. त्यांचे भारतीय राजकारणातील आणि हिंदू जनमानसाच्या मनातील स्थान हे नेहमी सर्वोच्च जागी असणार आहे. अशा या महामानवाला त्यांच्या जन्म जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम !!!
व्यंगचित्रकार, पत्रकार आणि सामाजिक विचारवंत- (Balasaheb Thakre)
सुरुवातीला (Balasaheb Thakre) बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य एक व्यंगचित्रकार म्हणून सुरू झाले होते. १९५० च्या दशकात त्यांनी ‘फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून कारकीर्द सुरू केली आणि आपल्या कौशल्याने वळण घेतले. त्यांची व्यंगचित्रे सत्ताधीशांच्या धोरणांचा धिक्कार करत, समाजातील अन्याय आणि विषमता उघड करीत होती. त्यांना इंदिरा गांधींची व्यक्तीरेखा खास आवडत असे आणि त्यांनी आपल्या चित्रकला व लेखणीच्या माध्यमातून त्यांच्या समकालीन घटनांवर प्रगल्भ व प्रभावी भाष्य केले.
“मार्मिक” – बाळासाहेबांचा प्रबोधनाचा मार्ग
१९६० मध्ये बाळासाहेबांनी ‘मार्मिक’ नावाचे व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले, जे मराठी पत्रकारितेतील एक मोलाची मणी ठरले. हे साप्ताहिक केवळ एक पत्रिका नव्हे, तर एक आवाज बनला ज्यात शिवसेना संस्थापकांनी मराठी माणसाच्या अस्मितेची आणि हक्काची वाचा फोडली. ‘मार्मिक’च्या माध्यमातून त्यांनी मुंबईतील मराठी लोकांच्या अधिकारांसाठी संघर्ष केला. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते ‘मार्मिक’चा पहिला अंक प्रकाशित झाला आणि या पत्रिकेने समाजातील गहन मुद्द्यांवर विचार मांडले.
शिवसेना: मराठी माणसाचा आवाज
१९६६ मध्ये (Balasaheb Thakre) बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, ज्यामुळे त्यांचे राजकीय जीवन एक नवे वळण घेत गेले. ‘शिवसेना’ केवळ एक राजकीय पक्ष नव्हता, तर ती एक चळवळ बनली, ज्याने महाराष्ट्रातील शेतकरी, बेरोजगार तरुण आणि समाजाच्या सर्वसामान्य लोकांच्या हक्कांसाठी लढा दिला. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली, शिवसेनेने मुंबईतील ‘मराठी माणसांच्या’ हक्कांचा मुद्दा उचलला आणि एक नविन राजकीय संस्कृती निर्माण केली. त्यांचे ऐतिहासिक भाषण, त्यांचा धाडसी दृष्टिकोन आणि समर्पित कार्यशक्ती शिवसेनेला एक प्रचंड लोकशाही शक्ती बनवून गेली.
हिंदुत्ववाद: एक ठाम विश्वास (Balasaheb Thakre)
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakre) हे एक ठाम हिंदुत्ववादी नेते होते. त्यांचे भाषणे आणि विचार दाहक, हिंदूंना प्रेरणा देणारे होते. त्यामुळे त्यांना नेहमीच ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणून ओळखले गेले. त्यांनी देशातील विविधतेचा सतत आदर केला, पण सोबतच भारतातील मुस्लिम समुदायातील काही कट्टरवादी घटकांवर त्यांनी सतत तीव्र टीका केली. तसेच राजकीय पक्षांकडून वोटबँकेसाठी जोपासल्या जाणाऱ्या धर्मनिरपेक्षतेच्या धोरणाला नेहमी त्यांचा विरोधच होता. त्याचवेळी हिंदूहितासाठी हिंदुत्वाचे सशक्त समर्थन हा त्यांच्या राजकारणाचा मुख्य गाभा होता. बाळासाहेबांच्या भूमिकेमुळे ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ अशी घोषणा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजली.
मी माझ्या शिवसेनेची कॉंग्रेस होऊ देणार नाही आणि जर अशी होताना दिसत असेल तर मी माझे दुकान बंद करेल –(Balasaheb Thakre)
एका न्यूज प्रसारण एजन्सीला साक्षात्कार देताना बाळासाहेबांनी आपले प्रखर विचार पुन्हा एकदा उद्घोषित केले. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले कि, “मी माझ्या शिवसेनेची कॉंग्रेस कधीही होऊ देणार नाही आणि ज्या दिवशी असे होत आहे असे मला दिसेल तेव्हा मी माझे दुकान बंद करेल”. याच साक्षात्काराची लिंक आम्ही आपणास खाली देत आहोत.
‘ठाकरे’ चित्रपट – Balasaheb Thakre यांच्या जीवनाचा साक्षात्कार
२०१९ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित चित्रपट प्रदर्शित केला गेला होता. ‘ठाकरे’ त्यांच्या जीवनातील अनेक महत्वपूर्ण घटनांचा उलगडा या चित्रपटात केला गेला आहे. हा चित्रपट नवाजुद्दीन सिद्दिकीच्या अप्रतिम अभिनयाने चर्चेत आला आहे, तर संजय राऊत यांच्या निर्मितीत बाळासाहेबांच्या राजकीय प्रवासाला मांडले गेले आहे.
आजही जिवंत असलेली छाया
१७ नोव्हेंबर २०१२ रोजी (Balasaheb Thakre Death Date) मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले, परंतु आजही त्यांच्या कार्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि समाजावर कायम आहे. शिवसेनेचे ताजे हिंदुत्ववादी नेतृत्व त्यांच्या शिकवणीचे पालन करत असले तरी, बाळासाहेबांचा ठसा अजूनही स्पष्टपणे दिसतो. त्यांचे कार्य, विचार आणि संघर्ष आजही मराठी माणसाच्या मनात अविरत उत्साह आणि प्रेरणा निर्माण करत आहेत.
‘माझे शिर शानाने उंच ठेवा, कारण मी महाराष्ट्राचा आहे’
स्व. बाळासाहेब ठाकरे
आज, त्यांच्या जन्म जयंती निमित्त देशभरात, बाळासाहेब ठाकरे यांच्या योगदानाला ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणून अभिवादन केले जात आहे. ‘माझे शिर शानाने उंच ठेवा, कारण मी महाराष्ट्राचा आहे’हे त्यांचे वाक्य अजूनही अनेक लोकांच्या प्रेरणास्त्रोत आहे.
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes