भावनगर (Bhavnagar), 20 सप्टेंबर 2025 : आज भारताच्या सागरी क्षेत्राच्या प्रगतीच्या मार्गात एक नवा इतिहास रचला गेला आहे. पंतप्रधान (Narendra Modi) नरेंद्र मोदींनी गुजरातमधील भावनगर (Bhavnagar) येथे आयोजित ‘समुद्र से समृद्धि’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात हजेरी लावली. सकाळी सुमारे 10:30 वाजता झालेल्या या कार्यक्रमात तब्बल 34,200 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पांमुळे संपूर्ण देशातील उद्योग, वाहतूक व रोजगारक्षेत्राला गती मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. या प्रसंगी पंतप्रधान मोदींनी सागरी क्षेत्रातील भारताची वाढती ताकद अधोरेखित करताना म्हटले की, “भारताची बंदरे ही आपल्या जागतिक सागरी सामर्थ्याच्या प्रवासाचा कणा आहेत. ‘समुद्र से समृद्धि’द्वारे आपण देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल अधिक वेगवान करणार आहोत.”

Bhavnagar येथे (Narendra Modi) मोदींनी Samudra Se Samruddhi अंतर्गत उद्घाटन केलेल्या प्रकल्पांचे महत्त्व
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi)आज ‘समुद्र से समृद्धि’ (Samudra Se Samruddhi) कार्यक्रमाअंतर्गत भावनगर (Bhavnagar) येथे 34,200 कोटी रुपयांच्या अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. या प्रकल्पांमध्ये बंदर विकास, जहाज बांधणी, हरित ऊर्जा आणि समुद्री उद्योगांना चालना देणारे उपक्रम समाविष्ट आहेत. या पावलांनी देशाच्या सागरी विभागाला नव्या उंचीवर नेण्यास मदत होणार असून, रोजगारसंधी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचा विस्तार होण्याची अपेक्षा आहे. मोदींनी या उपक्रमामुळे भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठी प्रगती होणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पांमुळे केवळ गुजरातच नव्हे तर संपूर्ण भारतातील सागरी क्षेत्राचा विकास होणार आहे. जसे कि-
- आधुनिक बंदर सुविधा व जहाज वाहतूक क्षेत्रातील गुंतवणुकी द्वारे लॉजिस्टिक्स मध्ये सुधारणा होणार.
- किनारी राज्यांतील मत्स्यव्यवसाय व पर्यटन उद्योगाला चालना मिळेल.
- नौकाबांधणी, देखभाल आणि दुरुस्ती उद्योगांसह स्थानिक रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.
- हरित ऊर्जा व शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणाऱ्या नव्या पायाभूत सुविधा या प्रकल्पात उभारल्या जाणार आहे.
पंतप्रधानांनी या कार्यक्रमात शिपिंग क्षेत्राशी संबंधित काही प्रमुख धोरणांवरही लक्ष केंद्रित केले. यामधून किनारी अर्थव्यवस्थेला गती देण्याबरोबरच ब्लू इकॉनॉमीमध्ये भारताची जागतिक पातळीवरील उपस्थिती मजबूत करण्याची दिशा मिळेल.या प्रकल्पांमुळे विशेषतः गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, केरळ आणि तमिळनाडू अशा किनारी राज्यांतील नागरिकांना थेट लाभ होणार असून, बंदरांचा विकास आणि व्यापार वाढल्याने देशाच्या जीडीपीतही सकारात्मक परिणाम दिसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
काय आहे Samudra Se Samruddhi ?
भारत सरकारने अलीकडेच सुरू केलेली ‘समुद्र से समृद्धि’ (Samudra Se Samruddhi) ही योजना म्हणजे भारताच्या समुद्रसंपत्तीचा सुयोग्य वापर करून आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय प्रगती घडवून आणण्याचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या उपक्रमामागे शाश्वत विकासाचे ध्येय, जलसंपत्तीचा विवेकपूर्ण वापर आणि किनारी महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील सागरी अर्थव्यवस्था बळकट करण्याची दूरदृष्टी आहे.
Samudra Se Samruddhi योजनेची उद्दिष्टे :
- भारताला ब्लू इकॉनॉमी म्हणजेच महासागराधारित अर्थव्यवस्थेत एक महत्त्वाचा भागीदार बनवणे.
- मत्स्यउद्योग, बंदर विकास, शिपिंग, पर्यटन आणि समुद्री खनिजसंपत्ती यांचा विकास करून रोजगार निर्मिती करणे.
- पारंपरिक मच्छीमारांच्या उत्पन्नात वाढ आणि त्यांचे जीवनमान सुधारणा.
- समुद्र जैवविविधतेचे संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणावर भर. उपक्रमाच्या प्रमुख बाबी
- आधुनिक बंदर सुविधा, जलमार्ग वाहतूक आणि लॉजिस्टिक्स प्रणाली विकसित करण्यावर भर.
- मत्स्यपालनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन जागतिक बाजारपेठेत भारतीय मासळीची मागणी वाढवणे.
- जहाजबांधणी व दुरुस्ती उद्योगांना चालना देऊन देशी उत्पादन क्षमतांना प्रोत्साहन.
- समुद्रातील ऊर्जा साधनांचा (वारा, लाटा, ज्वार) वापर करून स्वच्छ ऊर्जा निर्मिती.
महाराष्ट्र व सागरी राज्यांना लाभ :
महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, केरळ, तमिळनाडू यांसारख्या किनारी राज्यांना या योजनेतून थेट मोठा फायदा होणार आहे. विशेषतः कोंकण किनारपट्टीवरील मत्स्यव्यवसाय, पर्यटन आणि बंदर विकास यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात औद्योगिक व पर्यटन केंद्रे उभी राहून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
शाश्वत विकासाकडे वाटचाल :
‘समुद्र से समृद्धि’ ही योजना केवळ आर्थिक विकासावर भर देत नाही तर पर्यावरणपूरक दृष्टिकोन ठेवते. समुद्रातील जैवसंपत्तीचा अतिरेकी वापर टाळणे, प्रदूषण कमी करणे आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर किनारी भागांचे संरक्षण करणे या बाबींतही हा कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावतो. भारताची समुद्रकिनारी विस्तारलेली भूभाग रचना आणि संपन्न सागरी संसाधने लक्षात घेता ही योजना देशाला नव्या आर्थिक उंचीवर नेणारी ठरू शकते. ‘समुद्र से समृद्धि’ म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा संतुलित वापर करून शाश्वत प्रगतिचा मार्ग—आर्थिक आत्मनिर्भरतेकडे आणि पर्यावरणीय जबाबदारीकडे वाटचाल करणारी भारताची नवी पावले.
आजचा दिवस भारताच्या सागरी इतिहासात सुवर्णपान ठरेल असा विश्वास यानिमित्त व्यक्त होत असून, ‘समुद्र से समृद्धि’ हा उपक्रम भारताला वैश्विक सागरी महासत्ता बनविण्याकडे मोठा टप्पा ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
