
Brics Summit 2024– BRICS गटाचे महत्त्व आणि भविष्यातील दिशा
रशिया मधील कजान या ठिकाणी आयोजित १६ व्या Brics Summit 2024 या परिषदेत BRICS गटाने आपल्या संघटनेत सामील देशांमधील राजकीय आणि आर्थिक सहकार्य वाढविण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ म्हणून काम करत असल्याचे अधोरेखित केले.
Brics Summit 2024 मधील महत्वाचे निर्णय:
- बहुपरस्परवाद: BRICS २०२४ च्या शिखर संमेलनामध्ये गटातील सदस्य राष्ट्रांनी एकमताने बहुपोलर जागतिक व्यवस्थेची आवश्यकता व्यक्त केली, ज्यामुळे सदस्य देश त्यांच्या रचनात्मक क्षमतेचा उपयोग करून समान व न्याय्य आर्थिक विकास साधू शकतात तसेच अधिक न्याय्य आणि लोकतांत्रिक जागतिक व्यवस्थेसाठी बहुपरस्परवादाचे मजबूतीकरण करणे आवश्यक असल्याचे शिखर संमेलनातील देशांनी मान्य केले. ज्याकरिता नवीन शक्ती केंद्रांचा उदय करणे, जेणे करून अधिक समान, न्याय्य, लोकतांत्रिक आणि संतुलित बहुपोलर जागतिक व्यवस्थेसाठी मार्ग तयार होऊ शकेल.
- संयुक्त राष्ट्रांची सुधारणा: Brics Summit 2024 मध्ये पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या सुधारणा करण्यासाठी BRICS च्या वचनबद्धतेची पुनरावृत्ती केली गेली कारण त्यामुळे अधिक कार्यक्षम, प्रतिनिधिक आणि लोकशाही प्रणाली जागतिक पटलावर स्थापन होईल. विशेषतः आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील EMDCs आणि कमी विकसित देशांचे अधिक महत्त्वपूर्ण योगदान सुनिश्चित करण्याची गरज आहे त्याकरिता संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणा बाबत BRICS ने आपले समर्थन Brics Summit 2024 मध्ये पुन्हा एकदा व्यक्त केले, ज्यामध्ये सुरक्षा परिषद अधिक लोकशाही, प्रतिनिधिक आणि कार्यक्षम बनविण्यावर BRICS कडून लक्ष केंद्रित केल्या जाणार आहे. कारण सुरक्षा परिषदेत विकासशील देशांचे प्रतिनिधित्व वाढविणे हि काळाची गरज आहे हे ओळखूनच BRICS गटाने UN च्या सुरक्षा परिषदेत विकासशील देशांचे प्रतिनिधित्व वाढविण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे, जेणेकरून जागतिक आव्हानांना अधिक प्रभावीपणे उत्तर दिले जाऊ शकते. भारत देखील गेल्या दशकभरापासून यासाठी सतत प्रयत्त्नशील राहिला आहे.
- आर्थिक सहकार्य: BRICS देशांनी जागतिक आर्थिक सुरक्षा जाळे मजबूत करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी केली तसेच विश्व व्यापार संघटनेच्या (WTO) नियमाधारित व्यापार प्रणाली च्या समर्थनाची पुनरावृत्ती परिषदेत केली गेली, ज्यात विकासशील देशांना विशेष व भिन्न उपचारांची गरज आहे हे मान्य केले गेले. तसेच WTO सुधारणा प्रक्रियेत सामील होण्यासाठी BRICS च्या वचनबद्धतेचे आश्वासन दिल्या गेले आणि IMF च्या सुधारणा आवश्यक असल्याचे मान्य केले गेले. अवैध एकपक्षीय दबाव उपायांचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांवर नकारात्मक कार्य करतात तसेच UN चार्टर आणि बहुपरस्पर व्यापार प्रणालीला देखील बाधित करतात हे मान्य केले .
- BRICS गटामधील देशांदरम्यान क्रॉस-बॉर्डर पेमेंट करणे:– BRICS सदस्य राष्ट्रांनी आर्थिक सहकार्य वाढविण्यासाठी आपल्या वचनबद्धतेची पुनरावृत्ती केली आहे. त्यांनी जलद, कमी किमतीत, अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि सुरक्षित क्रॉस-बॉर्डर पेमेंट साधनांचा वापर वाढवण्याचे महत्त्व मान्य केले आहे कारण हि साधने व्यापारातील अडथळे कमी करून सर्वांसाठी प्रवेश सुलभ करतात. क्रॉस-बॉर्डर पेमेंटसाठी स्थानिक चलनांचा वापर: BRICS देशांमधील आर्थिक व्यवहारांमध्ये स्थानिक चलनांचा वापर प्रोत्साहित करण्यात येणार आहे, ज्यामुळे आर्थिक व्यवहार अधिक सुलभ होतील तसेच Brics Summit 2024 मध्ये BRICS गटातील देशांदरम्यान समन्वयक बँकिंग नेटवर्क मजबूत करण्यावर जोर देण्यात आला आहे, ज्यामुळे स्थानिक चलनांमध्ये व्यवहाराची व्यवस्थितता साधता येईल. Brics Summit 2024 मध्ये BCBPI योजना मांडली गेली ज्यामध्ये BRICS देशांदरम्यान क्रॉस-बॉर्डर पेमेंट इनिशियेटिव्ह (BCBPI) अंतर्गत, सहकार्य स्वेच्छेने आणि बंधनकारक नसलेल्या आधारावर वाढवले जाईल तसेच येणाऱ्या भविष्यात BRICS पेमेंट टास्क फोर्स उभी केल्या जौऊ शकेल ज्यामुळे या क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट होईल यावर Brics Summit 2024 मध्ये विश्वास व्यक्त केला गेला.
- नवीन भागीदार: Brics Summit 2024 मध्ये गटाबाहेरील अन्य १३ नवीन देशांना BRICS भागीदार देशांचा दर्जा मंजूर करण्यात आला आहे, ज्यात अल्जेरिया, बोलिव्हिया, बेलारूस, क्युबा,इंडोनेशिया, कझाकस्तान, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, तुर्की, उझबेकिस्तान, युगांडा, व्हिएतनाम या एकूण १३ देशांचा समावेश आहे.
- पुनर्विकासाचे धोरण: BRICS ने कृषि, आरोग्य आणि इतर क्षेत्रांतील सहकार्याचे महत्त्व मान्य केले आणि वेगवान व कमी खर्चात क्रॉस-बॉर्डर पेमेंट प्रणाली विकसित करण्याचे वचन दिले.
- युक्रेनच्या संघर्षाबाबत चिंता: Brics Summit 2024 परिषदेत युक्रेनच्या संघर्षाबाबत चिंतादायक मुद्दे उभे राहिले, तसेच मध्य पूर्वेतील परिस्थितीवरही चर्चा करण्यात आली. या सर्व मुद्द्यांवर BRICS ने सामूहिक संवाद आणि समजूतदारपणाची गरज व्यक्त केली.
- Brics Summit 2024 मध्ये G20 वर चर्चा : “परिणाम-देणारं परिणामांवर लक्ष केंद्रित करून एकमतावर आधारित, G20 च्या निरंतर आणि उत्पादक कार्याचे महत्त्व” Brics Summit 2024 मध्ये सर्वानुमते अधोरेखित केले गेले.
- भविष्यातील साथीच्या रोगांच्या प्रतिबंधावर: Brics Summit 2024 मध्ये पुढील विकासासाठी मोठ्या प्रमाणावर संसर्गजन्य रोगांचे धोके रोखण्यासाठी BRICS R&D लस केंद्र , BRICS इंटिग्रेटेड अर्ली वॉर्निंग सिस्टमची उभारणी करण्याचा निर्णय घेतला गेला.
- दुर्मिळ प्रजातींचे जतन :- Brics Summit 2024 मध्ये प्राण्यांच्या दुर्मिळ प्रजातींचे रक्षण करणाऱ्या देशांची दखल घेतली गेली विशेषत: भारताच्या “व्याघ्र संवर्धन” बाबतच्या कार्याचे कौतुक केले गेले. तसेच दुर्मिळ प्रजातींचे जतन करण्यासाठी ब्रिक्स देशांना आणखी योगदान देण्यासाठी एकत्र काम करण्यास प्रोत्साहित केले गेले.
या परिषदेत घेतलेल्या निर्णयांनी BRICS गटाची एकता आणि सहयोग दृढ करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत, ज्यामुळे जागतिक स्तरावर आर्थिक आणि सामाजिक न्याय साधण्याची दिशा सुनिश्चित केली जाईल. BRICS गटाच्या सदस्य देशांनी एकत्रितपणे काम करून जागतिक आव्हानांवर मात करण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे जे जागतिक दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.

Brics Summit 2024– ब्रिक्स काय आहे ?
BRICS म्हणजेच ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा एक गट आहे. BRICS चा विचार २००९ मध्ये सुरू झाला परंतु “BRIC” हा शब्द २००१ मध्ये यु. के. (युनायटेड किंगडम) चे अर्थशास्त्रज्ञ जिम ओ’नीलने सर्वप्रथम वापरला होता. आजच्या आधुनिक युगात जागतिक महासत्तांच्या पेचातून बाहेर राहून अविकसित व विकसनशील देशांना प्रगतीपथावर पुढे घेऊन जाण्यासाठी BRICS चे अनन्यसाधारण महत्व आहे.
Brics Summit 2024 स्थापना:
१६ जून २००९ रोजी रशियाच्या येकातेरिनबर्ग येथे ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या प्रमुख चार देशांची उद्घाटनपर पहिली ब्रिक शिखर परिषद भरली होती. BRICS गटाला औपचारिक शस्त्र, चार्टर किंवा मुख्यालय नाही, परंतु हा एक व्यासपीठ आहे जे सदस्य देशांमध्ये राजकीय आणि आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी काम करते. या गटाचा उद्देश व्यापार, गुंतवणूक, आणि शाश्वत विकासासारख्या मुद्द्यांवर सहकार्य वाढवणे आहे. BRICS देश आर्थिक व इतर विषयातील आंतरराष्ट्रीय संस्थांची पुनर्रचना करण्यासाठीही कार्यरत आहेत.

आज पर्यंत झालेले Brics Summit
| परिषद क्रमांक | वेळ | आयोजनाचे ठिकाण | अध्यक्ष |
| पहिली परिषद | १६ जून २००९ | येकातेरिनबुर्ग, रशिया | दिमित्री मेदवेदेव |
| दुसरी परिषद | १५ एप्रिल २०१० | ब्राझिलिया, ब्राझिल | लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा |
| तिसरी परिषद | १४ एप्रिल २०११ | सान्या, चीन | हू जिंताओ |
| चौथी परिषद | २९ मार्च २०१२ | नवी दिल्ली, भारत | मनमोहन सिंग |
| पाचवी परिषद | २६-२७ मार्च २०१३ | डर्बन, दक्षिण आफ्रिका | जेकब झुमा |
| सहावी परिषद | १४-१६ जुलै २०१४ | फोर्तालेझा आणि ब्राझिलिया, ब्राझील | दिल्मा रूसेफ |
| सातवी परिषद | ८–९ जुलै २०१५ | उफा, रशिया | व्लादिमिर पुतिन |
| आठवी परिषद | १५-१६ ऑक्टोबर २०१६ | गोवा, भारत | नरेंद्र मोदी |
| नववी परिषद | ३-५ सप्टेंबर २०१७ | झियामेन, चीन | शी जिनपिंग |
| दहावी परिषद | २० ते २७ जुलै २०१८ | जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका | सिरिल रामाफोसा |
| अकरावी परिषद | १३-१४ नोव्हेंबर २०१९ | ब्राझिलिया, ब्राझील | जैर बोलसोनारो |
| बारावी परिषद | जुलै २०२० | सेंट पीटर्सबर्ग रशिया | व्लादिमीर पुतिन |
| तेरावी परिषद | जून २०२१ | भारत | नरेंद्र मोदी |
| चौदावी परिषद | २३ जून २०२२ | चीन | शी जिनपिंग |
| पंधरावी परिषद | २२ ते २४ ऑग २०२३ | जोहान्सबर्ग, दक्षिण अफ्रिका | सिरिल रामाफोसा |
| सोळावी परिषद | २२ ते २४ ऑक्टोबर २०२४ | कानाज, रशिया | व्लादिमीर पुतिन |
| सतरावी परिषद | २०२५ | ब्राझील | – |
BRICS Summit 2024 अधिकृत वेबसाईट
BRICS Summit 2024 विषयी अधिक माहिती घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट आहे
https://brics-russia2024.ru/en/
FAQ
Q. 1. BRICS full form ?
Ans :- ब्रिक्स हे नाव चार प्रमुख राष्ट्रांच्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरांपासून बनले आहे जसे कि ब्राझील (Brazil) चे B, रशिया (Rashia) चे R, भारत (India) चे I, चीन (China) चे C आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) चे S. BRICS हे एक वरील देशांची एक आंतरराष्ट्रीय संघटन आहे.
Q. 2. BRICS members?
Ans :- ब्राझील (Brazil), रशिया (Rashia), भारत (India), चीन (China) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa)
Q. 3. BRICS new members?
Ans:- अल्जेरिया, बोलिव्हिया, बेलारूस, क्युबा,इंडोनेशिया, कझाकस्तान, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, तुर्की, उझबेकिस्तान, युगांडा, व्हिएतनाम या एकूण १३ देशांचा समावेश बब्रिक्स मध्ये नुकताच झाला आहे.
Q. 4. BRICS countries ?
Ans:- ब्राझील (Brazil), रशिया (Rashia), भारत (India), चीन (China) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) या प्रमुख ब्रिक्स कंट्री आहेत आणि अल्जेरिया, बोलिव्हिया, बेलारूस, क्युबा,इंडोनेशिया, कझाकस्तान, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, तुर्की, उझबेकिस्तान, युगांडा, व्हिएतनाम या एकूण १३ देशांचा समावेश बब्रिक्स मध्ये नुकताच झाला आहे.
आमचे इतर ब्लॉग:
