US Election 2024- अमेरिकेतील 2024 ची निवडणूक, जी संपूर्ण जगाच्या लक्षात राहिल कारण त्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयानंतर जागतिक स्तरावर प्रतिक्रिया उमटत आहेत आणि अनेक देशांच्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना सोशल मिडिया व मायक्रो ब्लॉगिंग साईट “x” वर आपल्या हार्दिक शुभेच्छा देताना म्हंटले आहे कि, “हार्दिक अभिनंदन, माझ्या मित्रा डोनाल्ड ट्रम्प, तुझ्या ऐतिहासिक विजयाबद्दल,” “तू तुझ्या मागील कार्यकाळातील यशस्वी कार्यावर पुढे काम करत असताना, आपली भारत-अमेरिका सर्वसमावेशक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यासाठी मी सहकार्य करण्यास उत्सुक आहे. चला, आपण आपल्या लोकांचे कल्याण आणि जागतिक शांतता, स्थिरता, आणि समृद्धीला प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र काम करूया.”
भारत अमेरिका मैत्री – US Election 2024
गेल्या काही वर्षांत भारत-अमेरिका संबंधात लक्षणीय वृद्धी झाली आहे, ज्यात दोन्ही देशांनी आर्थिक, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एकमेकांच्या सहकार्याला प्राधान्य दिले आहे. ट्रम्प पुन्हा सत्तेत येत असताना, अनेक तज्ज्ञांना वाटते की भारत-अमेरिका धोरणांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल, विशेषत: जागतिक घडामोडींच्या बाबतीत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेत अमेरिकन उद्योगांचा विकास, इमिग्रेशन नियंत्रण, आणि जागतिक स्तरावर अमेरिकन नेतृत्वाची महत्त्वाची भूमिका यावर भर देण्यात आला होता. त्यांच्या यंदाच्या निवडणुकीतील विजयाने “अमेरिका फर्स्ट” धोरणाच्या पुढील टप्प्याची अपेक्षा वाढली आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंध आणि अमेरिका-भारत मैत्री नव्या उंचीवर जाईल.
US Election 2024 च्या निकालानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे पुन्हा अध्यक्षपदावर येणे म्हणजे अमेरिकन राजकारणात दुर्मिळ घटना आहे, आणि हा अनेक राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. ट्रम्प यांचे समर्थक विजयाचा आनंद साजरा करत असताना, पुढील धोरणात्मक पाऊल कसे असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता डोनाल्ड ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज होत असताना, भारत-अमेरिका मैत्रीसह जागतिक स्थिरता आणि शांततेसाठी हे आगामी वर्ष महत्त्वाचे ठरेल.
सोशल साईट “X” वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या इतर ब्लॉगपोस्ट: