Jharkhand Assembly Election 2024- मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ति मोर्चा (JMM) ने 81 सदस्यीय झारखंड विधानसभा निवडणुकीत 56 जागांवर विजय मिळवला. ‘इंडिया’ आघाडीला मिळालेल्या या ठोस विजयानंतर, भाजप-आघाडी (NDA) केवळ 24 जागांवरच पोहोचली. निवडणूक आयोगाने 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू केली आणि संध्याकाळपर्यंत निकाल स्पष्ट झाले.
झारखंड मुक्ति मोर्चा (JMM) | 34 |
कॉंग्रेस | १६ |
आर. जे. डी. | ४ |
सी.पी. आय. | २ |
भारतीय जनता पार्टी | २१ |
Jharkhand Assembly Election 2024
निवडणुकीतील सर्वाधिक जागांवर विजय मिळवणारे JMM आणि त्याच्या आघाडीतील सदस्यांमध्ये काँग्रेस 16, राष्ट्रीय जनता दल (RJD) 4 आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) 2 जागांवर विजयी ठरले. दुसरीकडे, भाजप 21 जागांवरच विजय मिळवू शकली.
निवडणुकीसाठी झारखंडमध्ये दोन टप्प्यांत मतदान झाले – 13 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर. राज्यात 67.74% मतदान नोंदवले गेले, जे राज्याच्या स्थापनेपासून सर्वात जास्त मतदान आहे. एक्झिट पोल्समध्ये अनेकजण NDA च्या विजयाची भविष्यवाणी करत होते, परंतु अंतिम निकालात ‘इंडिया’ आघाडीच्या विजयाची खात्री झाली.
इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया चे अधिकृत संकेतस्थळ
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट:
महाराष्ट्राचा महायुतीला भरभरून आशीर्वाद !- Election Results 2024 Live