Chhava – ‘छावा’ हा बहुप्रतिक्षित ऐतिहासिक हिंदी चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. अभिनेता विक्की कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि दिनेश विजन निर्मित, हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या मराठी कादंबरी ‘छावा’ वर आधारित आहे. या चित्रपटात इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तिरेखांचे जीवन आणि संघर्ष प्रभावीपणे उलगडण्यात आला आहे.
प्रमुख कलाकार आणि व्यक्तिरेखा- Chhava Vicky Kaushal
Cast of Chhava चित्रपटातील प्रमुख कलाकार आणि व्यक्तिरेखा
- विक्की कौशल: छत्रपती संभाजी महाराज
- रश्मिका मंदाना: येसूबाई भोसले
- अक्षय खन्ना: औरंगजेब
- सुनील शेट्टी
- आशुतोष राणा: सरसेनापती हंबीरराव मोहिते
- दिव्या दत्ता: सॉयराबाई
- नील भूपालम: मुघल राजकुमार
- प्रदीप रावत: यसाजी कंक
- संतोष जुवेकर
Chhava Movie – चित्रपटाची निर्मिती आणि तयारी
चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनला एप्रिल २०२३ मध्ये सुरुवात झाली. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि त्यांच्या टीमने १७व्या शतकातील मराठा इतिहासावर सखोल संशोधन केले. चित्रपटाचे चित्रीकरण ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू झाले आणि मे २०२४ मध्ये पूर्ण झाले.
कपड्यांचा आणि दागिन्यांचा साज: रश्मिका मंदानाच्या येसूबाई या व्यक्तिरेखेकरिता खास पैठणी साड्या तयार करण्यात आल्या, तर भव्य ‘भवानी’ तलवारीसाठी लंडनमधील संग्रहालयांमधून संदर्भ घेतले गेले.
Chhava Movie Trailor – छावा चित्रपटाचा ट्रेलर
नुकताच मेडोक या निर्माता कंपनीने त्यांच्या छावा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे, विकी कौशल च्या अभिनयातील हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सर्वत्र रिलीज होणार आहे.
संगीत आणि गीत
चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनी दिले आहे, तर गाण्यांचे बोल अमिताभ भट्टाचार्य आणि स्वानंद किरकिरे यांनी लिहिले आहेत. रहमान यांच्या संगीताने चित्रपटाला भव्यता आणि भावनिक जडणघडण मिळाली आहे.
Chhava Trailer – ट्रेलर आणि प्रसिद्धी
‘छावा’ चित्रपटाचा टीझर १९ ऑगस्ट २०२४ रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. त्यापूर्वी ‘स्त्री २’ च्या प्रिव्ह्यू शोदरम्यान टीझर दाखवण्यात आला होता. टीझरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली असून, चित्रपटाबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे.
प्रदर्शन तारीख – Chhava Release Date
‘छावा’ हा चित्रपट सुरुवातीला ६ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, आता तो १४ फेब्रुवारी २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल होईल. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील हा चित्रपट त्यांच्या संघर्षाची गाथा प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे.
‘छावा – सिंहाचा गर्जनारा आवाज!’
आमचे अन्य ब्लॉग पोस्ट :
