चला हवा येवू द्या फेम भाऊ कदम आणि निलेश साबळे यांचा नवीन कार्यक्रम “हसताय ना ? हसायलाच पाहिजे !” आता २७ एप्रिल २०२४ पासून Colors Marathi वर सायंकाळी ९ वाजता प्रेक्षकांना हसविण्यासाठी टीव्ही वर येत आहे. सध्या या कार्यक्रमाची बरीच चर्चा सुरु आहे. डॉ. निलेश साबळे यांचे दिग्दर्शन, लिखाण, कलाकारी व सूत्र संचालन असलेला “हसताय ना ? हसायलाच पाहिजे ! हा कार्यक्रम पारिवारिक, मनमोकळेपणाने हसविणारा, मराठमोळा कार्यक्रम असणार आहे. निलेश साबळे आणि भाऊ कदम यांच्या जोडीलाच हास्य जत्रा फेम – ओंकार भोजने देखील वैविध्यपूर्ण भूमिका या कार्यक्रमात साकारणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमा विषयीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
ज्या दिवशी तुम्ही हसत नाही तो संपूर्ण दिवस तुमचा वाया गेलेला असतो.
चार्ली चाप्लीन
“हसताय ना ? हसलाच पाहिजेत” काय आहे ?
डॉ. निलेश साबळे चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून व झी मधून बाहेर पडले परंतु प्रेक्षकांना चला हवा येऊ द्या ची भुरळ पडलेली आहे. प्रेक्षक त्यासंदर्भात विचारणा करू लागले. चला हवा येवू द्या पुन्हा कधी सुरु होईल ? म्हणून वाट पाहू लागले. तेव्हाच कलर्स मराठी वाहिनी कडून डॉ. साबळे यांना नवीन कार्याक्रमासाठी विचारणा झाली व मग हसताय ना? हसायलाच पाहिजे” या कार्यक्रमाची रचना झाली यामध्ये केदार शिंदेंची मदत देखील मिळाली. असे डॉ साबळे सांगतात. चला हवा येऊ द्या प्रमाणेच हा एक विनोदी कार्यक्रम असेल, जो वेग वेगळ्या सेगमेंट मध्ये रचला गेला आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन याचा मुख्य उद्देश असून भाऊ कदम, ओंकार भोजने, सुपर्णा शाम, स्नेहल शिदम, रोहित चव्हाण हे सर्व कलाकार या कार्यक्रमातून प्रेक्षकांना हसविणार आहेत. हा एक पारिवारिक कार्यक्रम असेल ज्यात भन्नाट कॉमेडी, स्वच्छ कॉमेडी, पारिवारिक कॉमेडी, जी आपण एक परिवार म्हणून जसेकी आई वडील, बहिण भाऊ सार्वजन एकत्र बसुन पाहू शकू असा एक हसवून मनोरंजन करणारा शो असणार आहे. एवढेच नाही तर या कार्यक्रमाच्या एका सेगमेंट मध्ये प्रत्येक एपिसोड मध्ये सर्व सामान्य प्रेक्षकांकडून त्यांच्या स्वत: तयार केलेल्या कॉमेडी व्हिडीओ, रील्स मागविल्या जाणार आहेत त्यातून निवडक तीन कलाकार परिवारांना मंचावर येण्याची संधी दिल्या जाणार आहे. अशाप्रकारे
उद्योग, स्कीट बेस कार्यक्रम , प्रत्येक एपिसोड नवीन विषय घेऊन लोकांना हसवायचा बहारदार प्रयत्न तर करेलच पण सामाजिक मुद्द्यांवर कॉमेडी करून देखील जनजागृती देखील हा कार्यक्रम करणार आहे.
चला हवा येवू द्या मधून डॉ. निलेश साबळे बाहेर का पडले ?
झी मराठी वरील चला हवा येवू द्या गेल्या दहा वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचा पहिला भाग १८ ऑगस्ट २०१४ रोजी प्रदर्शित झाला होता. डॉ. निलेश साबळे यांच्या लेखणीतून निघणारे वेगवेगळे स्कीट लोकांना जाम आवडायचे.मराठी माणसाच्या मनात घर करणारा, भारतात व संपूर्ण जगभर आपला चाहता वर्ग तयार करणाऱ्या या कार्यक्रमाबद्दल कित्येक आजारी लोकांनी देखील आपला स्वत:चा इलाज झाल्याचे , तर काहींनी इलाजात मदत झाल्याचे कित्येकदा सामाजिक माध्यमावर कबुल देखील केले आहे. या स्तरावरील हा कार्यक्रम अचानक बंद का करण्यात आला ? असा प्रश्न कित्येकांना पडला आहे. त्यावर एका मुलाखतीत उत्तर देताना डॉ साबळे यांनी सांगितल्याप्रमाणे झी मराठीला ८ ते ९ महिन्यांचा खंड करून चला हवा द्या कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न होता व त्यानुसार १२ मार्च २०२४ या दिवशी होणाऱ्या शुटींग वेळी कार्यक्रमाच्या अंतिम एपिसोड बद्दलची माहिती कार्यक्रमातील काही कलाकारांना देण्यात आली. परंतु डॉ. साबळे झी सोबत या विषयी सहमत नव्हते त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमातून माघार घेतली. अशारितीने चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचा शेवटचा भाग १७ मार्च २०२४ रोजी प्रसारित करण्यात आला.
भरत जाधव, अलका कुबल आठल्ये- दरभागाला सेलिब्रिटी पाहुणे म्हणून लाभणार आहेत.
कलर्स मराठी टीव्ही वर २७ एप्रिल २०२४ पासून सायंकाळी ९ वाजता “हसताय ना, हसायलाच पाहिजे” – १ तासाचा कार्यक्रम, दर शनिवारी रविवारी रात्री ९ वाजता येणार असून या कार्यक्रमाला सेलेब्रिटी पाहुणे कलाकार म्हणून प्रसिद्ध मराठी कलाकार भरत जाधव आणि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अलका कुबल (आठल्ये) लाभणार आहेत. त्यामुळे कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढणार आहे.
हसणे हे शक्तिवर्धक, आरामदायक, वेदनापासून मुक्ती देणारे आहे
चार्ली चाप्लीन
सुपर्णा शाम, स्नेहल शिदम, रोहित चव्हाण देखील या कार्यक्रमात दिसणार
सोनी टीव्ही वरील हास्य जत्रा फेम ओंकार भोजने सह सुपर्ण शाम, स्नेहल शिदम, रोहित चव्हाण हे सर्व कलाकार “हसताय ना ? हसलाच पाहिजेत” या कार्यक्रमात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणार आहेत आणि प्रेक्षकांना हसविण्याचे अत्यंत अवघड काम करणार आहेत.
हसणे हे एक प्रकारचे औषध
ताण तणावावर उपाय म्हणजे “हसणे” होय. “तणाव”, कामाचा ताण, सततचे बीजी आयुष्य या सर्व बाबी ब्लड प्रेशर व इतर कित्येक प्रकारच्या आजारांना आमंत्रण देणारा ठरतो. अशावेळी मनमोकळेपणाने हसणे, आपल्या स्वकीयांजवळ रमणे, परिवारातील व नात्यातील अंतर्विरोध थोड्या वेळासाठी दूर करून. दिलखुलासपणे हसणे मनुष्याच्या मनाला आल्हाददायक आनंद देऊन जाते. जगातील उत्कृष्ट व जगप्रसिद्ध कलाकार व कॉमेडीयन चार्ली चाप्लीन तर म्हणतात, “ज्या दिवशी तुम्ही हसत नाही तो संपूर्ण दिवस तुमचा वाया गेलेला असतो.” एवढेच काय तर कित्येक वैज्ञानिक अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे कि हसण्याने मानसाचे भावनिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्यच नाही तर आपले नातेसंबंध देखील मजबूत होतात. परंतु जगातील वाढलेल्या समस्या, अपेक्षा, अतिमहत्वकांक्षा, सततचे काम इत्यादी मध्ये अडकेलेला मानवीय समाज आज हसणे विसरून गेला आहे, म्हणून आज आमच्यासाठी हसणे सहज आणि सोपे राहिलेले नाही. परंतु अशा परिस्थितीत देखील आपल्या अंगच्या अद्वितीय कलागुणांनी हास्य कलाकार प्रेक्षकांना हसविण्याचा जीवतोड प्रयत्न करत असतात. त्यातही डॉ. निलेश साबळे सारखे कलावंत जे स्वत: कॉमेडी स्कीट लिहितात, निर्देशन करतात, सूत्र संचालन इत्यादी कामे विविध कार्यक्रमातून गेली कित्येक वर्षे करत आहेत व समाजाला आनंद देण्याचा व त्यांच्या जीवनात “हास्य” आणण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहेत. त्यांचाच अजून एक नवीन कार्यक्रम “हसताय ना ? हसलाच पाहिजेत” हा येणाऱ्या २७ एप्रिल २०२४ या तारखेपासून Colors Marathi या वाहिनीवर दर शुक्रवार आणि शनिवारी येणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=Vp6bjnzw-8s
आमच्या इतर ब्लॉगपोस्ट:-
