Swatantra Veer Savarkar Movie- हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम कलावंत रणदीप हुडा यांनी आपले घर विकून स्वातंत्रवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट Swatantra Veer Savarkar Movie बनविला असून हा चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी रिलीज करण्यात आला होता. चित्रपटाचे नाव स्वातंत्र्यवीर सावरकर असे असून चित्रपटाने पहिल्या दिवशी १.०४ करोड रुपये, दुसऱ्या दिवशी २.२५ करोड रुपये, तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी २.७ करोड रुपये कमावले, चौथ्या दिवशी २.१५ करोड, पाचव्या दिवशी १.०५ करोड आणि सहाव्या दिवशी १ करोड रुपये, अशा रीतीने चित्रपटाने सहा दिवसात १०.२ करोड रुपये कमावले त्यानंतरच्या अठरा दिवसात २०.१७ कोटीची कमाई करून साकीनिक च्या आकडेवारी नुसार २४ दिवसात भारत आणि विदेशातील या चित्रपटाचा एकूण गल्ला केवळ ३०.३७ करोड रुपये एवढाच झाला आहे.
Veer Savarkar Randeep Hooda – Swatantra Veer Savarkar Movie आणि रणदीप हुडा
भारतात गेल्या कित्येक वर्षात स्वातंत्र्य वीर सावरकरांवर विवाद सुरु आहेत. हि एक शोकांतीकाच म्हणावी लागेल कि स्वातंत्र्ययुद्धात स्वत:च्या जीवनाची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची हेटाळणी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील सुरूच आहे. कित्येक राजकारणी पार्ट्या आपला अजेंडा म्हणून कित्येक वर्षे हे कार्य करत असल्याचे स्पष्ट जाणवते. म्हणूनच गेल्या काही दिवसात सावरकरांना माफिवीर देखील म्हंटल गेलं. याच मुद्द्यावर अभिनेता रणदीप हुडा स्पष्टपणे म्हणतात कि “सावरकर हे माफिवीर नाहीत !” त्यांच्या मनातील सावरकरांबद्दलच्या विचारांच्या चलबिचलतेतून हुडा यांना सावरकर अभ्यासावेसे वाटले मग त्यांनी स्वत: सावरकरांचे अध्ययन केले आणि जे सावरकर रणदीप हुडा यांना दिसले ते मात्र त्यांनी अनुभवलेल्या त्यांच्या सार्वजनिक जीवनात लोकांना माहितच नाहीत हि उणीव त्यांना जाणवली कदाचित त्यातूनच हुडा यांच्या अंतरात्म्यापासून सावरकर जगाला कळावे हि भावना त्यांच्या मनात पक्की झाली. रणदीप स्वत: एक कलाकार असल्याने चित्रपट हे एक उत्तम मध्यम आहे व त्यातून आपण सर्व सामान्य लोकांना सावरकर काय होते हे सांगण्याचा प्रयत्न करू शकतो हे ओळखून श्री रणदीप हुडा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचे काम हाती घेतलं. (Swatantra Veer Savarkar Movie) चित्रपटाचे निर्देशन, निर्मिती त्यांनीच केली आहे. या चित्रपट लेखनाचा बराच भाग हुडा यांनी स्वत: पूर्ण केला एवढेच नाही तर चित्रपटात सावरकरांची मुंख्य भूमिका रणदीप हुडा यांनीच निभावली आहे. चित्रपटाच्या निर्मितीत पैशांची कमी पडू नये म्हणून त्यांनी स्वत:चे घर सुद्धा विकून टाकले. एवढेच काय तर आपला लुक सावरकरांसारखा दिसावा म्हणून रणदीप यांनी आपले वजन २० ते २५ किलो कमी केले त्यांचे या बाबतचे फोटो सामाजिक माध्यमांवर खूप प्रसिद्ध देखील झाले आहेत.
Swatantra Veer Savarkar
मवाळ आणि जहाल या दोन पद्धती स्वातंत्र्ययुद्धात सहभागी होत्या मवाळ पद्धीतीने लढा देणारे प्रमुख नेते होते महात्मा गांधी तर जहाल मतवाद्यांचा एक वेगळा गट स्वातंत्र्यप्राप्तीसाठी कार्यरत होता. टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद इत्यादी अनेक लोक जहाल मतवादी पद्धतीचे नेतृत्व करत होते. विदेशी आक्रांत्यानी भारत देश प्रेमाने मागून घेतला नव्हता तर हजारो लोकांचे मूडदे पाडून कित्येक सत्ता पादाक्रांत करत भारतावर सत्ता स्थापित केली होती. “जगात कोणालाही स्वातंत्र्य हे भिक मागून मिळत नसते तर ते लढून मिळवावे लागत असते”. याच विचारांनी प्रेरीत झालेला क्रांतिकारकांचा एक गट असा तयार झाला जो आपल्या देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्यास व स्वत:च्या प्राणांची आहुती देण्यास तयार होता या गटातील कित्येक क्रांतिकारकांनी आपल्या परीवारंचा त्याग केला स्वत:ला देश सेवेसाठी वाहून घेतले त्यांना असे करण्याची गरज काय होती ? कित्येकांनी ऐन उमेदीत व तारुण्यात हसत हसत मृत्यूशी लग्नगाठ बांधली. तर काही जन इंग्रजांशी लढत लढत शहीद झाले. तर कोणी “तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा” असे म्हणत नवीन नवीन लढवय्ये तयार करत होते. असेच एक महान क्रांतिकारक होते विनायक दामोदर सावरकर ज्यांना आदराने स्वातंत्र्यवीर सावरकर असे देखील म्हणतात ज्यांच्याबद्दल भारतात बरेच वाद उभे केले गेले परंतु त्यांच्या कार्यांना नाकारणे शक्य झालेले नाही त्यांच्या प्रखर जीवनावर व लढाऊ वृत्तीवर प्रकाश टाकणारा चित्रपट म्हणजे रणदीप हुडा यांचा Swatantra Veer Savarkar Movie होय.
Veer Savarkar Movie – स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट
चित्रपट | स्वातंत्र्यवीर सावरकर |
निर्देशक | रणदीप हुडा |
लेखक | रणदीप हुडा, उत्कर्ष नैथानी |
अभिनय | रणदीप हुडा, अंकिता लोखंडे, अपिंदरदीप सिंग, अमित सियाल, मार्क बेनिंगटन, |
म्युझिक | हितेश मोदक, श्रेयस पुराणिक |
चित्रपट लांबी | १७८ मिनिटे |
बजेट | २० करोड |
रिलीज तारीख | २२ मार्च २०२४ |
Swatantra Veer Savarkar Movie
स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचे Podcast पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या इतर ब्लॉगपोस्ट:-