Deva : हा एक नवा थरारक, अॅक्शन थ्रिलर सिनेमा आहे. हिंदी सिनेमातील आघाडीचा अभिनेता शाहिद कपूर आता नव्या रूपात “देवा”, या त्याचा आगामी थरारक अॅक्शन सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. , ३१ जानेवारी २०२५ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रोशन अँड्रूज यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा हा चित्रपट, बॉबी-संजय यांच्या कथेवर आधारित असून, झी स्टुडिओज आणि रॉय कपूर फिल्म्सने याची निर्मिती केली आहे.
Deva- नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रसिद्ध झाला आहे
कथानक आणि कलाकार
“देवा” या चित्रपटात शाहिद कपूर एका पोलिस अधिकाऱ्याच्या दमदार भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री पूजा हेगडे आणि पवैल गुलाटी याही मुख्य भूमिका साकारत आहेत. कुब्रा सैत आणि प्रवेश राणा यांचीही महत्त्वपूर्ण पात्रे आहेत. या चित्रपटासाठी शाहिदने आपल्या भूमिकेसाठी विशेष प्रशिक्षण घेतले आहे.
Caste of Deva
| अभिनेता | शहीद कपूर |
| अभिनेत्री | पूजा हेगडे |
| पावेल गुलाटी |
चित्रपट निर्मिती आणि चित्रीकरण
चित्रपटाची अधिकृत घोषणा मे २०२३ मध्ये झाली होती, तर चित्रीकरण ऑक्टोबर २०२३ मध्ये मुंबईत सुरू झाले. हा सिनेमा बहुतांश वास्तव लोकेशन्सवर चित्रित करण्यात आला आहे. चित्रीकरण सप्टेंबर २०२४ मध्ये पूर्ण झाले असून, अॅक्शन दृश्यांसाठी सुप्रीम सुंदर आणि परवेज शेख यांनी स्टंट डिझाइन केले आहेत.
| निर्देशक | रोरोशन अँड्रूज |
| कथा – लेखक | बॉबी – संजय |
| डायलॉग | सुमित अरोरा, हुसेन दलाल, अर्शद सय्यद |
| निर्माता | सिद्धार्थ रॉय कपूर, उमेश के. आर. बन्सल |
| सिनेमाऑटोग्राफी | अमित रॉय |
| एडिटर | ए. सिकर प्रसाद |
| निर्माता कंपनी | रॉय कपूर फिल्म्स झी स्टुडीओ |
| वितरण | झी स्टुडीओ |
संगीत
चित्रपटाचे गाणे आणि पार्श्वसंगीत हे अनुक्रमे विशाल मिश्रा आणि जेक्स बेजॉय यांनी दिले आहे. “मरजीचा मालक” हे गाणे प्रेक्षकांमध्ये आधीच लोकप्रिय ठरत आहे.
| संगीत | विशाल मिश्रा, जेक्स बेजॉय |
बजेट आणि प्रकाशन
₹८५ कोटींच्या बजेटवर बनवलेला “देवा” सिनेमा एक भव्य प्रकल्प आहे. शाहिद कपूरने आपला मानधन कमी करून, ₹२५ कोटी रुपये घेतले आहेत.
Deva Release Date- चित्रपट रिलीज दिनांक
हा सिनेमा झी स्टुडिओद्वारे ३१ जानेवारी २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
शाहिद कपूरचा उत्साह
शाहिद कपूरने सांगितले की, “हा सिनेमा खूपच वेगळा अनुभव होता. देवा हे पात्र खूपच कठीण आणि सखोल आहे. प्रेक्षकांना त्यात नक्कीच काहीतरी नवीन पाहायला मिळेल.”
“देवा” हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावणारा ठरणार आहे. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!
देवा चित्रपटाची ओफिशियल टीझरसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट
‘Sky Force’ भारतीय वायुदलाच्या शौर्यगाथेवर आधारित थरारक कथा !
