दिव्यांग मोफत ई रिक्षा योजना- Divyang Free E Rikshaw Scheme

Vishal Patole
Divyang Free E Rikshaw Scheme

Divyang Free E Rikshaw Scheme- दिव्यांग व्यक्तींना व्यावसायिकतेतून स्वावलंबनाकडे वळवण्याच्या उद्देशानेमहाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि. १० जून २०१९ च्या शासन निर्णय :- अपंग 2018/प्र.क्र.126/अ.क.2 नुसार दिव्यांग लोकांना मोफत ई रिक्षा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या रिक्षांचा वापर करून दिव्यांगांना विविध व्यवसाय करता येवू शकतील.

योजनेचे स्वरूप – Divyang E Rikshaw Scheme

योजनेचे स्वरूप
दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ऊर्जा चालित वाहनांवर आधारित ‘मोबाईल शॉप ऑन व्हेईकल’ योजनेसाठी प्रति लाभार्थी 3.75 लाख रुपये अनुदान दिले जाईल.
या योजनेअंतर्गत निवडलेल्या संस्थांकडून वाहनांची देखभाल व दुरुस्ती केली जाईल.
तसेच, लाभार्थ्यांना व्यवसायिक प्रशिक्षण देण्यात येईल आणि वाहने आरटीओकडून नोंदणीकृत केली जातील.
स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून परवानग्या घेतल्या जातील.
या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र अपंग वित्त आणि विकास महामंडळामार्फत केली जाईल.

Divyang Free E Rikshaw Scheme

ई रिक्षा आणि व्यवसाय

ई रिक्षा मिळाल्यावर त्याचा वापर करून दिव्यांग जनांना विविध व्यवसाय उभारता येऊ शकतात जसे कि,

  • पाणीपुरी, इडली, डोसा, वडापाव, सांभार, इत्यादी.
  • फळांचे रस, आईस्क्रीम, बर्फाचे गोळे, बेकरी वस्तू – ब्रेड, पाव, डबल रोटी, तोस्त वगैरे विक्री इत्यादी.
  • किराणा भुसार, स्टेशनरी, पूजा साहित्य, साफसफाईचे साधने विक्री, गृह उपयोगी वस्तू विक्री करणे, रद्दी, भंगार विक्री
  • वन उत्पादने विक्री, हाथ थैल्या, कपडे विक्रीम फळांचे दुकान, भाजीपाला दुकान इत्यादी
  • दूध व डेरी उत्पादन:
  • दूध, स्टेशनेरी, पुरेसे पदार्थ,
  • बुट आणि बॅग उत्पादने, बॅग व पर्स यांचे विक्री.
  • मोबाइल दुरुस्ती, झेरॉक्सचे दुकान , कॅटरिंग सेवा, चालते फिरते हेअर सलून, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्री, घड्याळ दुरुस्ती चे दुकान
  • वाहतूक केंद्र, पर्यटनाकरिता वाहन पुरविणे इत्यादी

योजनेची वैशिष्ट्ये

  1. या योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना मोबाईल शॉप ऑन व्हेईकल (E-Cart वाहन) खरेदीसाठी प्रति लाभार्थी 3.75 लाख रुपये अनुदान दिले जाते
  2. हे वाहन परिवहन विभागाच्या परवानगीने आणि ठरवलेल्या तांत्रिक वैशिष्ट्यांनुसार (Specifications) उपलब्ध करून दिले जाते.
  3. मोबाईल व्हॅनच्या एक वर्षाच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी निवडलेल्या पुरवठादार संस्थेकडे असतो.
  4. या 3.75 लाख रुपयांमध्ये E-Cart वाहन खरेदी, RTO नोंदणी, विमा, तसेच लाभार्थ्याच्या दिव्यांगत्वानुसार आवश्यक पुनर्बांधणी आणि वाहन संरचनेचा खर्च समाविष्ट असतो.
  5. जर लाभार्थ्याला अधिक निधीची गरज भासली, तर तो स्वतःच्या स्तरावर किंवा महाराष्ट्र अपंग वित्त आणि विकास महामंडळ/बँक मार्फत कर्जाच्या स्वरूपात उभारू शकतो.

योजनेच्या अटी, शर्ती आणि पात्रता

  • लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • लाभार्थ्याकडे किमान 40% दिव्यांगत्व असलेले प्रमाणपत्र असावे
  • जे शासकीय रुग्णालयातील शल्य चिकित्सक / तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रमाणित केलेले असेल.
  • अर्जदाराकडे UDID कार्ड/ दिव्यांग प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
  • लाभार्थ्याचे वय दि. ०१ जानेवारी २०२५ रोजी 18 ते 55 वर्षांच्या दरम्यान असावे.
  • मदतीची आवश्यकता असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी त्यांच्या कायदेशीर पालकांना अर्ज करता येईल.
  • लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • निवडीच्या प्रक्रियेत जास्त अपंगत्व असलेल्या अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल.
  • तीव्र अपंगत्व असलेल्या व्यक्तींना वाहन चालविणे शक्य नसल्यास, त्यांच्या सोबत असलेल्या सहाय्यकासोबत (Escort) व्यवसाय सुरू करण्यास प्राधान्य दिले जाईल.
  • अर्ज करताना सर्व अटी मान्य असल्याचे आणि संबंधित वाहनाची देखभाल करण्याचे लेखी बंधपत्र द्यावे लागेल.

२०२५ च्या अर्जाची शेवटची दिनांक

यंदाच्या वर्षीच्या ऑनलाईन अर्जाची शेवटची दिनांक १०-०२ २०२५ दुपारी १२ वाजेपर्यंत असणार आहे.

मोबाईल व्हॅन खरेदी प्रक्रिया


शासनाच्या प्रचलित खरेदी धोरणानुसार आणि निर्धारित प्रक्रियेप्रमाणे सदर ई रिक्षा खरेदी करण्यात येईल.
या प्रक्रियेसाठी व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र अपंग वित्त व विकास महामंडळ यांच्या मार्फत वाहन खरेदी केले जाते.

अंमलबजावणी अधिकाऱी आणि संस्था


संबंधित जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र अपंग वित्त आणि विकास महामंडळ, तसेच महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी नियुक्त केलेल्या स्वयंसेवी संस्था या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असणार आहेत.

शासन निर्णय


संपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध आहे.त्याचा संदर्भ क्रमांक 201906101438275422 असा आहे

मदत


Helpline: 7820904081 / 9090118218

Email: evehicle.mshfdc@gmail.com

योजनेच्या अटी व शर्ती

1) अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
2) अर्जदाराकडे किमान ४०% अपंगत्व असावे आणि जिल्हा शल्यचिकित्सक/सक्षम अधिकारी यांनी प्रमाणित केलेले अपंगत्व प्रमाणपत्र असावे.
3) अर्जदाराकडे UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
4) ०१.०१.२०२५ या तारखेस अर्जदाराचा वययोगट १८ ते ५५ वर्षांचा असावा.
5) बौद्धिक अपंगत्व असलेल्या अर्जदारांच्या बाबतीत त्यांच्या कायदेशीर पालकांना अर्ज करण्याची परवानगी असेल.
6) अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.
7) लाभार्थ्यांची निवड करताना जास्त अपंगत्व असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल, त्यामुळे निवडीचे प्रमाण उच्च ते कमी अपंगत्व यानुसार असेल. (शासन निर्णय वाचा)
8) ज्या व्यक्तींना गंभीर अपंगत्व आहे आणि वाहन परवाना नाकारला गेला आहे, अशा परिस्थितीत त्यांना सहाय्यक (Escort) सह फिरते मोबाइल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल.
योजनेच्या अटी व शर्ती (सातत्य)

9) अर्ज करताना अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती देखभाल करण्याचे बंधपत्र/प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील.

10) जिल्हानिहाय लाभार्थ्यांची यादी प्रत्येक जिल्ह्यातील अपंग व्यक्तींच्या प्रमाणात पोर्टलवर प्रकाशित केली जाईल.

11) अर्जदार हा शासन, निमशासकीय संस्था, मंडळे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था/महामंडळाचा कर्मचारी नसावा.

12) अर्जदाराने महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळाकडून पूर्वी कर्ज घेतले असल्यास तो थकबाकीदार नसावा.

13) राज्यातील इतर कोणत्याही योजनेअंतर्गत मोफत ई-वाहन लाभ घेतलेल्या अपंग व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरतील.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

1) अर्जदाराचा फोटो: फक्त jpeg, jpg, png स्वरूपात (फाईलचा आकार 15 KB ते 100 KB आणि रुंदी/उंची 800px पेक्षा कमी असावी).
2) अर्जदाराची सही: फक्त jpeg, jpg, png स्वरूपात (फाईलचा आकार 3 KB ते 30 KB, रुंदी: 190px, उंची: 50px).
3) जातीचा दाखला: (फाईलचा आकार 10 KB ते 500 KB, स्वरूप jpeg, jpg, png).
4) अधिवास प्रमाणपत्र: (फाईलचा आकार 10 KB ते 500 KB, स्वरूप jpeg, jpg, png).
5) निवासी पुरावा: (फाईलचा आकार 10 KB ते 500 KB, स्वरूप jpeg, jpg, png).
6) अपंगत्व प्रमाणपत्र: (फाईलचा आकार 10 KB ते 500 KB, स्वरूप jpeg, jpg, png).
7) UDID प्रमाणपत्र: (फाईलचा आकार 10 KB ते 500 KB, स्वरूप jpeg, jpg, png).
8) ओळखपत्र: (फाईलचा आकार 10 KB ते 500 KB, स्वरूप jpeg, jpg, png).
9) बँक पासबुकचे पहिले पान: (फाईलचा आकार 10 KB ते 500 KB, स्वरूप jpeg, jpg, png).

महत्वाच्या लिंक

नोंदणी व भरलेल्या अर्जाची सद्यस्थिती – https://register.mshfdc.co.in/trackApplication

नवीन नोंदणीसाठी- https://register.mshfdc.co.in/apply

भरलेल्या अर्जाची सद्यस्थिती- https://register.mshfdc.co.in/trackApplication

निवड यादी पाहण्यासाठी – https://register.mshfdc.co.in/viewBeneficiary

आमचे अन्य ब्लॉग :

Vishwakarma Yojna- पी.एम. विश्वकर्मा योजना

Stand Up India Scheme- तरुणांना उद्योगशीलतेकडे वळवणारी योजना.

PM Kisan Sanman Nidhi Yojana पीएम किसान सम्मान निधि योजना

HDFC बँकेत रिलेशनशिप मॅनेजर (Assistant Manager/ Deputy Manager/ Manager/Senior Manager) पदांची भरती – HDFC Bank Recruitment 2025

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत