Sheli Mendhi Gat Vatap Yojana- १ बोकड/ मेंढा आणि १० शेळ्या वाटप योजना राज्यस्तरीय

Sheli Mendhi Gat Vatap Yojana

Vishal Patole
Sheli Mendhi Gat Vatap YojanaSheli Mendhi Gat Vatap Yojana

पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत १ बोकड/मेंढा आणि १० शेळ्यांचा गट वाटप- Sheli Mendhi Gat Vatap Yojana सरकारी योजना सुरु करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला खास करून अल्प भूधारक, भूमी हीन, महिला बचत गट, सुशिक्षित बेरोजगार, २ हेक्टर च्या आत शेती धारक, १ हेक्टर च्या आत शेती धारक शेतकरी, अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे इत्यादी अर्ज करणाऱ्या अर्जदारांपैकी सफलता पूर्वक निवड झालेल्या शेतकऱ्यांना १ बोकड/मेंढा आणि १० शेळ्यांचा गट वाटप केली जाते जेणेकरून अल्प व अत्यल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्याच्या उत्पन्नात या जोड व्यवसायातून वाढ होऊ शकेल.

Sheli Mendhi Gat Vatap Yojana- १ बोकड/ मेंढा आणि १० शेळ्या वाटप योजनेसाठी पात्रता

शेळी, मेंढी गट वाटप योजना – १ बोकड किंवा मेंढा आणी १० शेळ्या राज्यस्तरीय योजने अंतर्गत राज्य सरकार च्या माध्यमातून सुरु करण्यात आली आहे. या योजनेसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती, अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक शेतकरी, महिला, महिला बचत गटातील महिला, सुशिक्षित बेरोजगार ज्यांची नोंद रोजगार व स्वयं रोजगार केंद्रामध्ये झालेली आहे. दिव्यांग जन असे सर्व महराष्ट्रातील अर्जदार या योजनेसाठी अर्ज करू शकतात. मिळालेल्या अर्जातून RANDOM पद्धतीने निवडलेल्या. अर्जदारांना SMS द्वारे कळविले जाते व पुढील प्रक्रिया जसे कागदपत्रे अपलोड करणे इत्यादी सूचना मिळतात, ज्या अर्जदाराला वेळोवेळी पूर्ण करायचे असतात.

Sheli Mendhi Gat Vatap Yojana –शेळी, मेंढी गट वाटप योजनेसाठी पात्र अर्जदारांची निवड उतरत्या क्रमाने खाली दिलेल्या यादीप्रमाणे लावलेल्या प्राधान्यक्रमाने होत असते.

  1. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
  2. (१ हेक्टर पर्यंतचे भूधारक) अत्यल्प भूधारक (जमीनधारक) शेतकरी
  3. ( १ ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक ) अल्प भूधारक (जमीनधारक) शेतकरी
  4. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयं रोजगार केंद्रात नोंद असलेले)
  5. महिला बचत गटातील लाभार्थी (वरील १ ते ४ पात्रता धारक महिला )

Sheli Mendhi Gat Vatap Yojana- १ बोकड आणि १० शेळ्या वाटप गटाची किंमत

अ.क्र. तपशील दर १० शेळ्या एक बोकड
शेळ्या खरेदी ८००० प्रति शेळी (उस्मानाबादी/ संगमनेरी पैदासाक्षम)
६००० प्रति शेळी (अन्य स्थानिक पैदासक्षम)
८०,००० /- रु. (१० शेळ्या )
६०,०००/- रु. (१० शेळ्या)
बोकड खरेदी १००००/- एक बोकड (उस्मानाबाद / संगमनेरी नर)१०,०००/- रु. (१ बोकड)
शेळ्या व बोकड्याचा विमा (तीन वर्षांसाठी)१२.७५ % (१८ % वस्तू व सेवा कर ) १३,५४५/- रु. (उस्मानाबादी / संगमनेरी)
१०,२३१/- रु. (अन्य स्थानिक जातीसाठी)
शेळ्यांचे व्यवस्थापन (खाद्य व चारा खर्च )लाभार्थीने स्वत: करणे अपेक्षित
एकूण खर्च १,०३,५४५/- (उस्मानाबादी/ संगमनेरी जातीसाठी )
७८,२३१/- (अन्य स्थानिक जातीसाठी)
1 बोकड आणि १० शेळ्या वाटप गटाची किंमत

Sheli Mendhi Gat Vatap Yojana- १ मेंढा आणि १० मेंढ्या वाटप गटाची किंमत

अ.क्र. तपशील दर १० मेंढ्या आणि १ मेंढा नर
मेंढ्या खरेदी १०,०००/- प्रति मेंढी (माडग्याळ)
८०००/- प्रति मेंढी (दख्खणी व अन्य स्थानिक जातीचे पैदा समक्ष )
१,०००,०००/- रु. (१० मेंढ्या)
८०,०००/- रु. (१० मेंढ्या )
नर मेंढा खरेदी १२,०००/- एक नरमेंढा (माडग्याळ)
१०,०००/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीचा नर )
१२,०००/- रु.(१ नर मेंढा)
१०,०००/- रु.(१ नर मेंढा )
मेंढ्या, नर मेंढा यांचा विमा (तीन वर्षांसाठी )१२.७५ % (अधिक १८ % वस्तू व सेवाकर)१६,८५०/- रु. (माडग्याळ जातीसाठी)
१३,५४५/- रु. (दख्खणी व अन्य स्थानिक)
मेंढ्यांचे व्यवस्थापन (खाद्य, चारा)लाभार्थीने स्वत: करणे अपेक्षित
एकूण खर्च १,२८,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )
१,०३,५४५ (दख्खणी व अन्य स्थानिक)
1 मेंढा आणि १० मेंढ्या वाटप गटाची किंमत

Sheli Mendhi Gat Vatap Yojana- शेळ्या व मेंढ्या वाटप योजना अनुदान आणि स्वहीस्सा

अ. क्र.गट प्रवर्ग एकूण किंमत शासनाचे अनुदान लाभार्थ्याचा स्वहीस्स्सा
शेळी गट – उस्मानाबादी / संगमनेरी सर्वसाधारण
१,०३,५४५ /- रु.
५१/७७३/- रु
.
५१,७७२/- रु
अनुसूचित जाती व जमाती १,०३,५४५ /- रु. ७७,६५९/- रु२५,८८६/-रु.
शेळी गट – अन्य स्थानिक जाती सर्वसाधारण ७८,२३१/- रु.३९,११६/- रु. ३९,११५/- रु.
अनुसूचित जाती व जमाती ७८,२३१/- रु.५८,६७३/- रु.१९,५५८/- रु.
मेंढी गट – माडग्याळ सर्वसाधारण १,२८,८५०/- रु.६४,४५०/- रु. ६४,४५०/- रु.
अनुसूचित जाती व जमाती १,२८,८५०/- रु९६,६३८/- रु. ३२,२१२/- रु.
दख्खनी व अन्य स्थानिक जातीसर्वसाधारण१,०३,५४५/- रु.५१,७७३/- रु. ५१,७७२/- रु.
अनुसूचित जाती व जमाती १,०३,५४५/-७७,६५९/-२५,८८६/-
Sheli Mendhi Gat Vatap Yojana- शेळ्या व मेंढ्या वाटप योजना अनुदान आणि स्वहीस्सा

Sheli Mendhi Gat Vatap Yojana- शेळ्या व मेंढ्या वाटप योजना आवश्यक कागदपत्रे

  1. फोटो ओळखपत्राची सत्य प्रत (अनिवार्य)
  2. सातबारा (अनिवार्य )
  3. ८ अ (अनिवार्य)
  4. अपत्य दाखला स्वघोषणापत्र (अनिवार्य)
  5. आधारकार्ड (अनिवार्य)
  6. सात मध्ये लाभार्थ्याचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र, १२ अथवा दुसऱ्याची जमीन भाडेतत्वावर असल्यास करारनामा (असल्यास अनिवार्य)
  7. अनुसूचित जाती, जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (अनिवार्य)
  8. रहिवाशी प्रमाणपत्र (अनिवार्य)
  9. असल्यास दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र (अनिवार्य)
  10. बँक खाते पासबुक सत्यप्रत (अनिवार्य)
  11. कुटुंबातील एकाच व्यक्तिल लाभ मिळत असल्यामुळे कुटुंब प्रमाणपत्र / रेशन कार्ड (अनिवार्य)
  12. असल्यास दिव्यांग असल्याचा दाखला (अनिवार्य)
  13. बचत गट सदय असल्यास – बचत गटाचे प्रमाणपत्र अथवा बचत गटाच्या बँक पासबुकाची सत्यप्रत
  14. जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत शैक्षणिक पात्रतेचा दाखला
  15. सुशिक्षित बेरोजगार असल्यास स्वयं रोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  16. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

अर्ज कसा करावा

गायी म्हशीची वाटप सरकारी योजना राज्यस्थरीय साठी अर्ज दोन पद्धतीने करता येतो ऑनलाईन वेबसाईट www.ah.mahabms.com, या संकेत स्थळाच्या माध्यमातून किंवा स्मार्ट फोन आणि इंटरनेट असेल तर AH-MAHABMS या नावाचे मोबाईल APP प्ले स्टोर वरून घेऊन त्या APP च्या मध्ज्यामातून ओपन होणाऱ्या पर्यायांपैकी “वेळापत्रक” या पर्यायावर जाऊन वेळापत्रक वाचून प्रत्येक वर्षी अर्ज भरणे सुरु झाल्याच्या तारखेनुसार अगोदर जर आपण अर्ज केला नसेल तर “अर्जदार नोंदणी” या पर्यायावर क्लिक करून येणारा फॉर्म भरायचा आहे संपूर्ण माहिती अचूक भरायची आहे. नंतर भरून झालेल्या फॉर्म ची प्रिंट घ्यायची आहे. जर अगोदरच्या वर्षी अर्ज केलेले असेल आणि निवड झालेली नसेल तर मागील माहितीच्या आधारावर याही वर्षी आपण अर्ज करू शकतो त्यासाठी “योजनेसाठी अर्ज करा” या पर्यायावर जाऊन माहिती भरायची आहे. केलेला अर्ज पाहण्यासठी ‘केलेले अर्ज” या पर्यायाचा वापर करता येतो.

अर्जाची प्रक्रिया

अर्जदार नोंदणी – ऑनलाईन अर्ज जमा करणे – प्रणाली द्वारे लाभार्थी यादी तयार होणे – स्क्रुटिनी / प्राथमिक निवड होते -निवड झालेल्या अर्जदारांना SMS (संदेश) द्वारे कळविले जाते.

त्यापुढील सर्व प्रक्रिया SMS द्वारे कळविले जाते व त्यानुसार कार्यवाही करायची असते. संबधित संदेश (SMS) “CP-JAIENP” या नावाने येत असतो तो मराठी भाषेत असतो.

Sheli Mendhi Gat Vatap Yojana- शेळ्या व मेंढ्या वाटप योजना २०२३ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख

Sheli Mendhi Gat Vatap Yojana- शेळ्या व मेंढ्या वाटप योजना अर्जाची प्रक्रिया

शेळ्या व मेंढ्या वाटप योजना ऑनलाईन अर्ज

शेळ्या व मेंढ्या वाटप योजनेसाठी वेळोवेळी सरकार स्थरावरून ऑनलाईन अर्ज मागविले जातात व निश्ति वेळेत हे अर्ज सादर करायचे असतात आमच्या ब्लॉगवर देखील, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक तसेच इतर आवश्यक माहिती आम्ही वेळोवेळी उपलब्ध करून देत असतो.

सामान्यपणे खालील दिलेल्या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज सादर करावे लागत असतात.

शेळ्या व मेंढ्या वाटप योजना ऑनलाईन अर्ज करा
https://ah.mahabms.com
शेळ्या व मेंढ्या वाटप योजना ऑनलाईन अर्ज

आमच्या इतर ब्लॉगपोस्ट:-

Vishwakarma Yojna- पी.एम. विश्वकर्मा योजना

Pradhanmantri Awas Yojna – प्रधानमंत्री आवास योजना शहरी

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
1 Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत