शेतकरी आयडी का आवश्यक आहे? – प्रत्येक शेतकऱ्याने नक्की वाचा! – Farmer ID

Vishal Patole
Farmer ID

आजच्या डिजिटल युगात शेतकऱ्यांसाठी शेतकरी आयडी (Farmer ID) अत्यंत गरजेचा आणि उपयुक्त ठरत आहे. सध्या सुरू असलेल्या विविध सरकारी योजना — जसे की:

✅ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan)
✅ नमो शेतकरी महासन्मान निधी
✅ खत व बियाणे अनुदान
✅ प्रधानमंत्री पीक विमा योजना

— या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी आयडी अनिवार्य ठरत आहे.

Farmer ID – काळाची गरज

प्रधानमंत्री सन्मान निधी व नमो शेतकरी निधी या दोन्ही योजनांचा एकत्रित वार्षिक लाभ १२,००० रुपये असतो. परंतु जर शेतकऱ्याची शेतकरी आयडी – Farmer ID नोंदणी झाली नसेल, तर या योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात, किंवा लाभच मिळणार नाही.

शेतकरी आयडीचे मुख्य फायदे

  • शेतकऱ्यांसाठी विविध योजनांसाठी सोपी व जलद अर्ज प्रक्रिया
  • पात्रतेची अचूक पडताळणी
  • सरकारी लाभ अधिक प्रभावीपणे मिळवता येणे
  • डिजिटल स्वरूपात खात्रीशीर माहितीची नोंदणी
  • शेतकऱ्यांसाठी योजनांची अचूक आखणी आणि धोरणनिर्मिती शक्य

Farmer ID संदर्भात मोठा बदल

१५ एप्रिलपासून मोठा बदल

१५ एप्रिलपासून शेतकरी आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना PM-Kisan व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही! त्यामुळे लवकरात लवकर शेतकरी आयडी तयार करणे अत्यंत आवश्यक आहे.

हा आयडी AgriStack नावाच्या डिजिटल पोर्टलशी जोडलेला आहे. या पोर्टलवर शेतकऱ्यांची जमीन, पिकं, जनावरांची मालकी आणि पूर्वी मिळालेले लाभ यांची माहिती सुरक्षित ठेवली जाते.

Farmer ID – नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे:

✅ आधार कार्ड
✅ ७/१२ उतारा किंवा जमीन मालकीचे प्रमाणपत्र (8-A इ.)
✅ आधारशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक

✅एस सी / एस टी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी जातीचा दाखला

महत्त्वाची सूचना:
जर तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक नसेल, तर आधी नजीकच्या आधार केंद्रात जाऊन मोबाईल क्रमांक लिंक करून घ्या.

फार्मर आयडी (Farmer ID) नोंदणी कुठे करावी?

आजच आपल्या जवळच्या:

  • ग्रामपंचायत कार्यालयात
  • आपले सरकार सेवा केंद्र (CSC केंद्र)

— येथे वरील कागदपत्रांसह भेट द्या आणि आपली शेतकरी आयडी नोंदणी पूर्ण करा.

शेतकरी वर्गाला सल्ला

शेतकरी मित्रांनो, सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर आजच आपली शेतकरी आयडी तयार करा. हे पाऊल तुमच्या शेतीच्या सुरक्षिततेसाठी आणि भविष्यातील योजना मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल.

फार्मर आय डी नोंदणी साठी पोर्टल – https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

कर्मचारी निवड आयोग (SSC) सिलेक्शन पोस्ट भरती 2025 – SSC 2025

११ वी च्या विद्यार्थ्यांसाठीची केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची नवीन दिनांक जाहीर ! – 11th Admission

भारतीय वायुसेना गट ‘क’ पदांची भरती : पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत- IAF Group C

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
१ प्रतिक्रिया

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत