Gadi Ola S1 Air- गाडी ओला एस १ ऐअर

gadi ola s1 air

Vishal Patole
gadi ola s1 airgadi ola s1 air

Gadi Ola S1 Air-

आज ओला इलेक्ट्रिक वाहने तयार करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आघाडीची कंपनी बनत चालली आहे. आणि याच कंपनीची EV (इलेक्ट्रिक व्हेईकल) गाडी आहे Gadi Ola S1 Air- (ओला एस वन ऐअर ) जिच्या बद्दल आज आपण Automobile (गाडी) या सदरात जाणून घेणार आहोत.जागतिक स्तरावर ची एक मुख्य समस्या आहे ग्लोबल वार्मिंग आणि त्याला कारणीभूत ठरणाऱ्या कारणापैकी मुख्य कारण म्हणजे कार्बन उत्सर्जन आहे. पेट्रोल, डीझेल च्या वापरातून सर्वात अधिक कार्बन उत्सर्जन होते , पेट्रोल, डीझेल च्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या कार्बन डाय ऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड सारख्या घातक वायूमुळे बरेच हानिकारक परिणाम आज जग भरातील मानवजात व एकंदरीत सजीव शृष्टी भोगत आहे.याला मूळ कारण म्हणजे आज जगभरात वापरली जाणारी पेट्रोल डीझेल आधारित वाहने. या समस्येचे समाधान म्हणून विद्युतीकरणाडे आज पहिले जात आहे. . त्यातच भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भारताला ग्लोबल वार्मिंग च्या समस्येतून बाहेर काढण्यासाठी विद्युतीकरणाधारीत इको सिस्टम आणि स्टार्ट अप इंडिया सारख्या कार्यक्रमातून देशाला दिलेल्या प्रेरणेतून बरेच स्टार्ट अप सुरु झाले त्यातीलच एक स्टार्ट अप कंपनी आहे OLA (ओला) जिने खूप कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे.

Gadi Ola S1 Air

Gadi Ola S1 Air बनविणाऱ्या OLA कंपनीबद्दल बद्दल थोडी माहिती

बंगलोरमधील स्टार्टअपपासून ते 3 वेगवेगळ्या खंडांवर कार्यरत असलेल्या जागतिक ब्रँडपर्यंत, ओलाने भारतातील सर्वात मोठे मोबिलिटी प्लॅटफॉर्म आणि जगातील सर्वात मोठ्या राइड-हेलिंग कंपन्यांपैकी एक बनून वाहनक्षेत्रात स्वतःचे नाव कोरले आहे.ओला ते ओला इलेक्ट्रिक- भारताला विद्युतीकरणाचे महाकाय केंद्र बनवून जागतिक उत्सर्जन आणि जीवाश्म इंधन अवलंबित्व कमी करण्याची दृष्टी (OLA Elektric) ओला इलेक्ट्रिकच्या केंद्रस्थानी आहे. हे प्रत्यक्षात येण्यासाठी, केवळ इलेक्ट्रिक वाहने बनवण्याचे नाही तर प्रत्येक भारतीयाच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याचे OLA चे ध्येय आहे, जो बदल मिशन इलेक्ट्रिकमागील दृष्टीला सामर्थ्य देतो.

“मिशन इलेक्ट्रिकसह, आम्ही पेट्रोल नाकारण्याचे आणि 2025 नंतर पेट्रोलच्या दुचाकी विकल्या जाणार नाहीत याची खात्री करून इलेक्ट्रिक वाहनांसाठी वचनबद्ध आहोत.”

ओला इलेक्ट्रिक

इलेक्ट्रिक गाडी – OLA S1 AIR (ओला एस १ ऐअर )

ओला एस १ ऐअर एक इलेक्ट्रिक गाडी आहे. आपल्या नवीन लुक आणि अतिशय सुंदर रंग, डिझाईन, पावरफुल इंजिन, व इतर अनेक फिचर्समुळे ती सर्वांना आकर्षित करते.

चांगला वेग- Gadi Ola S1 Air चा उच्चतम वेग ९० किमीप्रतितास एवढा आहे, इलेक्ट्रिक वाहनात हा वेग सर्वात चांगला मानला जातो.

हब मोटर – OLA S1 AIR- या गाडीत हब मोटर डिझाईन चा वापर केला गेला आहे.


बॅटरी :- Gadi Ola S1 Air मध्ये 3KWH ची शक्तिशाली BATTERY देण्यात आलेली आहे. IP67 रेटेड वायर-बंधित बॅटरी पॅक चा वापर केला गेला आहे. बॅटरी जी दीर्घकाळापर्यंत टिकते.

नवीन डिझाइन केलेले हँडल- Gadi Ola S1 Air मध्ये आहे नवीन डिझाईन ची घट्ट पकड.

डिकीची मोठी जागा – Gadi Ola S1 Air मध्ये किराणा सामानापासून ते जिमच्या कपड्यांपर्यंत. सर्व समान आता तुमच्या गाडीच्या सीटखाली.

OLA S1 AIR Display- ओला एस १ गाडीचा डिजिटल डॅशबोर्ड

डिजिटल डॅशबोर्ड-

नेव्हिगेशन- डॅशबोर्ड वर नकाशा / Map सुविधा उपलब्ध

डिजिटल चावी (Digital Key)- ओला अॅप च्या माध्यमातून मोबाईल वरून गाडी लॉक करा फक्त एक क्लिक वर.

Music– डॅशबोर्ड वर गाण्याची / मुजिक सुविधा

OLA S1 Air Range

रेंज – Gadi Ola S1 Air ला एकदा चार्जिंग केल्यानंतर गाडी १५१ किमी पर्यंत चालू शकते.

सपाट फूटबोर्ड :- समोर मोकळी जागा देण्यात आली आहे जेणेकरून आवश्यक समान जसे कि भाजीपालात थैली, हेल्मेट, किराणा इत्यादी ची ने आण करण्यास सोपे जाईल.


चार्जिंग- Gadi Ola S1 Air ला ० ते १०० टक्के चार्जिंग व्हायला ६ ते 7 तास लागतात

हायपरचार्जिंग- २१ मिनिटांत ५० किमी हायपरचार्ज ची सुविधा.

OLA S1 Air Colours – ओला एस १ गाडीचा रंग

गाडीचा रंग- Gadi Ola S1 Air वेग वेगळ्या सहा रंगांमध्ये उपलब्ध आहे

Ola APP- ओला अॅप

Gadi Ola S1 Air ला ओला अॅप ची कनेक्टीव्हीटी आहे. Move OS 3 ने सादर केलेले आणखी एक मनोरंजक वैशिष्ट्य म्हणजे प्रॉक्सिमिटी अनलॉक. मुळात, हे तंत्रज्ञान तुमच्या स्मार्टफोनला चावी म्हणून काम करण्यास अनुमती देते आणि जेव्हा तुम्ही स्कूटरच्या जवळ जाता तेव्हा ते अनलॉक होते, तुम्हाला ते स्वतः अनलॉक न करता चालवता येते.

प्रोफाइल शेअरिंग- तुमचे मित्र, नातेवाईक इत्यादी लोक यामध्ये सामील होऊ शकतात म्हणजेच जर तुम्ही त्यात असाल तर आपआपले प्रोफाईल शेअर करण्याची सुविधा देखील यामध्ये मिळते.

OLA S1 Air Price- ओला एस . १ किंमत

OLA S1 AIR ची किंमत आहे जवळपास १.२५ लाख रु. तसेच कंपनी २६९९ /- रु.च्या EMI वर सुद्धा फायनान्स उपलब्ध करून देऊ शकते.

ओला केअर 7000/ 15000 रु. किमतीचे प्लान घेऊन मिळेल अधिकचे फायदे:

ओला केअररस्त्याच्या कडेला मदत-कोणत्याही तांत्रिक कारणांमुळे अथवा प्रवासात असताना येणाऱ्या अडचणीतून मुक्ततेसाठी, ओला सपोर्ट सेक्शन मध्ये सुविधा उपलब्ध करून देते, ज्यामध्ये OLA Care आपणास रस्त्याच्या कडेला येऊन मदत करेल. त्यासाठी वेगळा प्लान घ्यावा लागतो.

ओला केअर अधिक- चोरी मदत हेल्पलाइन, सेवेवर मोफत लेबर .

२०० सर्व्हिस सेंटर

ओला ची एकूण २०० सर्हीस केंद्र आहेत. जे आपणास गाडी संदर्भात कोणतीही अडचण आल्यास त्वरित सोल्युशन देतात.

OLA S1 Air Specifications- ओला एस १ ऐअर सविस्तर स्पेसिफिकेशन

बाबस्पेसिफिकेशन
Top स्पीड ९० किमी / तास
०-४० प्रति तास ३.३ सेकंद
०-६० प्रती तास ५.7 सेकंद
सर्टिफाईड रेंज १५१ किमी
True रेंज इको १२५ किमी
True रेंज नोर्मल मोड १०० किमी
होम चार्जिंग वेळ ५ तास
मोटार पावर (नोमिनल / पिक )२७/६ kw
बूटस्पेस ३४ L
INSTRUEMENT क्लस्टर ७इंच /१७.७८ सेमी टच स्क्रीन
स्क्रीन रीजोलुशन ८००*४८०
हेडलाईट / टेल लाईट एल ई डी
Top Speed९० किमी / तास
Drive Modeइको, नॉर्मल, स्पोर्ट्स
मोटार Typeहब मोटार
रेटेड मोटार पावर २७ KW
बॅटरी क्षमता ३ KWH
चार्जर चा प्रकार आणि क्षमता पोर्टबल ७५० KW
ब्रेक फ्रेम चा प्रकार ट्यूबुलर
फ्रंट सस्पेन्शन ट्वीन टेलीस्कोपिक
रिअर सस्पेन्शन Dual Shock
फ्रंट ब्रेक टाईपड्रम
रिअर ब्रेक टाईप ड्रम
ब्रेकिंग सिस्टम सीबीएस
व्हील टाईप स्टील
कर्ब वेट१०८ किलो ग्रा
बूट स्पेस ३४ L
एकंदरीत लांबी १८६० MM
एकंदरीत उंची १२९८ MM
व्हीलबेस १३५९ MM
सिट हाईट ८०५ MM
सिट लेंग्थ ७३८ MM
ग्राउंड क्लीअरंस १६० MM
साईड STAND अलर्ट आहे
रिव्हर्स मोड आहे
इको मोड आहे
स्पोर्ट्स मोड आहे
हैपर मोड नाही
OTA अपडेट आहे
संगीत (MUSIC) आहे
रिमोट बूट UNLOCKआहे
ब्लूटूथ / जि पी एस आहे
नेव्हिगेशन आहे
प्रेडीक्टीव मेंटेनन्स आहे
क्रुज कंट्रोल आहे
OLA S1 AIR spECIFICATION
OLA S1 AIR Short film

OLA S1 Air Booking – ओला एस १ एअर ऑर्डर कशी करावी?

ओला एस १ एअर ऑर्डर करण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.

आमच्या नवीन वाहनाविषयीच्या इतर पोस्ट :-

Best Bike Under 1.5 lakh- Pulsar N150- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Karizma XMR- Hero New Bike हिरोची नवी गाडी- विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
3 टिप्पण्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत