Gangaikonda Cholapuram – श्रीलंका, मालदीव, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, म्यांमार पर्यंत सत्ता स्थापित करणारे आणि भारतीय इतिहासात उपेक्षित राहिलेले चोल साम्राज्यातील महान सम्राट “राजेंद्र प्रथम” यांच्या जन्म जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तमिळनाडूमधील गंगैकोंडा चोलपुरम (Gangaikonda Cholapuram) येथे ‘आदी तिरुवथिरै’ महोत्सवात सहभागी होत ऐतिहासिक गंगैकोंडा चोलेश्वर मंदिरात पूजा केली. या विशेष कार्यक्रमात पंतप्रधानांनी राजेंद्र चोल यांच्या दक्षिण-पूर्व आशियातील सागरी मोहिमेच्या 1000 वर्षांचा उत्सव साजरा केला. या मोहिमेमुळे चोल साम्राज्याची राजधानी गंगैकोंडा चोलपुरम (Gangaikonda Cholapuram) येथे स्थानांतरित झाली होती. त्यांनी बांधलेले मंदिर UNESCO जागतिक वारसा स्थळ म्हणून आजही ओळखले जाते. त्याचप्रमाणे, आदी तिरुवथिरै हा तामिळ शैव भक्ती परंपरेचा महोत्सव असून, चोल सम्राट राजेंद्र चोल यांच्या जन्मतारखेच्या अनुषंगाने (अर्धा नक्षत्र) हे पर्व अधिक पवित्र मानले जाते.
Gangaikonda Cholapuram येथील कार्यक्रमाच्या या विशेष प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या महान सम्राटांपैकी एक असलेल्या राजेंद्र चोल प्रथम यांच्या सन्मानार्थ स्मरण सिक्का जारी केला. या प्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले, “राजराजा चोल आणि राजेंद्र चोल हे भारताच्या ओळखीचे आणि अभिमानाचे प्रतीक आहेत. चोल साम्राज्याचा इतिहास आणि वारसा आपल्या देशाच्या बळकटीचे आणि असंख्य संभावनांचे द्योतक आहे.” त्यांनी सांगितले की, चोल काळ हा भारतीय इतिहासातील सुवर्णयुगांपैकी एक होता, आणि त्यांच्या अद्वितीय नौदल व लष्करी सामर्थ्यामुळे भारताने दक्षिण आणि आग्नेय आशियात आपला ठसा उमटवला होता.

Gangaikonda Cholapuram येथील मोदींचे भाषण
पंतप्रधानांनी गंगैकोंडा चोलपुरम (Gangaikonda Cholapuram) मंदिराचे कौतुक करत सांगितले की, “हे मंदिर आजही एक जागतिक वास्तुकलेचा आश्चर्य मानले जाते. राजेंद्र चोल यांनी या मंदिराच्या माध्यमातून केवळ एक धार्मिक केंद्र नव्हे, तर एक सांस्कृतिक, प्रशासनिक आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्रतीक निर्माण केले.” त्यांनी पुढे सांगितले की, “चोल सम्राटांनी भारतात सांस्कृतिक ऐक्याची वीण विणली. आज आमचे सरकार काशी-तामिळ संगम, सौराष्ट्र-तामिळ संगम यांसारख्या उपक्रमांद्वारे हेच ऐक्य बळकट करत आहे.”
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी शैव अधीनम साधूंनी घेतलेला सहभाग आणि सेंगोल या तमिळ संस्कृतीशी निगडित प्रतीकाची संसदेत प्रतिष्ठापना याचा पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला. “ही परंपरा आपल्याला आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडते,” असे त्यांनी नमूद केले. तसेच चोल साम्राज्याच्या जलव्यवस्थापन, स्थानिक स्वराज्य यंत्रणा, आणि लोकशाही प्रक्रियांवर भर देताना मोदी म्हणाले, “पश्चिमी जगतात ‘मॅग्ना कार्टा’चा उल्लेख केला जातो, परंतु चोल साम्राज्याने शेकडो वर्षांपूर्वी ‘कुडवोलाई’ पद्धतीने निवडणुका केल्या होत्या.”
पंतप्रधानांनी आजच्या काळातील राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नांवरही भाष्य करत ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख केला, ज्याद्वारे भारताने आपल्या सत्तेचा ठाम संदेश दिला. त्यांनी सांगितले की, “भारत आज केवळ सामर्थ्यवान बनत नाहीये, तर तो आपले वैश्विक कल्याण आणि एकतेचे मूल्यही जपत आहे.”
पंतप्रधानांनी जाहीर केले की लवकरच तमिळनाडूमध्ये राजराजा चोल आणि राजेंद्र चोल यांच्या प्रचंड मूर्ती उभारल्या जातील, ज्या भारताच्या ऐतिहासिक जाणीवेचे आधुनिक स्तंभ ठरतील.
या कार्यक्रमात तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी, केंद्रीय मंत्री डॉ. एल. मुरुगन, आदीनम पंथाचे प्रमुख संत, आणि हजारो भाविक उपस्थित होते. पंतप्रधानांनी अखेरीस देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आणि “एक भारत, श्रेष्ठ भारत” संकल्पनेला चालना देणारे तरुण तयार करण्याचे आवाहन केले.
चोल साम्राज्यातील महान सम्राट “राजेंद्र प्रथम” यांचा अल्प परिचय
राजेंद्र चोल प्रथम: हे एक महान भारतीय अद्वितीय सम्राट होऊन गेले जे भारतीय इतिहासात इतर महत्वपूर्ण सम्राट व राजांप्रमाणेच उपेक्षित राहिले. परंतु तमिळनाडूमधील गंगैकोंडा चोलपुरम ( Gangaikonda Cholapuram ) येथे मंदिरात ज्यांची मूर्ती आहे, ज्यांनी श्रीलंका, मालदीव, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, म्यांमार पर्यंत भारतीय सीमा आपल्या सत्तेद्वारे स्थापित केल्या, एवढेच कमी म्हणून काय तर ज्यांना तमिळनाडूमध्ये आजही देवाप्रमाणे पूजले जाते त्या महान चोल साम्राज्यातील “राजेंद्र चोल प्रथम” यांच्याबद्दल आज आपण थोडी माहिती जाणून घेणार आहोत.
राजेंद्र चोल प्रथम (१०१४–१०४४ ई.) हे चोल साम्राज्याचे महान शासक होते. त्यांनी आपल्या यशस्वी मोहिमांमुळे चोल साम्राज्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला आणि त्यांनी दक्षिण भारतातील सर्वात शक्तिशाली साम्राज्य बनवले. राजेंद्र चोलांनी ‘गंगैकोंड’ही उपाधी धारण केली आणि गंगैकोंडचोलपुरम (Gangaikonda Cholapuram) या भव्य राजधानीची निर्माती केले. ते भारताचे पहिले असे सम्राट ठरले, ज्यांनी समुद्र पार जाऊन यशस्वी विजय संपादन केले. त्यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक २७-०७-२०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सन्मानार्थ कार्यक्रमात सहभाग घेतला आणि त्यांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करण्यासाठी विशेष समारंभ आयोजित करण्यात आला होता.
राजेंद्र चोल प्रथम – एक महान चोल सम्राट
राजेंद्र चोल प्रथम जन्म आणि सुरुवातीचे जीवन :
राजेंद्र चोल प्रथम (जन्म: २६ जुलै ९७१ – मृत्यू: १०४४), ज्यांना राजेंद्र महान म्हणूनही ओळखले जाते, राजेंद्र चोल प्रथम यांचा अचूक जन्मदिन अज्ञात आहे, परंतु अंदाजे इ.स. ९७१ मध्ये त्यांचा जन्म झाला असावा. ते महान चोल सम्राट राजराजा चोल प्रथम आणि त्यांच्या पत्नी राणी वनथी (थिरिपुवाना मादेवियार) यांचे पुत्र होते. राजेंद्र यांचा एक भाऊ अरैयान राजराजन होता, जो चोल सैन्याचा सेनापती बनला, आणि त्यांना तीन बहिणी होत्या, ज्यामध्ये कुंदवई नावाची एक बहिण आणि महादेवी नावाची मुलगी होती. त्यांच्या जन्माचे नक्षत्र तिरुवथिरई (आर्द्रा) होते. त्यांचा जन्म तंजावूर येथे झाला आणि ते राजराजा चोल यांचे पुत्र होते. त्यांनी आपल्या वडिलांसोबत १०१२ मध्ये सह-राज्यकर्ता म्हणून कार्यभार स्वीकारला आणि त्यांच्या पित्याच्या निधनानंतर १०१४ मध्ये राजेंद्र चोल प्रथम राजसिंहासनावर आरूढ झाले.राजेंद्र चोल प्रथम नंतर महान चोल साम्राज्याचे सम्राट बनले. त्यांनी इ.स. १०१४ ते १०४४ या कालावधीत राज्यकारभार केला.
राजेंद्र चोल यांच्या कारकिर्दीत चोल साम्राज्याने दक्षिण भारत, श्रीलंका, मालदीव, लक्षद्वीप, बंगाल आणि आग्नेय आशियापर्यंत आपली सत्ता विस्तारली. त्यांनी कलिंग, वेंगई, चेरा, पांड्या आणि श्रीलंकेतील अनेक बंडखोरींना यशस्वीपणे चिरडले आणि समुद्री मोहिमेद्वारे हजारो बेटांवर नियंत्रण मिळवले. त्यांनी गंगैकोंडचोलपुरम (Gangaikonda Cholapuram) ही भव्य राजधानी उभारली, ज्यात कृत्रिम तलाव, मजबूत किल्ले, आणि भव्य मंदिरांचा समावेश होता.
राजेंद्र चोल प्रथम यांचे हिंदू आणि बौद्ध धर्मासाठी योगदान
राजेंद्र हे शैव होते, पण त्यांनी बौद्ध धर्मालाही पाठिंबा दिला. त्यांनी दक्षिण भारत आणि आग्नेय आशियात अनेक बौद्ध स्तूप बांधले. त्यांनी “एम्पोरिया” नावाची व्यापार प्रणाली निर्माण केली ज्यामुळे साम्राज्याचे आर्थिक सामर्थ्य वाढले. चोल नौदलाने मलक्का, चीन आणि अरब देशांशी व्यापारसंबंध प्रस्थापित केले.
त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र राजाधिराज चोल प्रथम यांनी पुढील साम्राज्याची धुरा सांभाळली. राजेंद्र चोल हे केवळ महान विजेता नव्हे, तर कुशल शासक, व्यापारी दृष्टी असलेले आणि सांस्कृतिक वारसा जपणारे सम्राट म्हणून इतिहासात अजरामर राहिले आहेत.
राजेंद्र यांना त्यांच्या वडिलांनी चोल साम्राज्याच्या उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते. इ.स. १०१२ ते १०१४ या काळात त्यांनी आपल्या वडिलांसोबत राज्यकारभारात सक्रिय सहभाग घेतला. नंतर, इ.स. १०१८ मध्ये त्यांनी आपल्या पुत्राला – राजाधिराज चोल यांना सह-राज्यकर्ता म्हणून नियुक्त केले, ज्यांनी १०१८ ते १०४४ पर्यंत राजेंद्रांसोबत शासन केले. हे त्यांच्या सशक्त राजकीय दूरदृष्टीचे प्रतीक मानले जाते.
राजेंद्र चोल प्रथम – लढ्यांतील विजय (1012–1028)
सैन्य विजय आणि भारतातील मोहिमा:
- राजेंद्र प्रथम यांनी वडील राजराज चोल यांच्यासोबत सह-राजा म्हणून 1012 मध्ये मोहिमेची सुरुवात केली.
- अदुथुराई व वनवासी (तमिळनाडू)जिंकले आणि 1013 मध्ये कोल्लिपक्कई (उत्तर आंध्र प्रदेश)काबीज केला.
- 1014-1015 मध्ये रत्तापदी (उत्तर कर्नाटक-साउथ महाराष्ट्र) विरुद्ध युद्ध केले व मान्यखेत जिंकले.
- 1016 मध्ये श्रीलंकेतील रुहुना राज्य जिंकले.
- 1017 मध्ये पूर्व केरळमधील कुदामलाई नाडू काबीज केला.
- 1018 मध्ये मालदीव, लक्षद्वीप व कवरत्ती द्वीप जिंकले.
- गंगेपर्यंत मोहीम राबविली व विजय संपदान केला.
गंगेपर्यंत मोहीम व “गंगईकोंडान” उपाधी :
राजेंद्र प्रथम यांनी 1021 मध्ये सक्करकोट्टम (छत्तीसगड) जिंकून गंगा नदीकडे मोहीम सुरु केली.ओडिशा, झारखंड, बांगलादेशातील प्रदेश जिंकून गंगा नदीपर्यंत ते पोहोचले. त्यांनी मिळविलेल्या विजयाच्या स्मरणार्थ गंगईकोंडा चोलेश्वरम (Gangaikonda Cholapuram ) मंदिर बांधले आणि “गंगईकोंडान” ही उपाधी स्वीकारली.
दक्षिण-पूर्व आशिया मोहिमा (1023–1025):
1023 मध्ये श्रीविजय साम्राज्य (सुमात्रा, इंडोनेशिया) आणि येथील अनेक ठिकाणी विजय मिळवला. कदारेमकोंडान ही उपाधी घेतली आणि विजय स्मरणार्थ शिव मंदिर व शहरांची स्थापना केली. विजयाचे स्मारक म्हणून ग्रॅनाइटचे दोन भव्य मंदिर, UNESCO वारसा स्थळ ठरले.
राजेंद्र प्रथम यांची महत्त्वाची युद्धे आणि विजय :
| कालावधी | युद्ध | परिणाम |
| 992–1008 | चालुक्य-चोल युद्ध | चालुक्य प्रदेश जिंकला |
| 993–1017 | श्रीलंका | संपूर्ण विजय |
| 1018–1019 | चेर व पांड्य राजे | चोल अधीन |
| 1018 | मालदीव, लक्षद्वीप | चोल विजय |
| 1019 | कलिंग | चोल अधीन |
| 1020 | मास्की युद्ध | मालखेड़ा पाडले |
| 1023 | गंगा विजय | बंगाल, ओडिशा जिंकले |
| 1025 | श्रीविजय (सुमात्रा) इंडोनेशिया | विजय व उपनिवेश |
| 1028 | केदाह (मलेशिया) | विजय |
विशेष:
राजेंद्र चोल प्रथम यांची साम्राज्यविस्तार मोहिम केवळ भारतातच नव्हे तर दक्षिण-पूर्व आशियातही पसरलेली होती. त्यांच्या सैन्याचा पराक्रम आणि स्थापत्यकलेतील योगदान ही भारताच्या इतिहासातील महान गाथा आहे.
सारांश :
राजेंद्र चोल प्रथम हे चोल साम्राज्याचे एक पराक्रमी आणि यशस्वी सम्राट होते. ते राजराजा चोल यांचे पुत्र होते . त्यांच्या कारकिर्दीत चोल साम्राज्याने आपल्या विजय मोहिमांमुळे भारतातच नव्हे तर आग्नेय आशियातही प्रभाव वाढवला. त्यांनी श्रीलंका, मालदीव, लक्षद्वीप, बंगाल, ओडिशा, तसेच (इंडोनेशिया- सुमात्रा, जावा) , मलेशिया आणि बर्मा (म्यानमार) या प्रदेशांवर विजय मिळवले. त्यामुळे ते समुद्र पार मोहीम करणारे पहिले भारतीय सम्राट ठरले. त्यांनी गंगैकोंड चोलपुरम (Gangaikonda Cholapuram) या राजधानीची स्थापना केली आणि भव्य मंदिरांचे निर्माण केले. राजेंद्र चोल हे शैव पंथीय असूनही सर्व धर्मांना समान मान देणारे होते. त्यामुळेच त्यांच्या काळात भव्य बौद्ध स्तूप देखील त्यांनी उभारले.त्यांच्या काळात चोल साम्राज्य हे व्यापार, कला, धर्म आणि सामरिक दृष्ट्या अत्यंत प्रभावशाली आणि समृद्ध बनले. त्यांच्या पश्चात त्यांचा पुत्र राजाधिराज प्रथम राजा झाला. अशा कित्येक महान सम्राटांच्या पराक्रम बद्दल आजही भारतवासियांना माहिती नाही किंवा अत्यल्प माहिती आहे परंतु आजच्या पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीने “राजेंद्र चोल प्रथम ” यांच्याबद्दल जगाला जाणून घेण्यास नक्की मदत मिळाली असेल तसेच भारतीयांना त्यांच्या गौरवशाली इतिहासाबद्दल जाणून नक्की गौरवपूर्ण भवना निर्माण होईल.
पंतप्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी यांची समाज मध्यमावरील प्रतिक्रिया.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
ICF Bharti 2025: भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीत 1010 जागांसाठी भरती
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना शिवमय मंगल शुभेच्छा ! – Shivaji Maharaj
