प्रेक्षकांच्या हृदयात घर करून गेलेली जॉली एलएलबी मालिका पुन्हा एकदा हास्याचा फटाका उडवण्यासाठी सज्ज झाली आहे. दिग्दर्शक सुभाष कपूर यांचा “जॉली एलएलबी 3” ( Jolly LLB 3 ) हा हिंदी भाषेतील लीगल कॉमेडी-ड्रामा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 रोजी प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा चित्रपट मालिकेतील तिसरा भाग असून जॉली एलएलबी 2 चा सिक्वेल आहे.

Jolly LLB 3 – कथा
Jolly LLB 3 या धमाल कोर्टरूम कॉमेडीत अॅडव्होकेट जॉली मिश्रा (अक्षय कुमार) आणि जॉली त्यागी (अर्शद वारसी) पुन्हा एकदा न्यायाधीश सुंदरलाल त्रिपाठी (सौरभ शुक्ला) यांच्या कोर्टात समोरासमोर येतात. या दोन्ही वकिलांमध्ये होणारी खटकेबाजी, तिखट संवाद, हुशार कायदेशीर डावपेच आणि अधूनमधून उलगडणारे भावनिक क्षण यामुळे चित्रपट हास्य आणि नाट्याचा मेजवानी ठरणार आहे.
Jolly LLB 3 – कलाकार
- अक्षय कुमार – अॅडव्होकेट जगदीश्वर ‘जॉली’ मिश्रा
- अर्शद वारसी – अॅडव्होकेट जगदीश ‘जॉली’ त्यागी
- सौरभ शुक्ला – न्यायाधीश सुंदरलाल त्रिपाठी
- हुमा कुरेशी – पुष्पा पांडे मिश्रा (जॉली मिश्राची पत्नी)
- अमृता राव– संध्या त्यागी (जॉली त्यागीची पत्नी)
- सीमा बिस्वास – जानकी राजाराम सोलंकी
- गजराज राव – हरिभाई खैतान
- राम कपूर – महत्त्वाची भूमिका
Jolly LLB 3 ट्रेलर होतोय व्हायरल
‘जॉली एलएलबी 3’ चा ट्रेलर रिलीज होताच 27 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा ट्रेलर सोशल मिडियावर जोरदार ट्रेंड करत असून, अक्षय कुमार आणि अरशद वारसीच्या अदाकारीने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. ट्रेलरमध्ये दाखवलेली विनोदी आणि कोर्टरूम ड्रामा यामुळे चित्रपटाची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. 27 दशलक्षाहून अधिक दृश्यांनी हा ट्रेलर मराठीसह विविध भाषांत आकर्षक आणि मनोरंजक कॉमेडीची ओळख करून देत मोठा गदारोळ उडवित आहे.
या उल्लेखनीय व्यूज काढल्यामुळे ‘जॉली एलएलबी 3’ सिनेमाच्या यशाची अपेक्षा अधिकच वाढली आहे, आणि चित्रपट 19 सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित होण्यापूर्वीच तिकीट बुकिंगसाठी प्रेक्षक मोठ्या उत्साहाने पुढे आले आहेत.
विशेष बाबी
या चित्रपटाद्वारे अभिनेत्री अमृता राव तब्बल सहा वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे, ही चाहत्यांसाठी मोठी आनंदवार्ता आहे.
शूटिंग
चित्रपटाचे चित्रीकरण 2 मे 2024 रोजी राजस्थानातील अजमेर येथे सुरू झाले. त्यानंतर मुंबईत महत्त्वाचे कोर्टरूम सीक्वेन्स चित्रित करण्यात आले. त्यानंतर युनिटने मध्य प्रदेशात स्थलांतर केले. संपूर्ण चित्रिकरण 2 जुलै 2024 रोजी पूर्ण झाले. “जॉली एलएलबी 3” मध्ये हास्य, कायदेशीर चढाओढी आणि मनाला भिडणारे प्रसंग यांचे सुंदर मिश्रण पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना पुन्हा एकदा कोर्टरूममध्ये हसवणारी आणि विचार करायला लावणारी सफर घडवण्यासाठी हा चित्रपट सज्ज आहे.
समाज माध्यम साईट “X” वरील Jolly LLB 3 बद्दल च्या प्रतिक्रियांसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
