विश्व प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यांचा कांतारा सिनेमा यशस्वी ठरल्यानंतर आता ‘कांतारा : चाप्टर १ ‘ Kantara Chapter 1 हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आला असून त्याने पुन्हा एकदा सिनेकट्ट्यात धुमाकूळ घातला आहे. या नव्या भागात ऋषभ शेट्टी यांनी आपली कला आणि कथा अद्वितीय पद्धतीने सादर केली आहे. ही कथा प्राचीन काळात घडते आणि प्राचीन कादंबा राजघराण्याच्या काळातील घटनांवर आधारित आहे. चित्रपटात एक तत्त्वज्ञानी आणि भावनिक प्रवास दाखवला आहे ज्यात लोककथा, धर्म, आदिवासी संस्कृती या सर्व बाबी महान दृश्यांनी जोडलेले आहे. ऋषभ शेट्टी यांनी मुख्य कलाकार म्हणून उत्कृष्ट अभिनय केला असून, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रत्येक अंगाला प्रेक्षक जोडून घेतात. रुक्मिणी वसंत यांनीही छोटीसी पण प्रभावी भूमिका साकारली आहे, तर गुलशन देवैया आणि जयराम यांच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले आहे. चित्रपटाची छायाचित्रण आणि पार्श्वसंगीतही विशेष उल्लेखनीय आहे. अरविंद कश्यप यांनी रंगभूमीचे, निसर्गाचे आणि पात्रांच्या भावनांचे अप्रतिम दर्शन घडवले आहे. बाजनीश लोकनाथ यांचा बॅकग्राउंड स्कोर चित्रपटाला वेगळाच जीव देतो, ज्यामुळे प्रत्येक दृश्याला वेगळाच थर लागतो.

Kantara Chapter 1
Kantara Chapter 1 सिनेमाचा पहिला भाग काहीसा मंदगतीने सुरुवात होतो पण इंटरव्हलच्या आधी आणि नंतरच्या अँक्शन सीनमुळे प्रेक्षक खुर्चीला चिटकून जातात, सोशल मीडियावर देखील त्यासाठी भन्नाट प्रतिसाद पहायला मिळत आहे. तसेच वीएफएक्स आणि “Action” सीन यामुळे सिनेमात एक अनोखा अनुभव निर्माण होतो.
प्रसिद्ध सिने विश्लेषक तरण आदर्श ह्यांनी देखील ट्विटरवर या सिनेमाला 4.5 स्टारची उत्कृष्ट रेटिंग दिली असून त्यांनी भावनिक आणि दृश्यात्मक ताकदीचे कौतुक केले आहे. त्यांच्या मतानुसार हा सिनेमा 2025 चा एक अत्युत्तम चित्रपट असल्याचे स्पष्ट केले आहे.
कांतारा : अध्याय 1 हा केवळ प्रीक्वेल नाही, तर कांतारा सिनेमाचा वारसा अधिक समृद्ध करणारा आणि प्रेक्षकांना पटकन वेडे करणारा अनुभव आहे. हा चित्रपट ज्या लोककथा, संस्कृती आणि धार्मिकतेत रस असलेल्या प्रेक्षकांसाठी नक्कीच पाहण्याजोगा चित्रपट आहे.
Kantara Chapter 1 ट्रेलर
पहिल्याच दिवशी केवळ एकट्या “बुक माय शो ” वरच Kantara Chapter 1 चे जवळपास १० लाख तिकिटे विकली गेली आहेत.
रिषभ शेट्टींच्या ‘कांतारा चैप्टर 1’ ने भारतीय बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवण्यास सुरुवात केली आहे. बुकमायशोवर (Book My Show) वर 1 दशलक्ष (१० लाख) तिकिटे विकून चित्रपटाने मोठा टप्पा गाठला आहे. दुर्गापूजा आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवसाचाच आलेख भक्कम ठेवला असून, भारतात ₹५० कोटींच्या वरच्या कलेक्शनचा आकडा ओलांडला आहे. कांतारा चैप्टर 1 ची टिकट विक्री आणि थिएटरमध्ये उपस्थिती मागील कांतारा चित्रपटाच्या तुलनेत ३५४% अधिक असल्याचे नोंदवले गेले आहे. चित्रपटाच्या कथानकातील ग्रामीण, पौराणिक आणि भावनिक घटकांनी प्रेक्षकांचे मन जिंकले असून, रिषभ शेट्टी यांचा अभिनय आणि दिग्दर्शनाला मोठ्या प्रमाणावर प्रशंसा मिळत आहे.
आमचे अन्य ब्लॉग पोस्ट :
