Live Cricket Score – मेलबर्न : Ind Vs Aus- बॉर्डर -गावस्कर ट्रॉफी २०२४ च्या ५ टेस्ट सामन्याच्या मालिकेतील चौथा सामना मेलबर्न येथे खेळला गेला. या सामन्यात भारताचा १८४ धावांनी मोठा पराभव झाला आहे. ५ सामन्याच्या मालिकेतील हा चौथा सामना मेलबर्न येथे खेळला गेला. याअगोदरच्या ३ पैकी १ सामना अनिर्णीत राहिला होता, आजच्या सामन्यातील ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानंतर हि टेस्ट मालिका विजयाच्या बाबत ऑस्ट्रेलिया २- भारत १ अशा फरकाने ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकली आहे, ऑस्ट्रेलिया पहिली इनिंग ४७४/१० आणि दुसरी इनिंग २३४ /१० तर भारत पहिली इनिंग ३६९/१०, दुसऱ्या इनिंगमध्ये संपूर्ण भारतीय संघ केवळ १५५ धावा काढून बाद झाला.
- Ind Vs Aus ५ वा दिवस – Live Cricket ScoreAustralia Won the 4th Test with 184 Runs.
- Ind Vs Aus-यशस्वी जैस्वालची एकेरी झुंज निष्फळ ठरली
- Ind Vs Aus स्कोरबोर्ड
- Ind Vs Aus चौथ्या सामन्यातील सर्वोत्तम खिलाडू
- Ind Vs Aus चौथा दिवस खेळ
- Ind Vs Aus तिसरा दिवस खेळ
- Ind Vs Aus दुसरा दिवस खेळ
- Ind Vs Aus पहिला दिवस खेळ
- Ind Vs Aus सिरीज मधील मागील तीन सामन्याचे परिणाम
- Ind Vs Aus- Live Cricket Score – भारत आणि ऑस्ट्रेलिया चे संघ (Playing IX) आणि पहिल्या दिवसाचा खेळ स्कोर कार्ड.
- Ind Vs Aus- Live Cricket Score
Ind Vs Aus ५ वा दिवस – Live Cricket Score
Australia Won the 4th Test with 184 Runs.
Ind Vs Aus-यशस्वी जैस्वालची एकेरी झुंज निष्फळ ठरली
पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा बूमराह ने ल्योनला बोल्ड करून ऑस्ट्रेलियाचा संघ बाद केला. त्यानंतर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी भारतीय संघाच्या दुसऱ्या इनिंगची सुरुवात केली. रोहित मात्र लवकर बाद झाला त्याने ४० चेंडू खेळून ९ धावा करत कमिन्सच्या गोलंदाजीवर मिचेल मार्शच्या हाथात झेल देऊन बाद झाला. त्याच्या नंतर येणारे सर्व भारतीय फलंदाज केवळ मैदानवर केवळ हजेरी लावून फक्त जात राहिले जसे कि, के. एल. राहुल ० /५, विराट कोहली ५/२९, ऋषभ पंत ३०/१०४, रवींद्र जडेजा २/१४, नितीश कुमार रेड्डी १/५, वाशिंगटन सुंदर ५/४५, आकाश दीप ७/१७, जसप्रीत बूमराह ०/८, मोहमम्द सिराज ०/२ अशारीतीने एका बाजूने सर्व गडी बाद होत असताना दुसरीकडे यशस्वी जैस्वाल एकेक धाव जमा करत व अत्यंत संयमी खेळी खेळत होता. जिथे मातब्बर खिलाडू केवळ १०-२०-३० चेंडू खेळून बाद होत होते तिथे त्याने एकट्याने तब्बल २०८ चेंडू खेळून काढले, त्यापैकी ८ चेंडूंवर उत्कृष्ट चौकार मारले, त्याने एकूण ८४ धावा एकेरी लढत देत गोळा केल्या मात्र कोणत्याही इतर भारतीय फलंदाजाची त्याला मदत मिळू शकली नाही शेवटी तो कमिन्सच्या गोलंदाजीवर अलेक्स कॅरी च्या हाथी झेलबाद झाला. आणि भारतीय प्रेक्षकांच्या आणि भारतीय संघाच्या विजयाची आशा मावळली.
Ind Vs Aus स्कोरबोर्ड
| Innings / Team | INDIA | AUSTRALIA |
| 1st Innings | 369/10 (Ovrs 119.3) | 474/10 ( Ovrs – 122.4) |
| 2nd Innings | 155/10 (Ovrs 77) | 234/10 (Ovrs- 83.4) |
Ind Vs Aus चौथ्या सामन्यातील सर्वोत्तम खिलाडू
| भारत | ऑस्ट्रेलिया | |
| सर्वोत्तम फलंदाज पहिली इनिंग | १) नितीशकुमार रेड्डी – ११४ धावा २) यशस्वी जैस्वाल – ८२ धावा | १) स्टीवन स्मिथ – १४० धावा २) मार्नस लाबुशेन – ७२ धावा |
| सर्वोत्तम गोलंदाज पहिली इनिंग | १) जसप्रीत बूमराह- ४ विकेट्स २) रवींद्र जडेजा- ३ विकेट्स | १) कमिन्स – ३ २) स्कॉट बोलांड- ३ ३) नाथन ल्योन- ३ |
| सर्वोत्तम फलंदाज दुसरी इनिंग | १) यशस्वी जैस्वाल – ८४/२०८ | १) मार्नस लाबुशेन – ७० धावा २) नाथन ल्योन- ४१ / ५५ |
| सर्वोत्तम गोलंदाज दुसरी इनिंग | १) जसप्रीत बूमराह- ५ / ५७ (ओ. २४.४ ) | १) कमिन्स- ३/२८ (ओ. १८) २) स्कॉट बोलांड- ३/३९ (ओ. १६) |
| भारत | ऑस्ट्रेलिया |
| यशस्वी जैस्वाल- पहिली इनिंग -८२ /११८ दुसरी इनिंग – ८४ /२०८ (चेंडू) | उस्मान ख्वाजा – पहिली इनिंग ५७/१२१, दुसरी इनिंग- २१ /६५ |
| के.एल. राहुल- पहिली इनिंग- २४/४२ दुसरी इनिंग – ०/५ | एस. कोनस्टास -पहिली इनिंग ६०/६५ दुसरी इनिंग- ८/१८ |
| रोहित शर्मा (कप्तान)- पहिली इनिंग – ३/५ दुसरी इनिंग – ९/४० | मार्नस लाबुशेन- पहिली इनिंग ७२/१४५ दुसरी इनिंग-७०/१३९ |
| विराट कोहली- पहिली इनिंग- ३६/८६ दुसरी इनिंग – ५/२९ | स्टीवन स्मिथ – पहिली इनिंग ६८/१११ नाबाद दुसरी इनिंग-१३/४१ |
| ऋषभ पंत (विकेट किपर)- पहिली इनिंग- २८/३७ दुसरी इनिंग – ३० /१०४ | टी. हेड – फलंदाजी पहिली इनिंग ०/७ दुसरी इनिंग- १/२ गोलंदाजी पहिली इनिंग – ०/११ (३) दुसरी इनिंग- |
| रवींद्र जडेजा- फलंदाजी पहिली इनिंग- १७/५१ दुसरी इनिंग- २/१४ गोलंदाजी पहिली इनिंग-३/७८ (ओ.२३) दुसरी इनिंग – १/३३ (ओ. १४) | मिचेल मार्श – फलंदाजी पहिली इनिंग ४/१३ दुसरी इनिंग- ०/४ गोलंदाजी पहिली इनिंग- ०/२८ (७) दुसरी इनिंग- |
| नितीश कुमार रेड्डी- फलंदाजी पहिली इनिंग- ११४/१८९ दुसरी इनिंग- १/५ गोलंदाजी पहिली इनिंग-०/२१ (ओ. ७) दुसरी इनिंग- ०/४ (ओ. १) | अलेक्स कॅरी (विकेट किपर) – फलंदाजी पहिली इनिंग ३१/४१ दुसरी इनिंग-२/७ |
| वाशिंगटन सुंदर, फलंदाजी- पहिली इनिंग- ५०/१६२ दुसरी इनिंग- २/४ गोलंदाजी पहिली इनिंग ३७/२ (ओ- १२ ) दुसरी इनिंग- २ /२७ ( ओ. ४ ) | पीट कमिन्स (कप्तान) – फलंदाजी पहिली इनिंग ८/१७ नाबाद दुसरी इनिंग- ४१/९० गोलंदाजी पहिली इनिंग – ०/२८/ (ओ. ७) दुसरी इनिंग- |
| जसप्रीत बूमराह, फलंदाजी- पहिली इनिंग- ०/३ गोलंदाजी पहिली इनिंग ४/९९ (ओ – २८.४ ) दुसरी इनिंग- ५ /५७ (ओ. २४.४) | मिचेल स्टार्क – फलंदाजी- पहिली इनिंग- १५/३६ दुसरी इनिंग- ५/१३ पहिली इनिंग- ०/३ गोलंदाजी पहिली इनिंग- ०/८६ (२५) दुसरी इनिंग- |
| आकाश दीप सिंग, फलंदाजी- पहिली इनिंग- ०/१३ दुसरी इनिंग- ७/१७ गोलंदाजी पहिली इनिंग २/९४ (ओ – २६ ) दुसरी इनिंग- ०/५३ (ओ. १७) | नाथन लोयन – फलंदाजी पहिली इनिंग- १३/१८ दुसरी इनिंग-४१/५४ नाबाद खेळत आहे गोलंदाजी पहिली इनिंग -३/९६(२८.३) दुसरी इनिंग- |
| मोहम्मद सिराज, फलंदाजी- पहिली इनिंग- ४/१५ गोलंदाजी पहिली इनिंग- ०/१२२ (ओ – २३ ) दुसरी इनिंग – ३/६६ (२२) | स्कॉट बोलांड- फलंदाजी पहिली इनिंग- ६/३६ दुसरी इनिंग- १०/६५ नाबाद खेळत आहे गोलंदाजी पहिली इनिंग- ३/५७ (ओ. २७) दुसरी इनिंग- |
Ind Vs Aus चौथा दिवस खेळ
Ind Vs Aus चौथा दिवस :- दुसऱ्या इनिंग मध्ये ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच बुमराहने धक्का देत ओपनिंग फलंदाज कोनस्टासला तो वैयक्तिक ८ धावांवर खेळत असताना बोल्ड केले. त्यांनतर सिराजने उस्मान ख्वाजाला तो २१ धावांवर खेळत असताना बोल्ड केले. मात्र नंतर लाबुशेनने चिवट फलंदाजी करत ३ चौकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले त्याला सिराजने पायचीत आउट केले तेव्हा तत्याच्या ७० धावा पूर्ण झालेल्या होत्या. नंतर खेळायला आलेला स्टीव स्मिथ केवळ १३ धावाकरून ऋषभ पंतच्या हाथी झेल देऊन सिराज च्या गोलंदाजीवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाचा फॉर्म मध्ये असलेला प्रमुख फलंदाज असलेला त्रेवीस हेडला जगातील एक नंबरच्या गोलंदाज जसप्रीत बुमराहने स्वस्तात बाद केले तो केवळ २ चेंडू खेळला व त्याने १ धाव काढून नितीशकुमार रेड्डी च्या हाथात झेल देऊन तो बाद झाला. त्याच्या पाठोपाठ मिचेल मार्श देखील भोपळा न फोडता ऋषभ पंतच्या हाथी झेल देऊन बाद झाला त्याला देखील बुमराह ने बाद केले. आपला करिष्मा कायम राखत व टिच्चून गोलंदाजी करत बूमराह ने अलेक्स कॅरी ला केवळ २ धावांत चालते केले त्याने अलेक्स ला त्रिफळाचीत बाद केले. मात्र इनिंगच्या शेवटी शेवटी ऑस्ट्रेलियाच्या कप्तानने मोर्चा सांभाळत अतिशय सावध व चिवट फलंदाजी केली त्याला नाथन ल्योनची चांगली साथ लाभली. ऑस्ट्रेलियाच्या कप्तानने ९० चेंडू खेळून काढले त्याने ४ चौकाराच्या मदतीने स्वत:च्या ४१ धावा पूर्ण केल्या मात्र तो जडेजाच्या गोलंदाजीवर रोहित शर्माच्या हाथी झेलबाद झाला. सध्या ऑस्ट्रेलिया आपल्या दुसऱ्या इनिंग मध्ये २२८/९ धाव संख्येवर खेळत आहे त्यांचे टेल एंडर कमालीची शांत व चिवट खेळी खेळत आहेत नाथन ने ५४ चेंडू खेळत ५ चौकारांच्या मदतीने ४१ धावा केल्या आहेत तर बोलांड ने ६५ चेंडू खेळून १ चौकाराच्या मदतीने १० धावा करून दोघेही शेवटच्या विकेट साठी नाबाद खेळत आहेत.
Ind Vs Aus तिसरा दिवस खेळ
तिसरा दिवस:- जडेजा आणि ऋषभ पंतने भारताच्या उर्वरित पहिल्या इनिंगची खेळी सुरु करत तिसऱ्या दिवसाचा आरंभ केला. दोघेही चांगली खेळी सकारात असताना जेव्हा ऋषभ पंत एकूण ३६ चेंडू खेळून एकुण ३ चौकारांच्या मदतीने २८ धावा केलेल्या असताना खेळत असलेल्या ३७ व्या चेंडूवर अचानक मोठा शॉट खेळण्याच्या नांदत चुकीचा टोला लगावला व ल्योन ने अलगद त्याचा झेल टिपला अशारितीने बोलांडच्या गोलंदाजीवर ऋषभ पंत बाद झाला. त्याच्या नंतर आलेला नितीशकुमार रेड्डी आणि जडेजाने मोर्चा सांभाळला. चांगली भागीदारी होईल असे वाटत असतानाचा जडेजाला ल्योन ने पायचीत बाद केले. त्याने ५१ चेंडू खेळत ३ चौकारांच्या मदतीने १७ धावा केल्या. त्याच्यानंतर खेळायला आलेल्या वाशिंगटन सुंदर आणि रेड्डीने मिळून एक चांगली भागीदारी उभी केली रेड्डी ने १८९ चेंडूमध्ये ११ चौकार आणि १ षटकार मारत आपले शतक पूर्ण केले त्याने ११४ धावा करून भारतीय इनिंगला सन्मान जनक स्थितीत आणले. दुसरी बाजू वाशिंग्टन ने सुंदररित्या साभाळत १६२ चेंडू खेळून काढले त्याने आपले अर्ध शतक पूर्ण केले त्यामध्ये त्याचा १ चौकार व चिवट खेळी सामील होती. त्या दोघांनी १२७ धावांची भागीदारी केली. सुंदर ल्योन च्या चेंडूवर स्टीव स्मिथ ला झेलबाद झाला, आणि ल्योनच्याच गोलंदाजीवर मिचले स्टार्क च्या हाथी नितीशकुमार रेड्डी झेल बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या विशाल स्कोरला चांगला प्रतिकार करू शकणारी व स्थिरावलेली जोडी बाद झाल्याने भारताचा हिरमोड झाला. शेवटी फलंदाजीला आलेला बुमराह शून्यावर बाद झाला तर सिराज १५ चेंडूत ४ धावा काढून तो नाबाद राहिला. अशारितीने भारताची पहिली इनिंग ३६९/१० अशी समाप्त झाली.
Ind Vs Aus दुसरा दिवस खेळ
दुसरा दिवस :- ऑस्ट्रेलिया च्या ४७४/१० च्या प्रतिकारासाठी रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी भारतीय संघाच्या पहिल्या इनिंगची सुरुवात केली मात्र कमिन्सच्या चेंडूवर बोलांडच्या हाथात झेल देऊन रोहित शर्मा ५ चेंडूत केवळ ३ धावा करून बाद झाला. यशस्वी जैस्वाल चांगला खेळत असतनाच दुर्दैवी रित्या धावचीत झाला त्याने ११८ चेंडूत ८२ धावा केल्या त्यामध्ये ११ चौकार आणि १ उतुंग षटकार सामील होता. के. एल राहुलला कामिन्सने बोल्ड केले तेव्हा तो ४२ चेंडूत २४ धावांवर, ३ चौकार मारून खेळत होता. ८६ चेंडूत ३६ धावा करताना ४ चौकार मारणाऱ्या विराट कोहलीला बोलांडने कॅरी च्या हाथात झेल देण्यास भाग पडले व तो बाद झाला. त्याच्यापाठोपाठ आकाशदीप भोपळा न फोडता १३ चेंडूत ० धावा करत बोलांडच्या गोलंदाजीवर ल्योनच्या हाती झेलबाद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत ३१० धावांच्या पिछाडीवर होता. तर रिषभ पंत ७ चेंडूत ६ धावा करून नाबाद आणि रवींद्र जडेजा ७ चेंडूत नाबाद ४ धावांवर खेळत होते.
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ३११/६ या धावसंख्येपासून पुढे खेळ सुरु केला काल नाबाद असलेला स्टीव्ह स्मिथ याने कालच्या ६८ धावांवरून पुढे खेळत वैयक्तिक १४० धावांचा डोंगर रचला आकाशदीप च्या हाथी बोल्ड होण्याअगोदर त्याने एकूण १३ चौकार आणि ३ षटकार ठोकले होते. तर कप्तान कमिन्स कालच्या त्याच्या ८ धावा या त्यांच्या वैयक्तिक धावसंख्येवरून पुढे खेळत अस्ताना त्याचे अर्ध शतक पूर्ण करु शकला नाही तो जाडेजाच्या गोलंदाजीवर नितीशकुमार रेड्डीच्या हाथात झेल देण्याअगोदर ७ चौकार मारून ४९ धावांवर खेळत होता. त्यानंतर आलेले फलंदाज विशेष कामगिरी करू शकले नाहीत. मिचेल स्टार्कला जडेजाने बोल्ड केले तेव्हा तो १५ धावांवर खेळत होता. त्यानंतर नाथन ल्योन ला बूमराह ने १३ धावांवर पायचीत बाद केले, बोलांड ६ धावांवर नाबाद राहिला. अशारितीने ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये ४७४/१० असा विशाल स्कोर उभा केला.
Ind Vs Aus पहिला दिवस खेळ
पहिला दिवस :– Live Cricket Score -Ind Vs Aus- ऑस्ट्रे. ३११/६ भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला आज मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सुरुवात, पहिला दिवस अखेर ऑस्ट्रेलिया ३११/६, जसप्रीत बुमराहचे सर्वाधीक ३ बळी. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्याच्या सिरीज माधील चौथ्या कसोटी सामन्याला आज मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया ने Live Cricket Score- ३११/६ धावा केल्या आहेत. सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. कोनस्टास आणि उस्मान ख्वाजा या जोडीने ऑस्ट्रेलिया संघासाठी चांगली सुरुवात करून दिली कोनस्टासने अवघ्या ६५ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकार ठोकत ६० धावा कुटल्या. त्याला रवींद्र जडेजाने एल. बी. डब्ल्यू बाद केले. बुमराह च्या चेंडूवर के. एल. राहुलच्या हाथी झेलबाद होण्या अगोदर उस्मान ख्वाजाने १२१ चेंडूंचा सामना करत ६ चौकार लगावले, त्याने ५७ धावा करून आपले अर्ध शतक पूर्ण केले. त्यानंतर मार्नस लाबुशेन हा वाशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर कोहलीच्या हाथी झेल बाद होण्या अगोदर दणदणीत ७ चौकार ठोकून १४५ चेंडूत ७२ धावा करून बाद झाला. ट्रेव्हीस हेड ला बुमराह ने शून्यावर बोल्ड केले. त्यानंतर मिचेल मार्श ऋषभ पंतच्या हाथी झेलबाद झाला तेव्हा त्याच्या केवळ ४ धावा झाल्या होत्या त्याला देखील बूमराह ने बाद केले. पुन्हा ऋषभ पंत च्या हाथी आकाशदीप च्या गोलंदाजीवर ३१ धावांवर अलेक्स कॅरी बाद झाला. अशारितीने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ऑस्ट्रेलिया चे सहा गडी बाद केले मात्र भारत त्यांना ३११ धावा करण्यापासून रोखू शकला नव्हता.
Ind Vs Aus सिरीज मधील मागील तीन सामन्याचे परिणाम
या अगोदर झालेल्या ३ सामन्यात दोन्ही संघ एक-एक सामना जिंकून सिरीजमध्ये बरोबरीत आहेत.शेवटची आणि ३रा सामना सिडनी मध्ये खेळला गेला जो पावसाच्या व्यत्ययामुळे भारताला फायदा होऊन निकाल न लागता संपला होता. त्या अगोदर सिरीजच्या सुरुवातीचा सामना भारताने २९५ धावांनी तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने १० गडी राखून जिंकला होता.

(Live Cricket Score ) एमसीजीवरील खेळपट्टी आणि हवामानाच्या परिस्थितीमुळे या सामन्याचा निकाल महत्त्वपूर्ण ठरू शकतो. भारताने त्याच्या फलंदाजीमध्ये अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन केलेले नाही, सूत्रांच्या माहितीनुसार, कर्णधार रोहित शर्माला पुन्हा टॉप ऑर्डरमध्ये परतण्याचे संकेत दिले गेले आहेत. याचा अर्थ असा की, फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुलला तिसऱ्या क्रमांकावर खेळायला स्थान मिळू शकते, कारण व्यवस्थापन टॉप ऑर्डरमध्ये अधिक भक्कमपणा शोधत आहे. यामुळे रोहित शर्मावर लक्ष केंद्रित केले जाईल,
खेळपट्टी लवकर खराब होण्याची शक्यता असल्याने, भारताने आपल्या संघात दुसरा फिरकी गोलंदाज म्हणून निवड झाली आहे. त्याकरिता शुभमन गिलला दुसऱ्या सामन्यातून वगळले गेले. त्याचा प्रभाव भारताच्या फलंदाजीवर कितपत होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सामना कसा होईल हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे, कारण या कसोटीमध्ये दोन टीम्सच्या तुलनेत एका बाजूला भारताने मजबूत संघ उभा केला आहे, तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया आपल्या घरच्या मैदानावर खेळत आहे. ज्याचा फायदा त्यांना निश्चित मिळत आहे.
Ind Vs Aus- Live Cricket Score – भारत आणि ऑस्ट्रेलिया चे संघ (Playing IX) आणि पहिल्या दिवसाचा खेळ स्कोर कार्ड.
Live Cricket Score –
- पहिली इनिंग,
- नाणेफेक – ऑस्ट्रेलिया,
- प्रथम फलंदाजी,
- ऑस्ट्रेलिया – ३११/६,
- बूमराह ३ बळी केवळ ७५ धावा २१ ओव्हर.
- अलेक्स कॅरी (विकेट किपर) – पहिली इनिंग ३१/४१
- पीट कमिन्स (कप्तान) – पहिली इनिंग ८/१७ नाबाद
| भारत | ऑस्ट्रेलिया |
| यशस्वी जैस्वाल | उस्मान ख्वाजा – पहिली इनिंग ५७/१२१ |
| के.एल. राहुल | एस. कोनस्टास -पहिली इनिंग ६०/६५ |
| रोहित शर्मा (कप्तान) | मार्नस लाबुशेन- पहिली इनिंग ७२/१४५ |
| विराट कोहली | स्टीवन स्मिथ – पहिली इनिंग ६८/१११ नाबाद |
| ऋषभ पंत (विकेट किपर) | टी. हेड – पहिली इनिंग ०/७ |
| रवींद्र जडेजा | मिचेल मार्श – पहिली इनिंग ४/१३ |
| नितीश कुमार रेड्डी | अलेक्स कॅरी (विकेट किपर) – पहिली इनिंग ३१/४१ |
| वाशिंगटन सुंदर, पहिली इनिंग ३७/२ (ओ- १२ ) | पीट कमिन्स (कप्तान) – पहिली इनिंग ८/१७ नाबाद |
| जसप्रीत बूमराह, पहिली इनिंग ७५/३ (ओ – २१ ) | मिचेल स्टार्क |
| आकाश दीप सिंग, पहिली इनिंग ५९/१ (ओ – १९ ) | नाथन लोयन |
| मोहम्मद सिराज, पहिली इनिंग ६९/२ (ओ – १५) | स्कॉट बोलांड |
Ind Vs Aus- Live Cricket Score
बि.सी. सी. आय. ओफिशियाल वेबसाईट साठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
BOX OFFICE वरील पुष्पा-२ ची जादू कायम ! चित्रपट १५०० करोड पार ! Pushpa 2
