लाडक्या बहिणीला व वृद्धांना दरमहा २१०० रु, १० लाख विद्यार्थ्यांना १०,००० रु विद्यावेतन, २५,००० नवीन महिला पोलीस भरती करणार !- महायुतीच्या वचननाम्याचा ट्रेलर (Maharashtra Election 2024)

Maharashtra Election 2024

Vishal Patole
Maharashtra Election 2024Maharashtra Election 2024

Maharashtra Election 2024 – दि. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी कोल्हापूर येथील आई अंबाबाईचे पवित्र दर्शन घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने आपला प्रचार जोरदारपणे सुरू केला. (Mahayuti) महायुतीच्या प्रचाराची पहिली सभा काल उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. या ऐतिहासिक सभेतील प्रमुख आकर्षण म्हणजे महायुतीच्या जाहीरनाम्यातील १० कलमी कार्यक्रमाचे सादरीकरण ज्यामध्ये लाडकी बहिणीला १५००रु ऐवजी २१०० रु देणे, २५००० महीला पोलीस भरती करणे, अंगणवाडी आणि आशा सेविका वेतन १५००० रु करणे, शेतकऱ्यांना कर्ज माफी व अन्य मिळून अशा १० विविध घोषणा केल्या गेल्या आहेत. उप मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री श्री अजित पवार आणि लाखोच्या संख्येत्त आलेल्या जनतेच्या उपस्थितीत संबंधित महायुतीच्या जाहीरनाम्याची (Mahayuti) महायुतीनेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली.

Maharashtra Election 2024

महायुतीच्या वचननाम्यातील १० घोषणा -Maharashtra Election 2024

मुख्यमंत्री शिंदे यांनी Maharashtra Election 2024 च्या पार्श्वभूमीवर महायुतीचा वचननाम जाहीर करताना खालील १० प्रमुख घोषणा जाहीर केल्या-

  1. महायुतीचे सरकार पुन्हा आल्यास लाडक्या बहिणींना आता १५०० ₹ ऐवजी २१००₹ प्रत्येक महिन्याला देणार.
  2. महिला सुरक्षेसाठी २५,००० महिलांचा पोलीस दलात समावेश करण्याचे वचन !
  3. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला अगोदर मिळणाऱ्या १२,०००₹ ऐवजी ₹१५,०००₹ देणार. तसेच शेतकऱ्यांना MSP वर २० % अनुदान देण्याचे वचन !
  4. प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन !
  5. राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन !
  6. वृद्ध पेन्शनधारकांना महिन्याला १५००₹ वरून आता २१००₹ देण्याचे वचन ! जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन !
  7. २५ लाख रोजगारनिर्मिती तसेच प्रशिक्षणातून १० लाख विद्यार्थ्यांना १०,००० ₹ महिन्याला विद्यावेतन देण्याचे वचन !
  8. ४५,००० गावांत पांदण रस्ते बांधणार राज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधण्याचे वचन !
  9. अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला १५,०००₹ वेतन आणि विमा संरक्षण देण्याचे वचन !
  10. वीज बिलात ३०% कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन !
Source- sOCIAL MICRO BLOGGING SITE X

ज्याने मतदारांसमोर (Maharashtra Election 2024) आगामी सरकारच्या स्पष्ट ध्येय आणि धोरणांची रूपरेषा उभी केली. सभे दरम्यान उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होतं, ज्यात महायुतीच्या विजयाचा निर्धार आणि जनतेच्या भल्यासाठी केलेले वचन यांचा गजर झाला. महायुतीच्या प्रचाराने राज्यातील विकासाच्या नव्या वाटा उघडण्याची आणि समृद्धी आणण्याची तयारी दर्शवली आहे.महायुतीच्या रणशिंगाने या निवडणुकीचा श्रीगणेशा केला असून, आता महायुतीची विजयाची लढाई अधिक जोमात आणि शक्तीने सुरू होईल, असा विश्वास सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे.

Maharashtra Election 2024

“डबल इंजिन सरकार: राज्याच्या विकासासाठी एकजूट आवश्यक”- Mahrashtra Election 2024

“डबल इंजिनचे सरकार हे फक्त विकास करणारेच नाही, तर राज्याच्या प्रत्येक नागरिकासाठी उन्नती आणि समृद्धीचे वचन घेऊन आले आहे,” असा ठाम विश्वास महायुतीचे नेतृत्त्व व्यक्त करत आहे. यावेळी जनसमुदायाला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या विकासावर भर दिला आणि समविचारी सरकार असण्याचे महत्त्व स्पष्ट केले. “राज्याचा विकास हाच आमचा एकमेव ध्यास आहे, आणि त्यासाठी महायुतीचे समविचारी सरकार सत्तेत आणायलाच पाहिजे. तसेच जेव्हा आपण दिल्लीत जातो तेव्हा काहीजणांकडून टीका होते, पण राज्यातील जनतेच्या हितासाठी आवश्यक अशा अनेक महत्वाच्या योजनांसाठी निधी मिळवण्यासाठी आम्ही दिल्लीला जातो,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

महाविकास आघाडीवर जोरदार आरोप करत मुख्यमंत्री शिंदे यांनी अडीच वर्षांच्या त्यांच्या काळातील फक्त योजना बंद करण्याचे प्रयत्न केल्याचे सांगितले. “अटल सेतूचे आणि मेट्रोचे काम रोखले गेले,जलयुक्त शिवार योजना बंद करून तिची चौकशी लावली, समृद्धी महामार्ग आणि कोस्टल रोड सारखे प्रकल्प अडवले गेले. परंतु आम्ही त्या सर्व अडथळ्यांना पार करत या प्रकल्पांना पुन्हा रुळावर आणले,” असे ते म्हणाले. त्याचबरोबर शिंदे यांनी सरकारच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात १२४ सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली, ज्यामुळे लाखो हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आली आणि अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला.

https://twitter.com/mieknathshinde/status/1853881063149564226
Source- sOCIAL MICRO BLOGGING SITE X

त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उल्लेख करत सांगितले, “तुम्ही पहा, दोन वर्षात ३५० कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देऊन एक लाख नागरिकांचे प्राण वाचवले. हे आहे आमचे सरकार, जे केवळ भाषणांवर नाही तर कृतीवर विश्वास ठेवते.”

कोल्हापूर जिल्ह्याचा संदर्भ घेत, त्यांनी पंचगंगेच्या महापुरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ३२०० कोटी रुपयांची योजना जाहीर केली. “कोल्हापूरकरांना आता महायुतीच्या विजयासाठी सिंहाचा वाटा उचलावाच लागेल. येत्या २३ तारखेला आपल्याला मोठा विजय मिळवायचं आहे, आणि त्यासाठी आपल्याला मोठ्या संख्येने मतदान करणे आवश्यक आहे,” असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

सदर कार्यक्रमाच्या शुभारंभानंतर महायुतीच्या प्रचाराची पहिली सभा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी महायुतीच्या जाहीरनाम्यातील १० कलमी कार्यक्रम मतदारांसमोर सादर करण्यात आले. “ही जाहीर सभा केवळ प्रचार नाही, तर जनतेच्या समर्थनाचा एक जणू सोहळा आहे,” असे शिंदे यांनी सांगितले.

Source- sOCIAL MICRO BLOGGING SITE X

कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, महायुतीचे उमेदवार आणि स्थानिक प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महायुतीच्या नेतृत्वाखाली राज्यात विकास, समृद्धी आणि स्थिरतेचे वचन घेऊन या आगामी निवडणुकांमध्ये Maharashtra Election 2024 विजय मिळवण्याचा दृढ निर्धार केला आहे.

https://x.com/Dev_Fadnavis/status/1853864585188757563

आमच्या इतर ब्लॉगपोस्ट :

“आकर्षक करिअरची संधी: समाज कल्याण विभागात २१९ जागा!”

दिवाळी 2024: प्रकाशाचा उत्सव, समृद्धीचा संकल्प !

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत