(Manoj Jarange) मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये दि. २९ ऑगस्ट २०२५ (शुक्रवार) पासून आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. आझाद मैदानात सुरू असलेल्या उपोषणाला व आंदोलनाला अगोदर केवळ एक दिवसाची मुदत दिली गेलेली होती त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी आंदोलनाला मुदतवाढ दिली असून, आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच राहणार आहे. या आंदोलनासाठी लाखो मराठा बांधव मुंबईत एकत्र आले असून, आंदोलनसाठी पोलिसांनी 5000 लोकांची मर्यादा ठेवली होती. त्यामुळे, या मर्यादेचे उल्लंघन झाल्याच्या आरोपांवरून जरांगेंविरोधात ऑनलाइन तक्रारही दाखल झाली आहे. परंतु आंदोलनकर्त्यांनी मागणी पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नाहीत असे ठामपणे सांगितले आहे.

Manoj Jarange यांच्या मागण्या व इशारे
मनोज जरांगे यांनी ‘मराठा आणि कुणबी एकच जात आहेत’ असा सरकारी निर्णय (जीआर) तत्काळ काढण्याची मागणी केली आहे. तसेच सातारा व हैद्राबाद गझेटियरच्या नोंदीच्या आधारे हा निर्णय लागू होण्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले आहे. जर पुढील दोन-चार दिवसांत ही मागणी शासनाकडून मान्य न झाली, तर राज्यातील मराठा समाज शनिवारी व रविवारी घरी राहणार नाही, असे इशारे दिले आहेत.
राजकीय प्रतिक्रिया
राज्याच्या विविध स्तरांवर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाला समर्थन दिले आहे. शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी तातडीने संवाद साधण्याची मागणी केली आहे, तर काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी केंद्रीय सरकारकडून विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती केली आहे. तसेच, अनेक आमदार आणि खासदारही उपोषणाच्या स्थळी जाऊन आपली भावना व्यक्त करत आहेत.
प्रशासनाची भूमिका
मुंबई पोलिसांनी आंदोलनासाठी विशेष व्यवस्था केली असून, वाहतुकीची कोंडी आणि गर्दी नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहेत. आंदोलनामुळे शहरात काही ठिकाणी वाहतूक अडचणीत आली आहे, परंतु पोलिसांनी आंदोलनकर्त्यांशी सहकार्य करत शांतता राखण्याचा प्रयत्न केला आहे.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा महाराष्ट्रात तापलेला असून हा मुद्दा पुढील काळात अधिक गंभीर राजकीय चर्चांमध्ये येण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षण आंदोलनातील मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या मोर्च्याचा घटनाक्रम
- २७ ऑगस्ट २०२५ (बुधवार): जालना जिल्ह्यातून मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या गावी आंदोलनाची सुरुवात झाली. शेकडो स्वतंत्र वाहनांच्या सहाय्याने आंदोलक वाशी पर्यंत पोहोचले.
- २९ ऑगस्ट २०२५ (शुक्रवार): मनोज जरांगे पाटील मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले, ज्यामध्ये मराठा समाजाला ओबीसी वर्गातून १० टक्के आरक्षण मिळावे ही मुख्य मागणी.
- ३० ऑगस्ट २०२५ (शनिवार): उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईत पाऊस वादळाने परिस्थिती अधिक कठीण केली. आंदोलनासाठी आलेल्या हजारो लोकांना अन्न, पाणी आणि शौचालयांची कमतरता जाणवली, ज्यामुळे नाराजी वाढली. CSMT स्टेशनवर ४ तासांचा वाहतूक अडथळा निर्माण झाला. BMCने पाणी, शौचालय, वैद्यकीय सुविधा त्वरित पुरवल्यामुळे परिस्थिती थोडी सुधारली परंतु मागण्यांवर तणाव कायम.
- आंदोलनातील घोषणा आणि भूमिका:
- शिंदे समितीचा अभ्यासपूर्ण झाला आता प्रमाणपत्रे द्या – मनोज जरांगे
- सर्वसामान्य आंदोलनकर्त्यांनी ठाम मत व्यक्त केले कि, हॉटेल बंद केले असले आणि पाण्याचा तुटवडा असला तरीही आम्ही मुंबई सोडणार नाही.
- मनोज जरांगे पाटीलांनी सरकारला इशारा देत म्हणाले कि, “पोरांना हाणलं तर मोदीसाहेब पण अडचणीत येईल.”
- त्यांनी स्पष्ट केले की, “सरसकट मराठा कुणबी होणार नाहीत; तर् मग ओबीसीत जातीसकट कसे जातात.”
- आंदोलनासाठी खूप मोठा जनसमुदाय जमला
- आमरण उपोषण करत असलेले नेते मनोज जरांगे उभे राहू शकले नाहीत, तरीही त्यांनी बाप्पांच्या आरतीमध्ये भाग घेतला.
- लासलगाव येथील मुस्लिम महिलांनीही मराठा आंदोलनाच्या समर्थनार्थ आंदोलकांना भाकरींच्या शिदोरी दिली आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे, या आंदोलनात मराठा समाजाने जोरदार पाठिंबा दिला आहे.

