New India Assurance मध्ये 550 अप्रेंटिस पदांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी 6 जुलै अंतिम मुदत, परीक्षा 12 जुलैला !

Vishal Patole
By
Vishal Patole
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News...

सरकारी क्षेत्रातील आघाडीची सर्वसाधारण विमा कंपनी (New India Assurance) द न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) ने 2026-27 या वर्षासाठी 550 अप्रेंटिस पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये ही भरती होणार असून महाराष्ट्रातील उमेदवारांसाठीही मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत. कंपनीकडून ही भरती Apprentices Act, 1961 अंतर्गत करण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवारांना 12 महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण कालावधीत दरमहा ₹12,300 स्टायपेंड दिला जाणार आहे.

New India Assurance

New India Assurance भरतीचा संक्षिप्त तपशील

  • संस्थेचे नाव: द न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL)
  • पदाचे नाव: अप्रेंटिस (Apprentice)
  • एकूण जागा: 550
  • प्रशिक्षण कालावधी: 12 महिने
  • स्टायपेंड: ₹12,300 प्रति महिना
  • नोकरीचे ठिकाण: भारतातील विविध राज्ये

New India Assurance मध्ये महाराष्ट्रासाठी सर्वाधिक 138 जागा

राज्यानुसार जाहीर करण्यात आलेल्या जागांमध्ये महाराष्ट्रासाठी सर्वाधिक 138 जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील पदवीधर युवक-युवतींसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.

New India Assurance : पगार (Stipend)

उमेदवारांना 12 महिन्यांच्या प्रशिक्षणा दरम्यान दरमहा १२३०० रुपये (Stipend) दिला जाणार आहे.

New India Assurance : पात्रता

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने पदवी 1 जानेवारी 2022 ते 1 जून 2026 या कालावधीत पूर्ण केलेली असावी. यापूर्वी किंवा त्यानंतर पदवी पूर्ण केलेले उमेदवार पात्र राहणार नाहीत. उमेदवार फ्रेशर असावा आणि यापूर्वी कोणत्याही संस्थेत अप्रेंटिसशिप पूर्ण केलेली नसावी.

वयोमर्यादा

1 जून 2026 रोजी उमेदवाराचे वय खालीलप्रमाणे असावे:

  • किमान वय: 21 वर्षे
  • कमाल वय: 30 वर्षे

आरक्षित प्रवर्गांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, OBC (नॉन-क्रीमी लेयर) उमेदवारांना 3 वर्षे तसेच PwBD उमेदवारांना 10 वर्षांची सवलत लागू आहे.

New India Assurance : निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:

  • ऑनलाइन लेखी परीक्षा
  • प्रादेशिक भाषेची चाचणी (आवश्यक असल्यास)
  • कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकीय पात्रता तपासणी

ऑनलाइन परीक्षेत एकूण 100 प्रश्न आणि 100 गुण असतील. परीक्षेचा कालावधी 60 मिनिटे असेल.

परीक्षेतील विषय:

  • सामान्य व आर्थिक जागरूकता
  • इंग्रजी
  • संख्यात्मक व तर्कशक्ती
  • संगणक ज्ञान
अर्ज शुल्क
  • General / EWS / OBC (पुरुष): ₹944
  • General / EWS / OBC (महिला): ₹708
  • SC / ST / PwBD: ₹236
अर्ज कसा करावा?

उमेदवारांनी प्रथम NATS पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर BFSI SSC पोर्टलवर अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज शुल्क भरावे.

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज सुरू: 23 जून 2026
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 जुलै 2026
  • ऑनलाइन परीक्षा: 12 जुलै 2026

महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवाराला केवळ एका राज्यासाठी अर्ज करता येईल.
  • ही भरती केवळ अप्रेंटिस प्रशिक्षणासाठी असून यामुळे कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरीचा कोणताही अधिकार मिळणार नाही.
  • प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरही कंपनीकडून नियमित नोकरीची हमी दिली जाणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी पात्रता, वयोमर्यादा आणि आवश्यक कागदपत्रांची खात्री करूनच अर्ज करावा.

अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

बातमीन्यूज

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत