Rajmata Jijau- राजमाता जिजाऊ जन्मस्थान, सिंदखेड राजा.

Sindkhed Raja Jijamata

Vishal Patole
Sindkhed Raja JijamataSindkhed Raja Jijamata

Rajmata Jijau- युगपुरुष, महापुरुष, अखंड भारताचे वैभव, महाराष्ट्राची आण, बाण, शान आणि मराठी मानसाचा आधार स्तंभ म्हणजे आपले शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपले अख्ख आयुष्य जुलमी शासन व्यवस्थे विरुद्ध लढण्यात. धर्माच्या रक्षणासाठी, आणि सर्व सामान्यांच्या हितासाठी खर्ची घातले. निश्चयाचा महामेरू, सर्वांचा आधारू, एक कैवारू राजा. महान सेनानी, मुत्सद्दी व हरहुन्नरी राजनेता, प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा एक नितीमान, चारित्र्यवान सर्वश्रेष्ठ व्यक्ती, एक महान योद्धा. अशा असंख्य सद्गुणांचे धनी असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज खरोखरच महान आहेत परंतु त्यांच्या अंगी हे सर्व गुण लहानपणापासून पेरणारी व त्यांना सर्वोत्तम व सर्वश्रेष्ठ, बनण्यास लागणारे सर्व गुण आणि विचार त्यांच्या हृदयात स्थापन करणारी माउली म्हणजे Rajmata Jijau / जिजामाता ‘जिजाऊसाहेब’. याच जिजाऊ साहेबांचे जन्म ठिकाण आहे सिंदखेड राजा, ज्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. अशा दैदिप्यमान माहात्म्यास जन्म देणाऱ्या माउलीचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणाबद्दल आपणा सर्वांस माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. आपणास माहीतच असेल आम्ही batminews.com या आमच्या ब्लॉगच्या प्रवास या सेक्शन अंतर्गत विविध पर्यटन स्थळे व ऐतिहासिक ठिकाणांबद्दल माहिती देत असतो. आज आपण सिंदखेड राजा (Sindkhed Raja Jijamata janmsthan )या मातृतीर्थ जीजाऊ- जिजामाता (Jijamata)-, मा साहेबांच्या जन्मठिकाण व छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोळ बद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग एका नवीन प्रवासाला.

Sindkhed Raja Jijamata

लखोजीराव जाधव आणि सिंदखेड राजा Sindkhed Raja Rajmata Jijau Janmsthan एक इतिहास


लखोजीराव जाधवांचे (Lakhujirao Jadhav) घराणे ही मूळ देवगिरीच्या यादव राजवटीतील सरदाराची एक शाखा आहे. देवगिरी येथील यादवांचा राजवटीचा अंत झाल्यावर यादवांची दैन्यावस्था झाली. उदरनिर्वाहासाठी ते सर्वत्र पसरले. त्याच परिस्थितीत काही सरदार पुढे काही पिढ्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे स्थायिक झाले. सिंदखेडराजाच्या जाधव घराण्यात लखूजी हा कर्तृत्वान, विख्यात आणि महान पुरुष उदय पावला. यादवांचे राज्य नष्ट झाल्यानंतर लखुजीराव जाधव यांनीच ‘जाधव’ घराण्याला मानाचे स्थान प्राप्त करून दिले. राजे लखुजीराव जाधव (Lakhujirao Jadhav) यांच्या जन्माची नोंद उपलब्ध नाही, परंतु मृत्युसमयी त्यांचे वय ८० वर्षे होते, म्हणजे त्यांचा जन्म इ. सन. १५५० सालचा म्हणता येईल. ते विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील मराठा वतनदार होते. लखुजीराव जाधव (Lakhujirao Jadhav) हे जिजाबाई यांचे वडील व शहाजीराजे भोसले (Shahaji Raje Bhosale) यांचे सासरे होते. निजामशाहीत त्यांना इ सन १५७० साली पंचहजारी मनसबदारीचा हुद्दा मिळाला होता. त्यानंतर निजामशहाला १२ वर्षांपासून देवगिरी किल्ला जिंकता येत नव्हता तो राजे लखुजीराव जाधव यांनी इ सन १५७२ साली स्वपराक्रमाने मिळवून दिला, त्यावेळी निजामशहाने त्यांना १० हजारी मनसब,९ सरकार ,५६ चावड्या व २८ महाल ही जहागिरी वंशपरंपरागत करून दिली. पुढे इसवी सन १६०५मध्ये राजे लखुजीराव जाधव यांना निजामशाहीत वजीरपद व १५ हजारी मनसबदारी बहाल करण्यात आले. पुढे इ सन १६२१ साली राजे लखुजीराव जाधव हे मुघलाकडे गेल्यानंतर त्यांना १५००० स्वार व २४००० जात ही मनसबदारी, मीर-ए-समद हे पद, दक्षिणेत त्यांना स्वतःला तसेच त्यांचे पुत्र, नातू व इतर नातेवाईकांना वतन देऊन सन्मान केला गेला. राजे लखुजीराव जाधव व त्यांचे जावई शहाजी महाराज यांनी एकत्रित मराठा सत्ता बळकट करण्यासाठी इ. सन १६१५-१६२९ या काळात धडाडीने प्रयत्न केले. या प्रयत्नांदरम्यान २५ जुलै १६२९ रोजी राजे लखुजीराव जाधव, त्यांचे दोन पुत्र राजे अचलोजीराव व राजे राघोजी, आणि नातू युवराज राजे यशवंतराव व (राजे दत्ताजीराव पुत्ररत्न) यांचा निजामशहाने निशस्त्र असताना देवगिरीच्या दरबारात विश्वासघाताने खून केला. त्या सर्वांची व त्यांच्यासोबत सती गेलेल्या त्यांच्या स्त्रियांच्या समाध्या आजही सिंदखेड राजा (Sindkhed Raja) येथे अस्तित्वात आहेत.

Sindkhed Raja Jijamata

जाधव वंशज शाखा

सिंदखेडराजा(Sindkhed Raja) परिसरात देऊळगाव राजा, किनगाव राजा, आडगाव राजा, जवळखेड, उमरद रुसुमचे (देशमुख) व मेहुणा राजा या असून सिंदखेडराजा परिसराव्यतिरिक्त वंशजशाखा- करवंड ता. चिखली जि . बुलढाणा), शिंदे-पळसे(जि.नाशिक),रिसोड,वाकद, भुईंज(जि. सातारा), वाशीम जिल्हा मोठेगां व जाधव-सरनोबत कोल्हापूर, करणखेड (ता चिखली जिल्हा बुलढाणा),माळेगांव बुद्रुक (ता.बारामती जि.पुणे), वडाळी (ता. कन्नड,जि.औरंगाबाद), मांडवे (सातारा),माहेगाव देशमुख (ता. कोपरगांव, जि. अहमदनगर ),वाघोली(जिल्हा पुणे,वाडी(जिल्हा नांदेड), सारवडी(जिल्हा जालना), अक्कलकोट(तालुका अक्कलकोट,जिल्हा सोलापूर) ,भूम(तालुका भूम,जिल्हा उस्मानाबाद),पाटेवाडी सदरील राजे लखुजीराव जाधव यांच्या चार पुत्रांच्या वंशजशाखा आहेत.

Jijamata Jayanti – जीजामातेचा जन्म

पराक्रमी आणि शूर वीर राजे लखोजीराव जाधवांच्या घरी दि. १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेड राजा या ठिकाणी Rajmata Jijau /जीजामातेचा जन्म झाला. शूरवीरांच्या मध्ये राहून जिजामातेची जडण घडण झाली, लखोजीराव जाधवांच्या (Lakhujirao Jadhav) सदरेवर होणारे न्याय निवाडे, निकाल इत्यादी त्यांनी स्वत:च्या नजरेने अनुभवले होते. आपले पिता व बंधुजन यांचे पराक्रम त्यांनी पहिले होते. मुघल आक्रमणे, त्यांचे अत्याचार इत्यादी गोष्टी त्यांना दिसत होत्या. या आक्रमणकारी व जुलमी सत्ताधीशांशी आपल्या लोकांचा होत असणारा संघर्ष त्यांच्यासाठी एक जिवंत युद्धग्रंथ अभ्यासल्या गेल्या सारखा नियमित घडत होता. या सर्व घडामोडीत जिजामातेची चिंतन, मनन करण्याची क्षमता वाढत गेली. येणाऱ्या समस्यांचे निराकरण कसे करावे, अडचणीतून मार्ग कसे काढावेत हे सर्व त्या शिकत गेल्या. शस्त्र विद्या, धार्मिक ग्रंथांचे ज्ञान त्यांनी प्राप्त केले, आपले वडील व राजे लखोजी रावांचा (Mughal) मुघालाशी सातवेळा घडलेला प्रत्यक्ष संघर्ष व युद्धे , त्यानंतर एकाच दिवशी आपले वडील, भाऊ व लहान भाचा या सर्वांचा धोक्याने निजामाने केलेला खून तेही त्याच देवगिरी किल्यावर जो १२ वर्षे संघर्ष करून देखील निजामाला घेता येत नव्हता मात्र लखुजीराव जाधवांनी आपल्या एकाच पराक्रमाने देवगिरी जिंकून निजामाला सुपूर्द केला होता त्याच देवगिरी किल्यावर संपूर्ण परिवाराचा खून झाला त्यानंतर त्यांच्या स्त्रिया देखील सती गेल्या व हि घटना जीजामातेच्या जीवनाला कलाटणी देणारी घडली. अश्याच इतर अनेक घटना राज्यात सतत सुरु होत्या यातून मार्ग काढणे क्रमप्राप्त होते म्हणून या सर्व मुस्लीम जुलमी शासकांचा इलाज कसा होऊ शकतो हि बाब त्यांच्या मनात घर करू लागली त्यांचे लढावू मन वेगवेगळे आराखडे तयार करायला लागले व मनोमनी एक छत्रपती आकार घेऊ लागला.

Swarajya Janani Jijamata

Jijamata- जिजामाता विवाह


Rajmata Jijau- जिजाबाईंचा विवाह लहान वयातच वेरूळ येथील श्री मालोजी भोसले (Maloji Bhosale) यांचे पुत्र श्री शहाजी राजे भोसले (Shahaji) यांच्याशी अगदी थाटामाटात झाला. लग्नानंतर जिजाबाईंना एकूण सहा (६) अपत्ये होती. त्यापैकी ४ दगावली असे म्हणतात (याबद्दल इतिहासात काहीसे मतभेद आहेत) व दोन मुलगे होते. जिजाबाईंना जेव्हा पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. संभाजीराजे हे (Shahaji) शहाजी राजांजवळ वाढले.. त्‍यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३०, फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव त्यांनी शिवाजी (Shivaji) ठेवले. आपल्या अत्यंत व्यस्ततेमुळे शाहूजी राजे सारखे बाहेर असत व त्यामुळे शिवाजी महाराजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. Rajmata Jijau यांच्या जडणघडणीतूनच आपल्या महाराष्ट्राला महान आराध्य दैवत मिळाले, जगाला एक महान योद्धा मिळाला आणि मुघल काळात संकटात सापडलेल्या हिंदूंना हिंदूधर्म रक्षक श्री छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) मिळाले.

Swarajya Janani Jijamata and shivaji

त्याच Swarajya Janani Jijamata यांची आठवण म्हणून दरवर्षी १२ जानेवारी हा जिजामाता जन्मदिवस (JIjamata Jayanti ) जिजामाता जयंती म्हणून साजरा होतो – या निमित्त सिंदखेड राजा (Sindkhed Raja) याठिकाणी “जिजामाता जन्मोत्सव” मोठ्या उत्साहात, विविध कार्यक्रम आयोजित करून थाटामाटात साजरा केला जातो. यासाठी जगभरातून लोक सिंदखेड राजा या ठिकाणी जमतात.

Sindkhed Raja Jijamata- Jijau Shrushti

सध्याचे सिंदखेड राजा

सिंदखेड राजा (Sindkhed Raja) हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील अमरावती विभागात असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील एक विधानसभा मतदार संघ आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी सिंदखेड राजा एक तालुक्याचे ठिकाण आहे, येथे उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालय (SDO OFFICE) सुद्धा आहे. ४० ,००० ते ५०, ००० लोकसंख्या असलेल्या सिंदखेड राजा शहरात जुन्या काळात बांधण्यात आलेल्या वास्तू जसे कि Swarajya Janani, Rajmata Jijau जिजामाता यांचे वडील श्री लखुजीराव जाधव (Lakhujirao Jadhav) यांचा राजवाडा, लखुजी राजांची समाधी , सावकाराचा सावकारवाडा, काळाकोट(Kalakot) , रंगमहाल (Rangmahal), बाळसमुद्र, सजना बारव, पुतळा बारव, गंगासागर या नावाच्या विहिरी, मोतीतलाव, चांदणीतलाव हे ऐतिहासिक जलसाठे वगैरे पाहण्यासारख्या वास्तू आहेत. सिंदखेडराजा येथे (Nagpur Mumbai Expressway) नागपूर -मुंबई एक्सप्रेस हायवेवर स्वतःच्या जागेत (Maratha Seva Sangh) मराठा सेवा संघाने जिजाऊ धर्मपीठ व जिजाऊ मंदिर अश्या सामूहिक ’जिजाऊ सृष्टी’चे निर्माण कार्य सुरू केले आहे. मोती तलावाच्या बाजूच्या पठारावर जिजाऊ सृष्टीसाठी जागा निवडण्यात आली आहे. या पठार शिवारात राजमाता जिजाऊ घोड्यावरून फेरफटका मारायच्या असे सांगितले जाते.ह्या ठिकाणी त्या युद्धकलेचे, राजकारणाचे शिक्षण घेत होत्या असे म्हणतात. त्याच जागेवर जिजाऊ सृष्टी हा प्रकल्प उभारला जाणार आहे.

Jijamata

Rajmata Jijau Birthplace – जिजामाता जन्म स्थळ

जिजामाता जन्म स्थळ

राजे लखुजीराव जाधव (Lakhujirao Jadhav) यांचा राजवाडा म्हणजेच (Swarajya Janani Jijamata) मासाहेब जिजामाता यांचे जन्मस्थान, हे सिंदखेड राजाचे सर्वात महत्वाचे ठिकाण आहे. या राजवाड्याचे बांधकाम तीन विभागात म्हणजेच देवड्या, नगारखाना आणि सज्जा असे केलेले आढळते, सर्वात अगोदरच्या बांधकामात देवड्या येतात जेथे राजवाड्याच्या मुख्यद्वारावर सैनिकांचे वास्तव्य असायचे. त्यानंतर दुसरा टप्पा नगारखाना- जेथे नगारे बडवले जात असायचे – जेव्हा राजे लाखोजीराव अथवा त्यांची मुले यांचे स्वागत व्हायचे तेव्हा तेथील नगारे बडवली जात असत,शेवटच्या टप्प्यात सज्जा- संरक्षित भिंत ज्यावर पहारेकरी सैनिक पहारा देत असे. अशा विशाल राजवाड्यातील एका राणीवस्यात एका खोलीत जीजामातेचा जन्म झाला. आजही ती जागा संरक्षित करून ठेवलेली आहे.

Sindkhed Raja Jijamata- Janmthikan

राजवाड्याचे प्रवेशद्वार

राजवाड्याचे प्रवेशद्वार मोठे. अतिशय सुंदर, मजबूत व आकर्षक आहे प्रवेशद्वाराला १४ नारळाचे तोरण तयार केलेले आहे, हे तोरण म्हणजे – समृद्धी, शौर्य आणि धैर्य याचे प्रतिक आहे. प्रवेशद्वाराचा खूप मोठा दरवाजा सागवान लाकडाचा १५७६ सालचा मजबूत दरवाजा. आजही तितकाच मजबूत व चांगल्या अवस्थेत आहे.

Sindkhed Raja Jijamata

भुयारी मार्ग

पूर्वीच्या काळी आणीबाणीच्या वेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी भुयारी मार्गांचा वापर होत असे. असेच काही भुयारी मार्ग या राजवाड्यात आढळतात. माणूस घोड्यावर बसून वेगाने या भुयारी मार्गाने एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकेल अशा प्रकारची रचना या भुयारी मार्गांची केलेली होती. राजे लखुजीराव यांचे बंधू व इतर नातेवाईक शेजारील गावी राज्यकारभार पाहत होते. त्या सर्व गावांना या भुयारी मार्गाने जोडलेले होते असे म्हणतात. सिंदखेड राजा हून हि भुयारी मार्गे आडगाव राजा, किनगाव राजा, मेहुणा राजा, देऊळगाव राजा या गावांना जोडतात. परंतु आता हि भुयारी मार्गे जवळपास बंद करण्यात आलेली आहेत. आणि पर्यटकांना देखील या भुयारी मार्गात जाता येत नाही.

घोडे बांधण्यासाठी पागा

महालात प्रवेशद्वाराने आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला घोड्याची पागा आहेत, जसे आजच्या काळात वाहने पार्क केली जातात तसेच त्याकाळी या घोड्यांना उभे राहण्यासाठी यांचा वापर होत असे.

तळघर

राजवाड्यात सहा अंतर्जोडणी केलेल्या खोल्या तळघरात आहेत ज्या ठिकाणी अन्नधान्य साठवून ठेवले जाई कोणत्याही आणीबाणीच्या व युद्धजन्य परिस्थितीत या अन्नधान्याचा वापर होत असे.या खोल्यामध्ये हवा खेळती राहावी म्हणून विशिष्ठ प्रकारची व्यवस्था केल्याचे पाहायला मिळते. या व्यवस्थेत कितीही पाउस झाला तरीही पावसाचे पाणी आत येत नाही हवा मात्र मोठ्या प्रमाणात आत येते व आतील वातावरण चांगले राहते.

झरोके

राजवाड्याच्या खोल्यामध्ये हवेचे झरोके अश्या रीतीने बनवलेले आहेत कि बाहेर पाणी पाऊस कितीही झाला किंवा पाण्याचा मारा कितीही झाला तरी ते पाणी आत येणर नाही.

पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था

पावसाच्या पाण्याचा योग्य रीतीने निचरा व्हावा म्हणून उत्कृष्ट व्यवस्था येथे पाहावयास मिळते. त्याकरिता राजवाड्याच्या भिंतीवर जागोजागी विशिष्ट छिद्रे केलेली दिसतात.

दरबारी महल

अजून पुढे गेल्यास राजवाड्यात दरबारी महाल आपल्या धृष्टीस पडतो, याच दरबारी महालात बसून लखुजी राजे न्याय निवाडे व इतर प्रशासकीय कामे करत असे. या दरबारी महालाच्या दोन बाजूस दोन कचेऱ्या तयार केलेल्या दिसतात. या कचेऱ्यामध्ये सर्व प्रशासकीय कागदपत्रे ठेवलेली असत व या ठिकाणी बसून कारकून आपले दरबारी कामे सांभाळत असे.

पाण्याची व्यवस्था

राजवाड्यात कोठेही पाण्याचे स्त्रोत दिसत नाहीत तर राजवाड्यात वापरासाठी व पिण्यासाठी लागणारे पाणी हे मोती तलावातून भुयारी मार्गे महालात आणले जात होते अशा प्रकारची व्यवस्था केली गेली होती. सिंचनासाठी पाणी सोडण्याची अति सुव्यवस्थीत आणि त्या काळातील जल अभियांत्रीकीचा अतिउत्कृष्ट नमुना म्हणजे “मोतीतलाव”. मोतीतलावाच्या समोरील भाग एका किल्ल्यासारखा बांधला गेला असून, अतिशय विलोभनीय असा परिसर तलावाला लाभला आहे. चांदणी तलाव हे एक आणखी मोतीतलावासारखेच एक प्रेक्षणीय स्थळ आहे. या तलावाच्या मधोमध तीन मजली इमारत बांधलेली आहे. या परिसरात अत्यंत रेखीव पद्धतीने बांधलेली अशी पुतळाबारव नावाची विहीर आहे. ती असंख्य मूर्ती व शिल्पांचा एकत्र वापर करून बनविलेली देखणी शिल्पकृती. तसेच येथे एक आणखी एक तिसरी सजनाबाई नावाची विहीर आहे, त्या काळी सजनाबाई नावाच्या या विहिरीतून भुमिगतबांधण्यात आलेल्या नाल्यांच्या माध्यमातून गावामध्ये पाणी पुरवठा केला जात असे. या विहिरींमध्ये खोलवर आतपर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची सुविधा देखील केलेली आढळते.

राजे लखुजीराव जाधव यांची समाधी- Sindkhed Raja


राजे लखुजीराव जाधव यांच्या मृत्यू पश्चात सिंदखेड राजा (Sindkhed Raja) या ठिकाणी त्यांची व त्यांच्यासह मृत्यू पावलेल्या त्यांची मुले, नातू व सती गेलेल्या स्त्रिया या सर्वांच्या समाध्या बांधण्यात आल्या. समाधी बांधायला तब्बल २० वर्षांचा कालावधी लागला. ही भव्य वास्तू भारतातील संपूर्ण हिंदुराज्यांच्या समाधीपेक्षा मोठी वास्तू आहे. राजे लाखोजीराव जाधव आणि त्यांचे तीन पुत्र सोबत त्यांचा नातू यशवंतराव यांच्या सह इतर दहा समाध्या या ठिकाणी आहेत. अतिशय आकर्षक अशा दगडी बांधकामात या समाध्या बांधण्यात आलेल्या आहेत. आत समाधीच्या प्रत्यक्षस्थळी शिवलिंगांची स्थापना केलेली आहे. अतिशय मनोरम आणि आकर्षक अश्या या वास्तू बनविल्या गेल्या आहेत. त्या एकवेळ तरी प्रत्येकाने पहिल्याच पाहिजेत. ऐतेहासिक वारसा प्राप्त या समाधी मध्ये आत गेल्यावर राजे लखुजीराव जाधव यांची दोन मुले अचलोजीराव आणि राघोजीराव यांच्या समाध्या आहेत. त्यानंतर यशवंतराव म्हणजे लखूजीराव यांचा नातू यशवंतराव यांची समाधी आहे. राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीच्या आसपास इतर ६ ते ७ समाध्या आहेत या तत्कालीन सती गेलेल्या स्त्रियांच्या समाध्या आहेत. यातील सर्वच समाधांवर आकर्षक डिझाईन बनविलेल्या आहेत. अतिशय सुंदर बांधकाम आजही तितकेच जिवंत वाटते.

Sindkhed Raja Jijamata-

नीलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर-( Nilkantheshwar Mandir Sindkhed Raja)
नीलकंठेश्वराचे (Nilkantheshwar Mandir) एक प्राचीन मंदिर सिंदखेड राजा (Sindkhed Raja) येथे आहे. या मंदिरामध्ये हरीहराचे सुंदर शिल्प संपूर्णपणे काळ्या खडकाच्या पाषाणातून साकारलेले आहे, या मंदिराचा जीर्णोद्धार राजे लखुजीराव जाधवांनी केला होता. पुरावा म्हणून त्याबाबतचा शिलालेख येथे कोरलेला आपणास आढळतो. या मंदिरासमोर चौकोनी आकारात तळापर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असणारी एक भव्य बारव बांधलेली आहे. तसेच याठिकाणी ८व्या ते १० व्या शतकातील अतिप्राचीन असे हेमाडपंथी रामेश्वर मंदिर देखील आहे. या सर्व वस्तू व कलाकृती या तत्कालीन स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल.

Sindkhed Raja Jijamata-Nilkantheshwar Mandir

काळाकोठ-(Kalakot Sindkhed Raja)
काळाकोठ (Kalakot) या किल्ल्याची निर्मिती हि राजेराव जगदेवराव जाधवांच्या कार्यकाळात झाली होती. भव्य किल्ल्याच्या निर्मितीत त्यांची दूरदृष्टी दिसून येते. Kalakot त्याचचं एक सुंदर उदाहरण होय . २० फुट उंच आणि २० फुट रुंद भिंती असलेला काळाकोठ अतिशय मजबूत आणि अतिभव्य असा किल्ला बांधलालेला आहे. यासोबतच ४० फुट उंच भिंतीचा परकोट येथे बघायला मिळतो ज्याचे नाव साकरवाडा असे आहे , त्याच्या आतमध्ये विहीर, भुयारी मार्ग, भुयारी तळघरे आहेत. तसेच परकोटावर निगराणीसाठी अंतर्गत रस्ता देखील आहे, याचे प्रवेशद्वार देखील अतिसुंदर आहे.

Sindkhed Raja Jijamata- Kalakot

रंगमहाल (Sindkhed Raja)

ज्या ठिकाणी जिजाऊंनी रंग खेळला तो महाल म्हणजे रंगमहाल. असे म्हणतात याच जागेवर जिजाऊ आणि शहाजी राजे बालपणी एकदा रंग खेळत असताना लखुजीराजे यांच्या नजरेस पडले आणि त्यांचे उद्गार निघाले “जोडी शोभते !” त्यानंतर शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहाची बोलणी याच रंगमहालात केली गेली होती.

Sindkhed Raja Jijamata- Rangmahal

(Sindkhed Raja) सिंदखेड राजाला यायचे कसे ?

(Sindkhed Raja) सिंदखेड राजा हे शहर, महाराष्ट्र राज्यातील. विदर्भ प्रांत म्हणजेच अमरावती विभागात असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात वसलेले आहे. सिंदखेड राजा हे एक तालुक्याचे ठिकाण असून रस्त्यांनी चांगल्या पद्धतीने जोडलेले आहे. इंटरनेत सुविधा, हॉटेल व्यवस्था, लॉजिंग सुविधा इथे उपलब्ध आहेत. छत्रपती संभाजी नगर, जालना इत्यादी रेल्वे स्टेशन्स पासून (Sindkhed Raja) सिंदखेड राजा शहर जवळ आहे. दीड तासाच्या अंतरावर असलेल्या चिखलठाणा, छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी विमानतळ सुद्धा आहे. सिंदखेड राजा येथून १ तासाच्या अंतरावर लोणार नावाचे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. म्हणून येथे येण्यास योग्य ते रोडचे जाळे उपलब्ध आहे.

महाराष्ट्राच्या गौरवपूर्ण ईतिहासातील अत्यंत महत्वपूर्ण हिस्सा असलेले सिंदखेड राजा हे ठिकाण एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून हा लेखन प्रपंच केला आहे. आपणही आपल्या वाटेचे कार्य करून सिंदखेड राजा (Sindkhed Raja) याठिकाणी एकदा अवश्य भेट द्यावी व या ऐतिहासिक ठिकाणाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा.

  • सिंदखेड राजा (Sindkhed Raja) हे एक तालुक्याचे ठिकाण असून ते बुलडाणा जिल्ह्यात येते.
  • सिंदखेड राजा (Sindkhed Raja) येथे पोलीस स्टेशन आहे, राज्य शासनाचे एस टी चे बसस्थानक आहे.
  • सिंदखेड राजा (Sindkhed Raja) येथे नगर पालिका असून, उपविभागीय अधिकारी कार्यालय सुद्धा आहे.
सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन जालना अंतर – ३४ किमी ४७ मिनिटे
सर्वात जवळचे दुसरे मोठे रेल्वे स्टेशन छत्रपती संभाजी नगरअंतर – १०० किमी १ तास २४ मिनिटे
जवळचे विमानतळचिखलठाना, छत्रपती संभाजी नगरअंतर – १०० किमी १ तास २४ मिनिटे
sindkhed raja

सिंदखेड राजा (Sindkhed Raja) येथे राहण्याची व्यवस्था

सिंदखेड राजा (Sindkhed Raja) हे एक तालुक्याचे ठिकाण असून येथे लॉजिंग ची व्यवस्था उत्तम आहे. खानपानासाठी हॉटेल्स उपलब्ध आहेत. एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून हळू हळू हे शहर प्रगती करत आहे.

सिंदखेड राजा (Sindkhed Raja) नजीकची अन्य वैशिष्ट्यपूर्ण प्रेक्षणीय स्थळे

सिंदखेड राजा जवळील अन्य पर्यटन स्थळे विशेषता व वैशिष्टे सिंदखेड राजा पासूनचे अंतरतेथे जाण्यास लागणारा वेळ
लोणार सरोवर, लोणार लोणार सरोवर हे जगातील एकमेव पाणी असलेले इम्पॅक्ट क्रेटर आहे ४९ किमी १ तास ६ मिनिटे
बालाजी महाराज मंदिर, देऊळगाव राजाप्रति तिरुपती बालाजी म्हणून प्रसिद्ध असलेले, देऊळगाव राजा शहर, येथील लळीत व यात्रा उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध संत चोखा मेळा तलाव१२ किमी १५ मिनिटे संत
संत गजानन महाराज मंदिर, शेगावरी संत गजानन महाराज यांचे प्रसिद्ध मंदिर
आनंद विहार, आनंद सागर, इत्यादी
१५३ किमी २ तास ३१ मिनिटे
सिंदखेड राजा (Sindkhed Raja) नजीकची अन्य वैशिष्ट्यपूर्ण प्रेक्षणीय स्थळे.

आमचे इतर ब्लॉग :

Murud Janjira -इतिहासातील एक अजिंक्य किल्ला

Lonar Lake- लोणार सरोवर

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
१ प्रतिक्रिया

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत