अवध में फिर लौट कर आये राम ! – Ram

Ram

Vishal Patole
RamRam

राम राम (Ram), मंडळी शेवटी भारताच्या इतिहासातील तो दिवस उजाडला ज्या दिवशी प्रभू श्री राम आपल्या जन्म ठिकाणी पुन्हा एकदा प्रस्थापित झाले. आज दि २२-०१-२०२४ रोजी अयोध्यानगरी मध्ये, तयार झालेल्या राम मंदिरात भारताचे विश्वप्रसिद्ध पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ, आर. एस. एस. प्रमुख मोहन भागवत, अध्यात्मिक विश्वातील सर्व पंथांचे प्रमुख संत, महंत, ऋषी, मुनी, इत्यादी तसेच उद्योग जगतातील नामवंत उद्योगपती, मनोरंजन जगातील ख्यातनाम कलाकार, जगभरातून हजारोच्या संख्येत आयोध्येत आलेले आणि टीव्ही व मोबाईल च्या माध्यामातून जगभरातून जोडले गेलेले करोडो “रामभक्त” यांच्या उपस्थितीत आज प्रभू श्रीरामांच्या बाल्यावस्थेतील सुंदर मूर्तीचा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पूर्ण झाला व ५०० वर्षांचा रामाचा व रामभक्तांचा वनवास संपला.

Ram


राम मंदिराची आवश्यकता “राम” (Ram) समजून घेतल्याशिवाय समजणार नाही

राम मंदिराची आवश्यकता आज भारत देशाला आणि या संपूर्ण विश्वाला का आहे हे समजण्यासाठी अगोदर “राम” वाचवा लागेल, “राम” समजून घ्यावा लागेल, “राम” म्हणजे काय हे समजल्याशिवाय राममंदिराचे महत्व समजणे शक्य नाही त्यासाठी या लेखातून सर्वसामान्य जन माणसाला राम सर्व सामान्य भाषेत समजावण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राम जन्म

“जान जाये पर वचन ना जाये ! जीव गेला तरीही बेहतर पण दिलेला शब्द पाळलाच गेला पाहिजे” अशी शिकवणूक व असे संस्कार असणाऱ्या “रघु” कुळातील राजा दशरथआणि राणी कौशल्या यांच्या पोटी अयोध्येत बाळ रामाचा जन्म झाला.

आजरोजी जगातअस्तित्वात असलेल्या कोणत्याही धर्माच्या जन्मा अगोदर, जन्माला आलेला आद्य धर्मसंस्थापक म्हणजे “राम” (Ram) होय.

सर्व सामन्यांसाठी राम (Ram) कोण आहे ?

आजही भारतात सर्व सामान्य व्यक्ती एकमेकास भेटतात तेव्हा “राम, राम ” म्हणत एकमेकांना अभिवादन करतात. दिवसाची सुरुवात ‘रामप्रहर’ पासून करणारे सर्वसामान्य लोक मृत्यूनंतर मोक्षासाठी “राम नाम सत्य है !” म्हणतात यावरून लक्षात येते कि, राम फक्त एक नाव नाही, ती एक भावना आहे जी करोडो हिंदूंच्या आस्थेच्या केंद्रस्थानी आहे. म्हणून राम फक्त एक शब्द नाही तर एक आस्था आहे.


पृथ्वीतलावरील सर्वोत्कृष्ट पुत्र(Ram)

पित्याने सावत्र आईला दिलेले वचनपूर्ण करण्यासाठी स्वत:चा कोणताही दोष अथवा गुन्हा नसताना १४ वर्षे वनवास भोगणारा धर्मशील पुत्र म्हणजे राम, आपल्या सावत्र आयांवर आपल्या सख्या आई ऐवढीच प्रीती करणारा पुत्र म्हणजे “राम”. पृथ्वीतलावरील सर्वोत्कृष्ट व आदर्श पुत्र म्हणजे राम.


पृथ्वीतलावरील सर्वोत्कृष्ट पती

आजन्म एकच पत्नी करून मरेपर्यंत एकाच पत्नीला प्रेम करणारा “एकपत्नीव्रत” धारण करणारा एकमेव तो “राम”. म्हणून पृथ्वीतलावरील सर्वोत्कृष्ट पती तो “सीताराम” झाला.


पृथ्वीतलावरील सर्वोत्कृष्ट बंधू

१) पित्याने आपल्या सावत्र आईला दिलेले वचन पूर्ण व्हावे व भरताला राजगादी मिळावी म्हणून स्वत: १४ वर्षे वनवास भोगणारा तेही स्वत:ची कोणतीही चूक नसताना अथवा स्वत: कोणताही गुन्हा केलेला नसताना, केवळ बंधू व पित्याच्या वचनापोटी संपूर्ण राज्य, संपत्ती, धन, वैभव, ऐश्वर्य, सत्तेचा १४ वर्षे त्याग करणारा एकमेव बंधू व पुत्र म्हणजे “राम”
२) स्वत: काट्यातून चालत वनवासात जाणारा पण भावाचे आपल्या बद्दलचे प्रेम जाणणारा आणि म्हणून वनदेवतेला विनंती करणारा कि, हे वनदेवता मी ज्या मार्गावरून आलो त्या मार्गावरील सर्व काटे काढून टाक, कारण माझा भाऊ भरत जेव्हा मला शोधत या मार्गाने येईल तर त्याच्या पायात हे काटे टोचायला नको, एवढे प्रेम आपल्या भावाबद्दल आपल्या मनात असणारा उत्कृष भाऊ म्हणजे “राम”(Ram).
३) लक्ष्मणाला बाण लागला तेव्हा स्वत:च्या अंगी असलेल्या सर्व शक्ती विसरून लहान बाळाप्रमाणे आपल्या भावाला मांडीवर घेवून बंधूप्रेमात अश्रू गाळणारा एकमेव भाऊ म्हणजे “राम” होय.
पृथ्वीतलावरील सर्वोत्कृष्ट शिष्य – गुरु वाशिष्ठांचा आवडता शिष्य म्हणजे “राम”. आपल्या गुरुकुलातून विद्येचे दान देत असतांना, ऋषी विश्वामित्रांना राक्षसांनी त्रास देण्यास सुरुवात केली तेव्हा गुरु असलेले ऋषी विश्वामित्र यांनी ज्याच्या मदतीने राक्षांचा नायनाट केला तो पराक्रमी व आज्ञाधारक शिष्य म्हणजे “राम”.

Ram


पृथ्वीतलावरील सर्वोत्कृष्ट नेता

चौदा वर्षांच्या वनवासात असताना रावणाने जेव्हा सीतेचे अपहरण केले तेव्हा रामाकडे ना सेना होती ना रावणाच्या सेनेसोबत लढू शकणारे हत्यारे होती. वनवासात असलेल्या या व्यक्तीने आपल्या व्यवहार कुशलतेने व नेतृत्व गुणाने समाजातील सर्वात शेवटच्या स्तरातील लोकांचा उपयोग करून त्यांना शस्त्रविद्या शिकवून. विशिष्ठ ध्येपुर्तीसाठी एकत्रित केले. सैनिकांची जुळवा जुळव केली इतकेच काय तर प्राणी समजल्या जाणाऱ्या वानरांची सुद्धा वानरसेना उभी केली जे कोण्या मानवासाठी कधीच शक्य नाही म्हणून पृथ्वीतलावर (Ram) “रामा” पेक्षा उत्कृष्ट नेता दुसरा जन्माला आला नाही.


पृथ्वीतलावरील सर्वोत्कृष्ट योद्धा

तत्कालीन धनवान, उच्चविद्याविभूषित, सोन्याच्या लंकेत राहणारा व विमान धारण करणारा, दशमुखी मानला गेलेला, महादेवाचे वरदान प्राप्त असलेला, ज्याच्याकडे इंद्राला जिंकणारा इंद्रजीत सारखा पुत्र होता, मोठ्या संख्येत राक्षसी सेना होती, कुंभकर्णा सारखे बलाढ्य भाऊ होते, जो कोणत्याही बाबतीत कमी नव्हता अश्या रावणाचा १४ वर्षाचा वनवास भोगत असणाऱ्या ज्या व्यक्तीने सशस्त्र युद्ध करून पराभव केला व आपल्या पत्नीवरील प्रेम व विश्वास ज्याने सिद्ध केला असा पृथ्वीतलावरील सर्वोत्कृष्ट व एकमेव योद्धा म्हणजे “राम” (Ram) होय.


जनतेचा सर्वोत्कृष्ट “राजा”

जगाच्या इतिहासात जेवढे प्रेम जनतेने “राजाराम” यांच्यावर केले तेवढे इतर कोणावरही केलेले आढळत नाही. १४ वर्षे वनवासात जात असतांना ज्याच्यासाठी जनता अश्रू गाळत होती, ज्याची १४ वर्षे जनता आतुरतेने वाट पाहत होती, ज्याच्या आगमनासाठी दिवे लाऊन, हार तुरे घेऊन, रांगोळी काढून, सजावटी करून, सडा सारवण करून, घरात गोडधोड जेवण बनवून जेनतेणे स्वयं प्रेरणेने दिवाळी साजरी केली तो लोकांच्या मनावर राज्य करणारा एकमेव राजा, ज्याच्या काळात जनता सर्वात सुखी होती. ज्याच्या राज्य कारभारात राज्यात आनंद नांदत होता, ज्याच्या पायातील पादत्राणे राजगादीवर ठेवून, ज्याच्या नावाने राज्याभिषेक करून, भरताने १४ वर्षे अयोध्येचा राज्यकारभार सांभाळला, ज्याच्या काळातील राज्यकारभाराला सर्वोत्कृष्ट समजल्या जाते आणि म्हणून ज्याच्या “रामराज्याची” आजही लोकांना आस आहे असा तो राज्य कर्ता राजा म्हणजे “राम”(Ram) होय.


पृथ्वीतलावरील सर्वोत्कृष्ट अभियंता

माता सीतेचे अपहरण रावणाने केल्यानंतर, सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी प्रभू श्रीराम आणि त्यांची वानरसेना जेव्हा भारताच्या अंतिम टोकापर्यंत पोहोचली त्यावेळेस समोर अथांग समुद्र आणि त्या समुद्रापलीकडे लंका होती जेथे माता सीता रावणाच्या अशोक वाटिकेत बंदिस्थ होती. अशा परिस्थितीत सीतेला सोडवण्यासाठी जगातील पाण्यावर तरंगणाऱ्या दगडांचा पूल दोन देशामध्ये तयार करणारा जगातील सर्वोत्कृष्ट अभियंता व रामसेतूचा जनक म्हणजे “राम”(Ram).


पृथ्वीतलावरील एकमेव मर्यादापुरुषोत्तम

आपल्या अखंड आयुष्यात जीवनातील प्रत्येक मर्यादा पाळणारा व धार्मिक मर्यादांचा वाहक, म्हणून आपल्या जीवनाच्या संघर्षात मानवाला मर्यादा शिकविणारा पुरुषात सर्वोत्तम ठरलेला एकमेवादित्य म्हणजे “राम” (Ram).


जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धारी

ज्याचा बाण कधीच खाली गेला नाही, ज्याच्या धनुष्यातून नीरर्थक बाण केव्हाच निघाला नाही व जो बाण निघाला तो कधीच ध्येयापासून चुकला नाही म्हणून आजही भारतात प्रत्येक सिद्ध व प्रमाणित कार्यास “रामबाण” हा शब्द प्रचलित आहे, कोणत्याही सिद्ध झालेल्या अथवा १०० % प्रमाणित गोष्टीला “रामबाण” हाच पर्यायी शब्द आजही सर्वसामान्यांच्या वापरात आहे. असा तो जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धारी म्हणजे “राम” (Ram).

Ram


सर्वशक्तीमानांचा स्वामी

कित्येक शक्तिशाली, बलशाली ज्याचे सेवक झाले, हनुमानासारखा महाबलशाली, सर्वशक्तिशाली, व्यक्ती ज्याचा सेवक झाला, जांबुवंत ज्याचा भक्त झाला, अंगद ज्याचा सेवक झाला, सर्व शक्तीं ज्याच्या सेवक झाल्या असा सर्वशक्तीमानांचा स्वामी म्हणजे प्रभू श्रीराम.

आज या विश्वाला राम व रामाच्या आदर्शांची, त्यांच्या तत्वज्ञानाची त्यांच्या प्रेमाची त्यांच्या धर्माची, त्यांच्यातील एकपत्नी व्रताची व इतर असंख्य गुणांची अत्यंत गरज आहे आणि त्यामुळेच प्रभू पुन्हा एकदा आम्हा मानवांच्या मार्गदर्शनासाठी पुण्यनगरी अयोध्येत प्रगट झाले आहेत परंतु आपण मानवांनी आपल्या जीवनाचे सार्थक करून घेणे हे आपल्या हाथात आहे. म्हणून आपण सर्वांनी आपापल्या जीवनात “राम” आणण्याचा प्रयत्न करूयात व रामराज्य निर्मितीत आपले योगदान देऊ यात. राम राम !!!!
.

निष्कर्ष / Concusion

धर्म, त्याग, सत्य, नीती, युद्ध, न्याय, पुरुषार्थ, मर्यादा, मानवता इत्यादींचे आजच्या मानवीय जीवनात मोजमाप करण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाण म्हणजे “राम” होय. राम फक्त देव नाही तर जगात “मानवात” देवत्व निर्माण करू शकेल असे रसायन आहे, जो कोणी हे रसायन प्राशन करेल तो देवत्वास प्राप्त होईल, म्हणून राम “मानवाला” महामानव बनविणारी शक्ती आहे. राम म्हणजे “प्रेरणा” जी कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहण्यास प्रेरित करते. राम म्हणजे “वचनपूर्ती” आहे, मुखातून निघालेला शब्द सिद्ध करणारे यंत्र म्हणजे “राम” आहे. “राम” म्हणजे विश्वास, राम म्हणजे उत्कृष्टता, राम म्हणजे सर्वोच्चता, राम म्हणजे पूर्णत्व, राम म्हणजे मोक्ष, राम म्हणजे शून्य, राम म्हणजे अनंत…… ज्याला कोठेही अंत नाही ते तत्व म्हणजे “राम”(Ram).

आजच्या जागतिक समस्यांचे समाधान रामांच्या आदर्शांमध्ये मिळते. रामाचे आदर्श सर्व सामान्य मानवात यावेत हि काळाची गरज आहे, . म्हणून या विश्वाला राम समजावा, रामाचे आदर्श कळावेत या साठी राममंदिर एक स्त्रोत होईल यात तिळमात्र शंका वाटत नाही.

राम मंदिर , आयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहण्यसाठी येथे क्लिक करा.

आमचे धर्म आधारित ब्लोग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत